९० च्या दशकात बॉलीवूडचे ३ खान, अर्थात सलमान, शाहरुख, आमिर यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. म्हणजे तशी ती ह्या ना त्या कारणाने अधूनमधून चर्चेत असतेच, पण ह्यावेळी तिच्या चर्चेचं कारण ठरलय महाकुंभ मेळा ! कारण ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. तिने महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे. पण या ममताचा बॉलीवूड ते संन्यासी हा प्रवास नेमका कसा होता ? तिने संन्यास घेताना किन्नर आखाड्याचीच का निवड केली? जाणून घेऊ. (Mahakumbh Mela)
ममता कुलकर्णीचा (Mamta Kulkarni) बॉलीवूडमधला प्रवास सुरु झाला तो 1992 च्या ‘तिरंगा’ चित्रपटातून ! राज कुमार आणि नाना पाटेकर यांच्यासारख्या दमदार हिरोंसोबत तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. ९० च्या दशकातली बोल्ड & ब्युटीफुल अभिनेत्री अशी तिची ख्याती होती. याच ९० च्या दशकात अशांत, क्रांतीवीर, बाजी, आशिक आवारा, वक्त हमारा है या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिकांनी तिला बॉलीवूड आयकॉन म्हणून स्टारडम मिळवून दिला. पण सप्टेंबर 1993 मध्ये ममता कुलकर्णी एका मॅगझिन फोटोशूटमध्ये टॉपलेस पोझ करताना दिसली, तेव्हा ती वादात सापडली. या सगळ्यादरम्यान तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, बंगाली, मराठी या चित्रपटांमध्ये सुद्धा कामं केली आहेत. एकंदरीत तो काळ ममता कुलकर्णी गाजवत होती. पण ममता ज्या स्पीडमध्ये पुढे आली, त्याच स्पीडनं बाजूलाही गेली. कारण 2002 मध्ये आलेला ‘कभी तुम कभी हम’ हा तिचा हिंदीतील शेवटचा चित्रपट होता.
२००३ पासून जवळपास १० वर्ष मीडियापासून लांब असलेली ममता २०१३ मध्ये पुन्हा चर्चेत आली ती तिच्या लग्नामुळे. तिचं लग्न विकी गोस्वामी सोबत झालं. विकि हा छोटा राजनच्या अंमली पदार्थांचं नेटवर्क सांभाळणारा माणूस होता. त्यामुळे ममताच सुद्धा connection अंडरवर्ल्डशी जोडण्यात आलं. या नादात तिला अटकसुद्धा करण्यात आली. २०१७ साली तिला मुंबई पोलिसांनी २००० कोटींच्या अमली पदार्थांच्या तस्करीत विकीला मदत केल्यामुळे अटक केली होती. दरम्यान, २०२४ साली मुंबई उच्च न्यायालयाने तिच्यावरचा हा आरोप फेटाळलाय. दरम्यान २००० ते २०२४ या काळात ती भारतापासून दूर राहिली. (Mamta Kulkarni)
पण आता, म्हणजेच २०२५ च्या सुरुवातीलाच, तब्बल २५ वर्षानंतर ती भारतात परत आली आहे आणि आल्या आल्या ती मीडियाचं लक्ष बनली आहे. याच कारणही तसंच आहे. ते म्हणजे यंदाच्या महाकुंभामध्ये तिने संन्यास घेतला आहे आणि नुकतीच ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. दरम्यान, तिने शुक्रवारी प्रयागराजमध्ये पिंडदान केल असून, तिचं नावही बदलण्यात आलं आहे. तिचं नवीन नाव यमाई ममता नंदगिरी असं आहे.
==============
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : ठाकरेंचा स्वबळाचा नारा स्मार्ट मूव्ह की मोठी रिस्क?
==============
तिने किन्नर आखाडा स्वीकारण्याचं कारण म्हणजे, किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जगता येतं. यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते. दरम्यान किन्नर आखाड्याची स्थापना २०१५ साली करण्यात आली. ही एक हिंदू धर्माची संघटना आहे. तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समानता आणि मान्यता देणं हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे. आता ममता कुलकर्णीची या आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाली आहे. (Mamta Kulkarni)
त्यामुळे या आखाड्याला त्यांचा संदेश अधिक वेगानं पसरवण्यासाठी मदत होणार आहे, असं या आखाड्यातील लोकांचं म्हणणं आहे. पण इतर आखाड्यातील साधूंचा तिच्या महामंडलेश्वर बनण्याला विरोध करत आहेत. हा संन्यास आहे की स्टंट… असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तब्बल 25 वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर ती आता सिनेमाच्या ग्लॅमरपासून दूर असलेल्या क्षेत्रात पाऊल ठेवतेय. त्यामुळे आता प्रसद्धि, संपत्ती या सगळ्याचा त्याग करत पुन्हा एकदा चर्चेत आलेली ममता किती काळ लोकांच्या लक्षात राहते हे पाहण्यासारखं आहे !