Home » सुव्रत जोशीने जाहीर केली “सवलत माझी लाडकी योजना”

सुव्रत जोशीने जाहीर केली “सवलत माझी लाडकी योजना”

by Jyotsna Kulkarni
0 comment
Suvrat Joshi
Share

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी. मालिका, चित्रपट, नाटक अशा सर्वच माध्यमांमधून काम करत प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. सध्या सुव्रत मालिका आणि चित्रपटांमध्ये कमी दिसत असला तरी त्याचे नाटक मात्र सुरु आहे. मराठी कलाकार आणि त्यांचे नाटक प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. अनेकदा अनुभवी, दिग्गज, जेष्ठ कलाकारांकडून आजच्या नवीन पिढीतील कलाकारांना नाटक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण नाटक म्हणजे अभिनय शिकण्याचे विद्यापीठच आहे. नाटक करून बाहेर आलेला माणूस सर्वच प्रकारचा अभिनय भूमिका लीलया पेलू शकतो.

सध्या रंगभूमीवर देखील अनेक दर्जेदार आणि तुफान गाजणारे बरेच नाटकं सुरु आहेत. यातलेच एक नाटक म्हणजे ‘वरवरचे वधू-वर’ नाटक. अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीने हे नाटक लिहिले असून त्याचे दिग्दर्शन देखील केले आहे. आपल्या नाटकं जरी भरपूर आणि अतिशय उत्तम बनत असली तरी तरुण वर्गाला किंवा काही प्रेक्षकांना या नाटकांची तिकिटं घेणे परवड नाही. नाटक बघताना पुढच्या रांगेत बसून नाटक बघण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र तिकिटं महाग असल्याने त्यांना इच्छेला मुरड घालावी लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

हेच निरीक्षण अभिनेता सुव्रत जोशीने केले आणि त्याने ‘सवलत माझी लाडकी योजना’ ही भन्नाट योजना प्रेक्षकांसाठी आणली आहे. याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. ‘सवलत माझी लाडकी योजना’ योजना नक्की काय आहे?, याचा प्रेक्षकांना कसा आणि काय फायदा होणार आहे? आदी सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

अभिनेता सुव्रत जोशीने ‘सवलत माझी लाडकी योजना’ची घोषणा करत त्याची माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुव्रत म्हणतो, “नमस्कार मी सुव्रत, आमचं नवीन नाटक ‘वरवरचे वधू-वर’ याला तुम्ही चांगलाच प्रतिसाद देतायत. येत्या २६ तारखेला पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात याचा रौप्य महोत्सव, २५वा प्रयोग दोन महिन्याच्या आतमध्ये होतोय. हे तुमच्या प्रेमामुळे शक्य झालंय. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या प्रयोगाला या. तो प्रयोग आपल्याला हाउसफुल्ल करायचा आहे.

क्रमांक दोन, कलाकारखानची सुरुवात केल्यापासून म्हणजेच माझ्या निर्मिती संस्थेची सुरुवात केल्यापासून ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या वेळी किंवा ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या वेळी माझं असं लक्षात आलंय की, एक मोठा तरुण वर्ग आमचं नाटक बघायला येतो. अनेकदा पहिलं मराठी नाटक बघायला लोक येतात ते आमचं नाटक असतं. याचा मला अतिशय आनंद आहे. याच वेळी मला याचीदेखील कल्पना आहे की, ५०० रुपयांचं तिकीट हे बऱ्याचशा मोठ्या तरुणवर्गाला महाग पडतं. त्यात खालची तिकीट ५०० रुपये असतात. नाटक पुढून बघायची इच्छा असते. याचसाठी मी नवीन एक योजना घेऊन आलो आहे. ते म्हणजे महिन्यातून एका आडवारी मी असा एक प्रयोग करायचा ठरवला आहे की, जेव्हा मी खालची तिकिटं ३०० रुपयांनी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करतोय. याचा आस्वाद कॉलेजचे लोक किंवा कोणीही घेऊ शकतं. असं काही नाही की तुम्हाला कॉलेजचा आयडी दाखवायला पाहिजे.

याचा पहिला प्रयोग येत्या २८ तारखेला दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे करणार आहोत. या प्रयोगातील खालची बरीचशी तिकिट ३०० रुपयांनी विकायला काढली आहेत. ती तिकिट ऑनलाइन उपलब्ध आहेत. लवकरात लवकर ती तिकिट विकीत घ्या. तुमची वाट बघतोय. कॉलेजच्या ग्रुपने या आणि आनंद घ्या. थँक्यू, भेटूया. प्रेम,”

========

हे देखील वाचा : या दिवाळीत नक्की करून बघा ‘हे’ विविध प्रकारचे लाडू

========

हा व्हिडिओ शेअर करताना सुव्रतने कॅप्शनमध्ये लिहिले, “नाटकाचं तिकिट फक्त ३०० रुपयाला कॉलेज आणि इतर तरुण वर्ग लक्षात घेऊन वरवरचे वधू वर ची “सवलत माझी लाडकी योजना”! आडवारी खालची तिकिटे देखील ३०० रुपयांना! या योजनेतील पहिला प्रयोग २८ ऑक्टोबर दु ४ वा. प्रबोधनकार ठाकरे ,बोरिवली येथे. लवकरात लवकर तिकिटे बुक करा. तिकिटं Bookmyshow वर उपलब्ध. अर्थात योजनेचा आस्वाद कुणीही घेऊ शकतो. कुठलीही अट नाही. ही कल्पना आवडली का? कॉलेज आणि इतर तरुण वर्गासाठी ही फायद्याची आहे का? तुमच्या शहरात ही योजना घेऊन येऊ का? शहराचे नाव कमेंट मध्ये लिहा.”

सुव्रतच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या या योजनेला उत्तम कल्पना असल्याचे म्हटले आहे. सोबतच या योजनेचा सर्वच प्रेक्षक नक्की लाभ घेतील असा विश्वास देखील दाखवला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.