Home » अयोध्येतील रामलीलेत कलाकारांची मांदियाळी….

अयोध्येतील रामलीलेत कलाकारांची मांदियाळी….

by Team Gajawaja
0 comment
Ram Leela
Share

प्रभूरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीत सध्या मोठी लगबग आहे. रामभक्तांचा येथे मोठा मेळा भरला आहे. दरवर्षी हजारो रामभक्त आपल्या अराध्या दैवताचे दर्शन घेण्यासाठी या पुण्यभूमीत येतात. मात्र नवरात्रीमध्ये रामभक्तांसाठी आणखी एक आकर्षण या अयोध्या नगरीत असते, ते म्हणजे रामलीला (Ram Leela). 

प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील प्रसंग प्रत्यक्षात बघायला सर्वच रामभक्तांना आवडतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ही रामलीला सुरु होते, ती थेटदसऱ्यापर्यंत.  दसऱ्याला  श्रीराम रावणाचा वध करतात आणि या सोहळ्याची समाप्ती होते. भारतात अनेक ठिकाणी रामलीला होतात. मात्र गेल्या तीन वर्षापासून रामनगरी अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलीलेनं रामभक्तांना मोहीत केले आहे. या रामलीलेमध्ये हिंदी चित्रपटातील कलाकारही भाग घेतात. त्याशिवाय, यावर्षीच्या रामलीलेमध्ये तीन खासदार भूमिका करत आहेत, त्यामुळे या अयोध्यानगरीतील रामलीलेची मोठी चर्चा होत आहे.  

गेल्या तीन वर्षापासून होणाऱ्या अयोध्येतील रामलीलेनं  (Ram Leela) लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकंट असतांना ही रामलीला व्हर्च्युअलही झाली. दूरदर्शनवरही रामलीला थेट दाखवण्यात येते. मात्र यावेळी हे सर्व रेकॉर्ड मागे पडतील अशी लोकप्रियता रामलीलेला लाभत आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे लोकप्रिय अभिनेत्यांसह तीन खासदारही यात प्रमुख भूमिकांमध्ये दिसत आहेत. 

यावर्षीच्या रामलीलेत गोरखपूरचे खासदार रवी किशन हे केवट झाले आहेत, तर खासदार मनोज तिवारी हे परशुराम आहेत आणि आझमगडचे खासदार निरहुआ हे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून प्रेक्षकांनी केवळ आभासी रामलीला पाहिली आहे. त्यामुळे यावर्षी रामभक्तांची मोठी गर्दी वाढत आहे. अयोध्येची रामलीला ही जगातील सर्वात मोठी रामलीला ठरली आहे. यात रझा मुराद, बिंदू दारा सिंग, शाहबाज यांच्यासह अनेक कलाकारही भूमिका करत आहेत.  

image credit : zee new

रामलीलेमध्ये श्री रामची भूमिका अभिनेता राहुल भुचर साकारत आहे. अभिनेत्री दिशा रैना सीतेची भूमिका साकारत आहे. दूरदर्शनवर गाजलेल्या महाभारत मालिकेत धृतराष्ट्राची भूमिका करणारे गिरजा शंकर  हे या रामलीलेत (Ram Leela) राजा दशरथाच्या भूमिकेत आहेत. अभिनेते बिंदू दारा सिंह हनुमानाच्या भूमिकेत आहेत.  उपासना सिंग आणि फिल्मी जगतातील अनेक कलाकार रामलीलामध्ये काम करत आहेत. शाहबाज खान रावणाची भूमिका साकारत आहेत. मैने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्री शबरीच्या भूमिकेत आहेत.  

शबरीच्या रुपात भाग्यश्रीला पाहण्यासाठी लक्ष्मण गडाच्या मैदानात प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. सीतेच्या शोधात जंगलात भटकत असताना श्री राम आणि लक्ष्मण शबरीच्या झोपडीत पोहोचतात. परमेश्वराला समोर पाहून शबरी भावूक होते. हा प्रसंग पहातांना उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. गेल्यावर्षी भाग्यश्रीने या रामलीलेत सीतेची भूमिका केली होती. जटायू आणि रावणाच्या युद्धाचा प्रसंग पाहूनही प्रेक्षक भारावून गेले होते. जटायूचे पंख कापल्यावर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रामची आणि जटायूची भेट झाल्यावर राम व लक्ष्मणाने माता सीतेला कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा संकल्प केला तेव्हा उपस्थित हजारो प्रेक्षकांनी जय श्री रामचा जयघोष केला. रामजन्म, तारकावध या प्रसंगातही प्रक्षेकांनी श्रीरामांचा जयजकार केला.  फटाक्यांची आतिषबाजी झाली.  

1600 चौरस फुटांचा भव्य एलईडी संच असलेल्या या रामलीलेचे थेट प्रक्षेपण रात्री 7 ते 10 या वेळेत दूरदर्शनवर होत आहे. डीडी रेट्रो, यूपी दूरदर्शन, राष्ट्रीय YouTube आणि सोशल मीडियावर ही रामलीला थेट बघता येतेय. 2020 मध्ये 16 कोटींहून अधिक लोकांनी आणि 2021 मध्ये 22 कोटींहून अधिक लोकांनी रामलीलेचे प्रक्षेपण थेट पाहिले होते. यावर्षी हा आकडा आणखी वाढणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

=======

हे देखील वाचा : दशाननाच्या प्रत्येक मस्तकाचा आहे अर्थ, जाणून घ्या अधिक

=======

रामलीलेची सुरुवात होण्यापूर्वी यात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांनी श्रीराम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. शहबाज खान अयोध्येतील या रामलीलामध्ये रावणाची भूमिका गेली तीन वर्ष साकारत आहेत.   प्रेक्षकांनाही त्याची ही भूमिका प्रचंड आवडते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थेट अयोध्येत येऊन रामलीला साकारण्याचा जो आनंद मिळतो तो खूप वेगळा आहे. यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रामलीलाचे संस्थापक सुभाष मलिक यांनी सांगितले की, अयोध्येची रामलीला ही जगातील सर्वात मोठी रामलीला ठरली असून दिवसेंदिवस प्रेक्षकांची संख्या वाढत आहे.  अर्थात आपणही या रामलीलेला (Ram Leela) पाहू शकतो.  त्यासाठी दूरदर्शनचा आधार घ्यावा लागेल किंवा थेट अयोध्या गाठावी लागेल.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.