Home » ‘आई गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी शूट’ मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘आई गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी शूट’ मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Milind Gawali
Share

आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेते मिलिंद गवळी हे मराठी सिनेविश्वातील अतिशय प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक उत्तमोत्तम मराठी नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत ‘अनिरुद्ध’ ही भूमिका करून त्यांनी अफाट यश मिळवले आहे.

अभिनयात अतिशय संपन्न असलेले मिलिंद गवळी लिखाणातही हुशार आहे. मागील अनेक वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जुन्या आठवणींचा समृद्ध खजिना आहे. ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना, त्यांच्या आठवणी, त्यांचे जुने किस्से आदी असंख्य गोष्टी शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्ट देखील कमालीच्या व्हायरल होतात. नुकतीच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ या सिनेमा संदर्भात ही पोस्ट असून, त्यांनी यातून या सिनेमाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मोस्ट वॉन्टेड” हा चित्रपट कायम माझ्या स्मरणात राहतो तो एका कारणासाठी, माझी आई गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी या सिनेमाचं शूटिंग करायला फिल्मसिटी ला गेलो होतो, कारण आई असती तर शूटिंग सोडून घरात दुःख करत बसलो आहे हे तिला अजिबात आवडलं नसतं.

नेमकं त्यादिवशी माझा अशोक सराफ यांच्याबरोबर एक कॉमेडी सीन होता, मनात प्रचंड आई गेल्याचे दुःख आणि आपण एक कॉमेडी सीन करतोय, ते मनावरचं ओझं, आणि ते feeling मी आजही विसरू शकत नाही.
हा मोस्ट वॉन्टेड चित्रपट राजन प्रभू यांनी लेखन आणि दिग्दर्शन केला होता त्यात राजन कामही करत होता, राजन बरोबर याआदी “घात प्रतिघात” या चित्रपटात काम केलं असल्यामुळे त्याच्याशी छान मैत्री झाली होती. आपल्या मित्राचं नुकसान होऊ नये म्हणून ३ मार्चला आई गेल्यानंतर मी ५ मार्च २००९ ला शूटिंगसाठी हो म्हटलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

हा चित्रपट खूपच इंटरेस्टिंग होता, सात गुन्हेगार जेलमध्ये भेटतात, बाहेर पडल्यानंतर ते त्यांची टोळी तयार करतात, आणि मग त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्यामध्ये कसा बदल होत जातो आणि ते चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करतात.

या चित्रपटामध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून सुबल सरकारांना घ्यावं असा मी राजन प्रभूंना आग्रह केला आणि तो त्यांनी मान्य ही केला, त्यामुळे या चित्रपटांमध्ये सुफल सरकार यांचं नृत्य दिग्दर्शन होतं आणि ते फार सुंदर पद्धतीने त्यांनी केलं, या चित्रपटामध्ये विजय चव्हाण हे देखील होते, त्यांचे शूटिंगचे दिवस कमी जरी असले तरी त्यांनी या चित्रपटांमध्ये खूप धमाल उडून दिली होती, चित्रपटात अशोक सराफ, दीपक शिर्के हे सुद्धा मुख्य भूमितीत होते,

एक कर्मणुकीचा एंटरटेनिंग सिनेमा किंवा मसाला चित्रपट म्हणाला काय हरकत नाही, ज्याच्यात धमाल गाणी नाच मारामाऱ्या बंदुकी गोळ्या, विनोद, इमोशन्स डायलॉग बाजी सगळंच भरभरून होतं, या चित्रपटात काम करताना खरं मजा येत होती,

मराठी चित्रपटाचा दुर्दैव असं की त्याला वितरक नाहीयेत आणि जे वितरक आहेत ते मराठी चित्रपटांच्या दृष्टीने कमकुवत आहेत. लोकांपर्यंत चित्रपट पोचवला जात नाही, त्यांची यंत्रणाच कमी पडते, आणि लोकांपर्यंत चित्रपट पोहोचत नसल्यामुळे निर्मात्याला त्यांनी गुंतवलेले पैसे परत मिळत नाहीत, वितरकाला त्याची फी मिळते, एक्झिबिटरला त्याची फी मिळते, थेटरला आपापली भाडी मिळतात, उरतो कोन तर फक्त निर्माता, ज्याने सगळ्यांचे पैसे दिलेले असतात, पण शेवटी त्याच्या वाटेला त्यांनी टाकलेला पैसा परत येत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे, एक चित्रपट करून पुन्हा कधीही चित्रपट निर्मित न केलेले, किंवा एका चित्रपटातच बरबाद झालेले, असे किती निर्माते आहेत.”

त्यांच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत ‘मराठी चित्रपटांचे दुर्दैव’, ‘आता प्रदर्शित करा’ आदी कामनेट्स करत त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.