उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ आंबा आहे. आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात. पण त्याच्या गोडव्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना हे फळ खाण्याची मनाई केले जाते. पण आता त्यांच्यासाठीही एक आनंदाची बातमी आहे, कारण बिहारचा शुगर फ्री आंबा सध्या खूप चर्चेत आहे. (Sugarfree Mango)
देशभरात आंब्याचे एकापेक्षा एक प्रकार उपलब्ध असले, तरी शुगर फ्री आंब्याची बात काही औरच आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेतकरी भूषण सिंग यांची बाग सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या आंब्याचा आकार आणि रंग इतका वेगळा आहे की, तो पाहून येणारे पर्यटक एकदा थांबून तो नक्कीच बघतात. (Sugarfree Mango)
अमेरिकन ब्युटी म्हणून प्रसिद्ध
या शेतकऱ्याचा दावा आहे की, हा आंबा पूर्णपणे साखरमुक्त आहे. या आंब्याच्या जातीचे नाव ‘अमेरिकन ब्युटी’ आहे. ते म्हणतात की, जो कोणी या आंब्याला पाहतो, तो त्याच्या रोपाची नक्कीच मागणी करतो. (Sugarfree Mango)
हे देखील वाचा: हापूसपेक्षाही लोकप्रिय आहे आंब्याची ‘ही’ जात! वाचाल तर थक्क व्हाल
पश्चिम बंगालमधून आणली आहे वनस्पती
मुझफ्फरपूरपासून ६ किमी अंतरावर असलेल्या मुसहारी गावातील रहिवासी शेतकरी भूषण सिंग यांनी ही वनस्पती पश्चिम बंगालमधून आणली आहे. बंगालमधून आणून या आंब्याच्या बिया आपल्या बागेत लावल्याचं ते सांगतात. तसेच, याला ६ वर्षांनी फळं येतात. (Sugarfree Mango)
१६ वेळा रंग बदलतो हा आंबा
भूषण सिंग यांच्या मते, या आंब्याचा देखावा आणि बिया सामान्य आंब्यासारख्याच असतात. पण सुरुवातीपासून पिकण्यापर्यंत हा आंबा १६ वेळा रंग बदलतो. पिकण्याच्या वेळी याचे वजन अर्धा किलोपेक्षा जास्त असते. तसेच साधारणपणे या आंब्याचे वजन चारशे ग्रॅम असते. (Sugarfree Mango)
हे देखील वाचा: महागडं फेशियल परवडत नाही ? मग एकदा आंब्याच्या सालीचा ‘असा’ वापर करून बघा
कोणत्या महिन्यात तयार होतो आंबा?
साखरमुक्त आंब्याचा आकार आणि रंग सामान्य आंब्यांपेक्षा थोडा वेगळा असतो. शेतकरी भूषण सिंग यांनी सांगितले की, हा आंबा पाच महिन्यांत तयार होतो. तसेच, जुलैमध्ये तो पिकून तयार होतो. (Sugarfree Mango)
इतर आंब्यांपेक्षा वेगळी आहे चव
भूषण सिंग यांच्या मते, या आंब्याची चव इतर आंब्यांपेक्षा वेगळी आहे, कारण हा शुगर फ्री प्रकार आहे. यात गोडपणा कमी असतो. कृषी विद्यापीठ समस्तीपूर आणि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर लिची, मुझफ्फरपूरच्या शास्त्रज्ञांनीही हा आंबा चाखला आहे. (Sugarfree Mango)