Home » मंदीरा बेदीची ‘ती’ साडी ठरली होती वादग्रस्त ! ही चूक पडली महागात!

मंदीरा बेदीची ‘ती’ साडी ठरली होती वादग्रस्त ! ही चूक पडली महागात!

by Correspondent
0 comment
Mandira Bedi | K Facts
Share

फॅशन जगतात डिझाइनर कपड्यांच्या बाबतीत दररोज नवनवीन प्रयोग करून पाहतात. डिझाइनर कपडे कधी कधी एवढे प्रसिद्ध होतात की सामान्य लोकही डिझाइनर कपड्यांची हुबेहुब कॉपी करतात. तर काही डिझाइनर कपड्यांवर भरपूर प्रमाणात टीका देखील केली जाते. डिझाइनरच्या प्रयोगवर सर्वसामान्य जनता एवढी भडकते की जनतेचा राग शांत करण्यासाठी डिझाइनरला अखेर माफी मागण्याची वेळ येते. काही वर्षांपूर्वीच अशीच एक घटना अभिनेत्री मंदिरा बेदी सोबतही घडली होती. २००७ ची ही गोष्ट आहे. मंदीरा २८ एप्रिल २००७ श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये चाललेव्या अंतिम सामन्याचं होस्टींग करत होती. आणि याच वेळेस तीने परिधान केलेल्या या साडीमुळे तिच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आला.

मंदिरा बेदी (Mandira Bedi) अभिनयासह क्रिकेट संबंधित शो देखील होस्ट करते, हे सर्वांनाच माहिती आहे. असाच एक शो तिनं २००७ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप दरम्यानही केला होता. २८ एप्रिल २००७ श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये अंतिम सामना रंगला होता आणि मॅचसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये मंदिरा होस्टची भूमिका निभावत होती. हा संपूर्ण कार्यक्रम कोणत्याही वादाविना चांगल्या पद्धतीनं पार पडला. पण मंदिरा बेदीच्या डिझाइनर साडीमुळे नागरिक प्रचंड भडकले होते.या साडीवर जवळपास 16 देशांच्या राष्ट्रध्वजाचे प्रिंट होते. यामध्ये आपल्या भारत देशाच्या तिरंग्याचाही समावेश होते. पण आपल्या राष्ट्रध्वजाचे प्रिंट खालील बाजूस होते म्हणजे मंदिराच्या पायांच्या जवळ होते. मंदिरा खुर्चीवर बसल्यानंतर तिच्या पायाचा तळवा तिरंग्याच्या प्रिंटला लागत होता. याच गोष्टीचा भारतीयांना अतिशय राग आला आणि त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

mandira bedi controversy:  when mandira bedi saree with indian flag
mandira bedi controversy: when mandira bedi saree with indian flag

हा वाद इतका विकोपाला गेला होता तिच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर देखील नोंदवण्यात आला होता. वृत्तवाहिन्यांवर ही घटना दाखवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावरही लोकांनी मंदिरावर टीकेचा भडीमार करण्यास सुरुवात केली. मंदिरानं तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप होऊ लागला. तर कित्येक राज्यांमध्ये मंदिरा बेदीविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले. तर काही ठिकाणी मंदिराचे प्रतिकात्मक पुतळे देखील जाळण्यात आले. तसंच तिच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील जोर धरू लागली होती. मंदिराच्या साडीचा वाद देशभरात चिघळला होता तो या डिझाइनमुळेच!

वाद चिघळत असल्याचे पाहून अखेर मंदिरा बेदीला सर्वांसमोर यावं लागलं आणि तिनं याबाबत माफी देखील मागितली. ‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा यामागे हेतू नव्हता’, असं सांगत मंदिरानं जाहीर माफी मागितली होती. केवळ क्रिकेटप्रति असलेल्या एकतेच्या भावनेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रध्वज असलेल्या साडीची निवड केली होती, असं स्पष्टीकरण तिनं दिलं. तसंच नकळत झालेल्या चुकीबाबात मी सर्वांची माफी मागते, असं म्हणत तिनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या साडीचा डिझायनर पुनित नंदा यानेदेखील सर्वांची माफी मागीतली. ‘मंदिरानं साडी नेसल्यानंतर भारताच्या तिरंग्याचं प्रिंट तिच्या पायाजवळ येईल, असं वाटलं नव्हतं’, अशी प्रतिक्रिया नंदा यांनी व्यक्त केली होती.


शब्दांकन – शामल भंडारे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.