डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटल बिल्डिंगमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीनंतर ट्रम्प पुढील चार वर्षांसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये जातील. तिथे त्यांच्या स्वागतासाठी मोठी मेजवानी आयोजीत करण्यात आली आहे. ट्रम्प आपल्या हितचिंतकांन व्हाईट हाऊसमध्ये यासाठी आमंत्रित करणार आहेत. यापुढे ट्रम्प यांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊस असले तरी ट्रम्प त्यांच्या दुस-या निवासस्थानीही कायम दिसणार आहेत. हे दुसरे निवासस्थान व्हाईट हाऊसपेक्षाही अलिशान आहेत. या निवासस्थानाला डोनाल्ड ट्रम्प यांचा राजवाडा म्हणूनही ओळखले जाते. स्वतः ट्रम्प या राजवाड्याला विश्वाचे केंद्र असा उल्लेख करतात. हे ट्रम्प यांचे दुसरे निवासस्थान म्हणजे, पामबीच फ्लोरिडा येथील मार-ए-लागो रिसॉर्ट. (International News)
ट्रम्प यांनी 1985 मध्ये विकत घेतलेल्या या रिसॉर्टमध्ये जगातील सर्व श्रीमंतांची कायम उठबस असते. ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि एक्सचे सीईओ एलॉन मस्क तर या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये कायमस्वरुपी मुक्कामालाच असतात. त्यांच्या अनेक महत्त्वाच्या मिटींग आणि पार्ट्याही याच रिसॉर्टमध्ये होतात. अर्थात या रिसॉर्टमध्ये कोणालाही कधीही जाता येत नाही. कारण या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी त्याचे सदस्यत्व असणे गरजेचे आहे. या आजीवन सदस्यत्वासाठी फक्त 8.50 कोटीची रक्कम मोजावी लागते. अर्थात एवढी रक्कम देऊनही सहजासहजी मार-ए-लागो रिसॉर्ट चे सदस्यत्व मिळत नाही. तर ज्यांनी अर्ज केला आहे, त्या व्यक्तिची सगळी पार्श्वभूमी तपासून पाहिली जाते. त्यात कुठलाही आक्षेपार्ह घटना नसेल तर संबंधित व्यक्तिला मार-ए-लागो रिसॉर्टचे आजीवन सदस्यत्व मिळते. या आजीवन सदस्यत्वासाठी जगभरातील हजारो गर्भश्रीमंत अर्ज करतात. आत्ताही 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये एवढी शानदार पार्टी ठेवण्यात आली आहे की, त्यापुढे व्हाईट हाऊसमधील पार्टी फिकी ठरणार आहे. (Mar-a-Lago Resort)
मार-ए-लागो रिसॉर्ट हे विश्वाचे केंद्र आहे असे वक्तव्य मध्यंतरी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर हे मार-ए-लागो रिसॉर्ट नेमके कुठे आहे, याबाबत उत्सुकता जागी झाली होती. प्रत्यक्षात मार-ए-लागो रिसॉर्ट म्हणजे, वैभवशाली राजवाडाच आहे. या राजवाड्यात जाण्यासाठी करोडो रुपये शुल्क असले तरी येथे कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. जगातील अगदी मोजके मान्यवर या रिसॉर्टचे सदस्य आहेत आणि त्यांनाच येथे प्रवेश देण्यात येतो. ट्रम्प यांच्या कुटुंबियांसाठी या रिसॉर्टमध्ये एक मजला राखीव असून जगातील सर्वात अलिशान सुविधा या रिसॉर्टमध्ये मिळत असल्याची माहिती आहे. (International News)
मार-ए-लागो रिसॉर्टच्या आजीवन सदस्यत्वाचे शुल्क 8.50 कोटी आहे. दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येने श्रीमंत लोक यासाठी अर्ज करतात, परंतु काहींनाच सदस्यत्व मिळते. ट्रम्प यांचे जवळचे सहकारी येथील सदस्य आहेत. त्यात एक्सचे एलॉन मस्क यांचा पहिला समावेश आहे. मस्क यांच्या बहुतेक बिझनेस मिटिंग याच रिसॉर्टमध्ये होतात. मस्क यांची मुलेही याच रिसॉर्टमध्ये कायम दिसतात. याशिवाय मस्क आपल्या मित्रपरिवारालाही याच रिसॉर्टमध्ये पार्ट्या देतात. या रिसॉर्टमध्ये 128 खोल्या, 58 बाथरूम, थिएटर, खाजगी क्लब आणि स्पा यासह अनेक आधुनिक सुविधा आहेत. मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये जगातील गर्भश्रीमंताचा कायम वावर असतो. त्यात मेटा संस्थापक मार्क झुकेरबर्ग, ॲपलचे सीईओ टिम कुक, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस, गुगलचे सह-संस्थापक सर्जे ब्रिन, कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रूडो यांच्यासह इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांचाही समावेश आहे. (Mar-a-Lago Resort)
डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना त्यांनी याच रिसॉर्टमध्ये डिनरसाठी आणले होते. जपानचे अध्यक्ष शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीमार-ए-लागो यांनीही ट्रम्प यांच्यासोबत याच रिसॉर्टमध्ये मेजवानी केली आहे. 2005 मध्ये याच अलिशान रिसॉर्टमध्ये ट्रम्प यांनी मेलानियाशी लग्न केले. या सोहळ्यात बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांच्यासह हॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार सहभागी झाले होते. एवढंच नाही तर ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असतांना त्यांनी याच रिसॉर्टमधून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. एप्रिल 2017 मध्ये सीरियातील एअरफिल्डवर हवाई हल्ल्याचा निर्णय मार-ए-लागो येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच घेण्यात आला होता. 62 हजार 500 स्क्वेअर फूट परिसररात पसरलेल्या 126 खोल्या असलेल्या या राजवाड्यासारख्या रिसॉर्टला ट्रम्प यांनी 1985 मध्ये खरेदी केले आणि त्याच्या पुर्नबांधणीसाठी लाखो डॉलर्स खर्च केले. (International News)
========
हे देखील वाचा : US Visas : अमेरिकेच्या व्हिसाचे किती प्रकार आहेत ?
Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?
======
सध्या मार-ए-लागो येथे असलेल्या क्लबमध्ये 500 पेक्षा जास्त सदस्य आहेत. 2022 मध्ये, फोर्ब्स मासिकानुसार मार-ए-लागो रिसॉर्टची किंमत सुमारे $350 दशलक्ष असल्याचा अंदाज वर्तवला होता. ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेचा सगळा कारभार याच रिसॉर्टमधून पाहिला होता. ट्रम्प कुटुंबियांसाठी या रिसॉर्टचा एक भाग आरक्षित आहे. विशेष म्हणजे, येथेच एलॉन मस्कच्या कुटुंबियांसाठीही एक भाग आरक्षित आहे. असे असले तरी याच रिसॉर्टमुळे ट्रम्प अनेकवेळा वादात सापडले आहेत. या रिसॉर्टजवळ विमानतळ उभारण्यात येत असतांना त्यावर आक्षेप घेऊन खटला दाखल कऱण्यात आला होता. याशिवाय ट्रम्प यांच्यावर या इस्टेटचा वापर घर म्हणून केल्याचाही आरोप आहे. मात्र ट्रम्प यांनी सगळ्या आरोपांना उत्तर देत याच रिसॉर्टमध्ये आपला सर्वाधिक मुक्काम केला आहे. आत्ताही राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ते याच रिसॉर्टमध्ये आपल्या स्नेह्यांना शाही मेजवानी देणार आहेत. (Mar-a-Lago Resort)
सई बने