१९७२ साल होतं. परभणी जिल्ह्यात मानवत गावात गावकऱ्यांनी आपल्या दिनचर्यला सुरुवात केली होती. या गावातलीच एक १० वर्षांची चिमूरडी गयाबाई सखाराम गच्छवे, शेणाच्या गोवऱ्या गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडली. घराच्या आसपासच पडलेल्या गोवऱ्या गोळाकरायला ती जात असे. पण त्या दिवशी गयाबाई घरी परतलीच नाही. तिच्या घरच्यांनी तिचा संपूर्ण गावात शोधं घेतला तरी ती सापडली नाही. असे दोनं दिवस उलटले पण गयाबाईचा काही पत्ताच लागला नाही. मग तिसऱ्या दिवशी गावाबाहेर शेताजवळ त्या चिमरडूचा मृत देह आढळला तिचं मुंडकं धडावेगळं केलं होतं, उजव्या हाताची करंगळी मोडलेली होती आणि गुप्तांगावर सुद्धा वार केले होते. गयाबईनंतर अशा प्रकारे एकूण १० हत्या झाल्या. या हत्या का करण्यात आल्या होत्या? हे गुढ जेव्हा उलगडलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरल. काय होतं मानवत गावात घडलेल्या हत्यांचं गूढ जाणून घेऊया. (Manavata Hatyakanda)
मानवत गावात गयाबाई या १० वर्षांच्या चिमूरडीची हत्या झाल्यानंतर तिचा मृत देह गावाबाहेर शेतात सापडला होता. ते शेत होतं उत्तमराव बारहाते यांचं. ही घटना घडून जेमतेम पंधरा दिवस उलटले असतील आणि गावातली आणखी एक पोर गायब झाली, शकीला अल्लाउद्दीन वय ९ वर्ष. ती चुलीसाठी सरपण आणायला बाहेर पडली आणि घरी परतलीच नाही. तिचा मृतदेहही गावाबाहेरच्या शेतात आढळला पुन्हा गुप्तांगावर तशाच जखमा उजव्या हाताची गरंगळी मोडलेली. पोलिस या दोन्ही हत्यांचा शोध घेत होते पण त्यात वेग नव्हता. तपास १ महिना सुरू राहील पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. पण तिथे हत्येखोराच्या हाती आणखी एक शिकार मिळालं. पण यावेळेस शिकार लहान मुलगी नव्हती. ३५ वर्षांची सुगंधा सुंदऱ्या मांग ही पारधी वाड्याजवळ राहणारी महिला वेताच्या टोपल्या विणायची टोपल्या बनवण्यासाठीच ती रानात बांबू तोडायला गेली होती. बांबू तोडायच्या कोयत्यानेच तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. (social news)
आता गावात थोडं भीतीच वातावरण पसरलं होतं. गावात दिवसभर याच गोष्टीच्या चर्चा होत होत्या. काही दिवस सरून गेल्यावर चर्चा शांत व्हायची. मग पुन्हा आणखी एका हत्येचा दिवस उजाडला. आता शिकार होती १० वर्षांची नसीमा सय्यद करीम. पुन्हा तशा प्रकारे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर तपास यंत्रणा खडबडून जागी झाली. या एकसारख्या हत्यांमागे कोणतरी एकच व्यक्ती किंवा एकच समूह असला पाहिजे असा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. १८ जून १९७३ ला उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, भागोजी काळे, दगडू भागोजी काळे या चौघांना ताब्यात घेतलं गेलं. उत्तरमराव बारहते हे गावातील श्रीमंत व्यक्ती होते. त्ते मानवत गावाचे नगरअध्यक्ष सुद्धा राहिले होते. त्यांचा गावात मोठा वाडा होता. रुक्मिणी ही गावापासून थोडं लांब असणाऱ्या पारधी वस्तीत राहणारी होती. तिचं लग्न झालं होतं पण नवऱ्याकडे न नांदता ती वडिलांकडे राहत होती. ती हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय करायची. उत्तमरावांचा रुक्मिणीवर जीव आला आणि त्यांनी तिला गावात एक वाडा विकत घेऊन दिला आणि तिने तिथून हातभट्टीचा व्यवसाय सुरू केला. (Manavata Hatyakanda)
