मिताली मयेकरने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे. मराठीमध्ये लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून परिचित आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसिरीज अशा सर्वच माध्यमांमधून का करत मितालीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
मिताली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत फॅन्सच्या संपर्कात असते. नुकतेच तिने एक कमालीचे फोटोशूट केले असून, ते फोटो तिने शेअर केले आहेत.
मितालीने सोनेरी रंगाच्या लॉन्ग इंडियन गाऊनमधे तिचे नवीन फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून, नेटकऱ्यांना देखील तिचा हा लूक आवडला आहे.
मितालीने सोनेरी रंगाचा इंडियन एथनिक लॉन्ग गाऊन घातला असून, त्यावर हेव्ही निळ्या रंगाचा चोकर नेकलेस घातला आहे. तिने तिचा लूक सिंपल ठेवला असून अधिकची कोणतेही ज्वेलरी घातलेली नाही.
या लूकवर तिने तिचे केस मोकळे सोडले असून, ‘Bring Back The Festive Season’ असे कॅप्शन देत मितालीने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
दरम्यान मिताली सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसत नसली तरी ती सध्या तिचा हा वेळ तिच्या आवडीची अर्थात फिरण्यासाठी वापरत आहे. तिला ट्रॅव्हलिंगची खूप आवड असून ती आणि सिद्धार्थ चांदेकर सतत विविध ठिकाणी फिरत असतात.