Home » मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Manasi Naik Post
Share

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मानसी नाईक ओळखली जाते. अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारणाऱ्या मानसीने आपल्या भन्नाट नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांवरचा तिचा डान्स आणि अदा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मानसीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोशल मीडियावर देखील मानसीचा वावर भरपूर आहे. ती सतत तिच्या आयुष्याशी संबंधित विविध गोष्टी, तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत फॅन्सला अपडेट देत असते. सोशल मीडियामुळे ती जास्त चर्चेत असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मागील काही महिन्यांपासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त गाजताना दिसत आहे. तिने बॉक्सर प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला आणि सगळ्यांनाच धक्का बसला होता. अतिशय चुकीच्या नात्यात ती होती आणि म्हणूनच तिने ते नाते संपवल्याचे सांगितले.

मात्र काही दिवसांपूर्वीच मानसीच्या पहिल्या नवऱ्याने अर्थात प्रदीपने पुन्हा साखरपुडा करत त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. याबद्दल खूपच चर्चा झाली. आता मानसीने प्रदीपच्या साखरपुड्यावर उपरोधात्मक एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट आणि यासोबत तिने तिचे काही फोटो शेअर केले आहे, जे कमालीचे व्हायरल झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आपल्याला काहीतरी मिळते असा विचार करत कोणत्याही गोष्टीवर सेटल होणाऱ्या लोकांच्या या जगात एकटे राहण्यासाठी खूप हिंमत असावी लागते. आयुष्यात प्रार्थना, प्राधान्यक्रम, शांतता, सकारात्मकता, संयम अर्थात (Prayer, Priorities, Peace, Positivity, Patience) या पाच ‘P’ वर कायम ठाम राहा. जोपर्यंत तुम्हाला सुयोग्य कोणी मिळत नाही तोपर्यंत एकटे राहा, सेटल होऊ नका.

प्रेम मिळेल असा विश्वास ठेवा, चांगल्या प्रेमासाठी प्रार्थना करा, प्रेमाची स्वप्ने पाहा मात्र प्रेम मिळेल म्हणून त्याची वाट पाहण्यात तुमचे आयुष्य आहे तिथेच थांबवू नका. अयोग्य, चुकीच्या माणसासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे अधिक चांगले आहे. या वर्षात मी हरले, जिंकले, पराजित झाले, रडले, हसले, प्रेम केले मात्र मी हार मानली नाही, झुकले नाही. कणखर स्त्रिया कधीच हार मानत नाहीत.

======

हे देखील वाचा : सोनाली कुलकर्णीचे आकर्षक फोटोशूट

======

एखाद्या वेळेला आपल्याला कॉफी प्यावी असे वाटेल, रडावेसे वाटेल नाहीतर एखादा दिवस काहीही काम न करता अंथरुणात पडून राहावे असे वाटेल. मात्र या सगळ्यानंतर स्त्रिया अधिक ताकदीने परततात. मी माझ्या वेदना मी एक देवी आहे असे समजून सहन केल्या. मी मागे वळून कधीच पाहत नाही पाहणार देखील नाही, मी कधीही हार मानणार नाही… कधीही नाही. चीयर्स टू बीइंग मी.”

मानसी नाईकच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तिला अजून स्ट्रॉंग राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मानसी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून लांब आहे. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय आहे. लवकरच तिच्या फॅन्सला तिला चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.