आता हे चौघ जण अटकेत असताना सुद्धा मानवतमध्ये कलावती बोंबले हिचा खून झाला. तिचं लग्न झालं होतं पण त्या तिला मुलं बाळ नव्हतं. आतापर्यंत झालेल्या हत्या बघितल्या तर हत्या झालेल्या अविवाहित किंवा मुलं बाळ नसलेल्या आणि लहान मुली होत्या आणि त्यांचा मृतदेह सुद्धा एका विशिष्ट अवस्थेत आढळून येतं होता. या मागे काही काळी जादू, नरबळी असा प्रकार आहे असा संशय पोलिसांना आला होता. तसा तपास सुरू झाल्यानंतर पुढ ६ वा खून झाला. आता मात्र त्याचे पडसात विधान सभेत उमटले. तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यांनी मुंबईहून सीआयडी आणि इतर वारिष्ठ अधिकारी मानवतला पाठवलं. (social news)
दरम्यान मानवत मध्ये हत्या काही थांबत नव्हत्या आता खून झाला होता एका माणसाचा कोंडीबा रिळे असं त्याचं नाव. शिवाय पार्वती बारहाते या महिलेचा सुद्धा आणि सगळ्या गंभीर म्हणजे या प्रकरणातील शेवटचे खून. शेतावर नवऱ्याला जेवण घेऊन निघालेली हरिबाई बोरवणे, तिची ९ वर्षांची मुलगी तरामती आणि कडेवर होती काही महिन्यांची कमल. बांधा वरुन जात असताना अचानक कुऱ्हाडीचा घाव हरिबाईच्या डोक्यात बसला कडे वरची पोरं खाली पडली आणि त्या तिघी जणिंचा खून झाला हा खून होताना मात्र गावतल्या उमाजी पितळेने बघितलं. या हत्यांच्या तपसणीचे सूत्र मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी, राज्याच्या गुन्हे अन्वेक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक एन. एम. वाघमारे तसंच क्राइम ब्रँचमधीलच अधिकारी विनायक वाकटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. कोंडीबाचा खून होण्याआधी तो रुक्मिणीची बहीण समिंदरीसोबत दिसला होता. पोलिसांनी समंदरीला अटक केली आणि मग या हत्याकांडाच रहस्य उलगडलं. (Manavata Hatyakanda)
उत्तमराव बारहाते यांनी रुक्मिणीला वाडा घेऊन दिल्यानंतर दारूच्या धंद्यामुळे रुक्मिणीकडे बक्कळ पैसा आला होता. पण ती सु:खी नव्हती. कारण तिला मुलं होतं नव्हतं. त्यावेळेस या गावाच्या आसपास अनेक तांत्रिकांचा डेरा असायचा. रुक्मिणी आणि उत्तमरावने अशाच एका तांत्रिकाला वाड्यावर बोलवलं आणि मुलं होण्यासाठी उपाय सुचवायला सांगितलं. त्या वाड्यात एक पिंपळाच झाड होतं. त्या तांत्रिकाने सांगितलं की या झाडावर मुंज्या आहे आणि त्याला तरुणमुली आवडतात. मुंजा हा एक ब्राह्मण होता जो लग्न होण्यापूर्वीच मेला. अशी आख्यायिका आहे. या मुंज्याला तरुण मुलींचं रक्त दिलं म्हणजेच बळी दिला तर तो खुश होईल आणि तुला मुलं देईल. मग काय सुरू झाला नरबळीच्या थोतांडाचा भयानक खेळं. रुक्मिणीसाठी हत्या करणारे होते उत्तमरावचे नोकर शंकर काटे आणि सोपान थोटे ते हत्या करायचे आणि रुक्मिणीला रक्त त्यांचं रक्त पुरवायेचे. (social news)
=================
हे देखील वाचा : अजमेर बलात्कार प्रकरण !
================
पुढे या प्रकरणात त्या तांत्रिकासह १८ जणांना अटक करण्यात आली. उत्तमराव आणि रुक्मिणीला तर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केली आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. इतक्या मुलींचा आणि माणसांचा जीव घेतल्यानंतरही हे दोघ निर्दोष सुटले. रुक्मिणीला तर मुलगी सुद्धा झाली. पण चार जणांना या हत्याप्रकरणात फाशीची शिक्षा झाली.
अंधश्रद्धेमुळे या अशा घटना घडतात इतकी वर्ष या घटना घडून सुद्धा त्यावर कुठला ही कायदा आपल्याकडे नव्हता. २०१३ अंधश्रद्धा, नरबळी, जादूटोणा या घटनांविरुद्ध कायदा तयार करण्यात आला. त्याच श्रेय जातं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना कायदा आला म्हणून असे अघोरी प्रकार कमी झाले पण पूर्णपणे बंद नाही. (Manavata Hatyakanda)