आजच्या काळात सोशल मीडियाची ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने व्याप्ती वाढताना दिसत आहे, ते पाहून असे वाटते की, तो दिवस दूर नाही जेव्हा जगात संपर्काचे एकच माध्यम असेल आणि ते म्हणजे सोशल मीडिया. आपल्याकडे एक म्हण आहे ‘एका नाण्याला दोन बाजू असतात’, अगदी तसेच या सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढे तोटे देखील आहेत. सोशल मीडियामध्ये एखाद्या सामान्य माणसाला सेलिब्रिटी बनवण्याची तर सेलिब्रिटीला सामान्य माणूस बनवण्याची मोठी ताकद आहे. आपण पाहिले तर अनेकदा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरतात. एखाद्या कलाकाराचा मृत्यू होणे ही तर अतिशय मोठी मात्र कॉमन अफवा नेहमीच पसरताना दिसते. अगदी मोठमोठे कलाकार देखील या अफवेपासून स्वतःला वाचवू शकले नाही. बरं आता या सोशल मीडियाचे प्रस्थ बघता अनेकदा तर कलाकारानं स्वतः जगासमोर येऊन ते जिवंत असल्याचे सांगावे लागते. वाचताना जरी आपल्याला हसायला येत असले तरी प्रत्यक्षात मात्र ही परिस्थिती हैराण करणारी आहे. आता नुकतीच ही घटना तारक मेहता का उलटा चश्मा फेम अभिनेता मंदार चांदवडकर (mandar chandwadkar)सोबत घडली आहे.
अभिनेता मंदार चांदवडकर(mandar chandwadkar) यांचे निधन झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या बातमीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकांना विश्वात ठेवायला भाग पडल्याचे देखील चित्र आहे. यासाठी ही बातमी अजून मोठी होऊ न देण्यासाठी मंदार चांदवडकर यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन ती स्वस्थ, निरोगी आणि ठणठणीत असून फिरणारी बातमी केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. मंदार यांनी लाईव्ह आल्यानंतर सांगितले की, ““नमस्कार, मला आशा आहे की सर्व काही व्यवस्थित चालले असेल. थोड्या वेळापूर्वी एका व्यक्तीने मला एक बातमी फॉरवर्ड केली होती. त्यामुळेच मला वाटले की लाईव्ह जाऊन सर्वांचा चुकीचा समज दूर करावा. सोशल मीडियावर अनेक अफवा वेगाने पसरत आहेत. मला फक्त हेच सांगायचे आहे की, मी शूटिंग करत आहे. अशा चुकीच्या बातम्या पसरवणे थांबवा. तारक मेहता का उल्टा चष्माचे सर्व कलाकार निरोगी आणि आनंदी आहेत. प्रत्येकाला भविष्यात अधिक चांगले काम करण्याची इच्छा आहे.”(mandar chandwadkar)
सोशल मीडियावर पसरणाऱ्या अशा खोट्या अफवांना बळी पडलेले मंदार हे काही पहिलेच कलाकार नाही. याआधी देखील दिव्यांका त्रिपाठी, मुकेश खन्ना, श्वेता तिवारी, शिवाजी साटम आदी अनेक कलाकारांचे अशा अफवांमधून मृत्यू झाल्याचे पसरवले गेले होते. तत्पूर्वी मंदार चांदवडकर(mandar chandwadkar) हे तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे, अर्थात शिक्षक भिडे ही भूमिका साकारतात. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे तुफान प्रेम मिळते. या मालिकेने मंदार यांना अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे. मागील १३ वर्षांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका अमाप लोकप्रिय आहे. टीआरपीमध्ये देखील ती टॉपवर असते. अशा मालिकेचा भाग असल्याचा मंदार यांना अभिमान असल्याचे ते नेहमीच सांगताना दिसतात.(mandar chandwadkar)