देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही स्वप्नांचे शहर असल्याचे प्रत्येकालाच वाटते. या शहरात येणारा प्रत्येकजण आपले एक स्वप्न घेऊन येतो. पण मुंबईतील हे असे एक शहर जेथे स्वप्न पूर्ण होतातच. मुंबई तुम्हाला वाट पहायला लावते पण जेव्हा ती आपले हात पसरवते तेव्हा तुम्हाला येथील संपूर्ण लोक तुम्हाला नावासह ओळखू लागतात. अशातच मुंबईतील एका मुलीचे नशीब पालटल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. मलीशा असे तिचे नाव आहे.(Maleesha Kharwa)
मलीशा ही केवळ 14 वर्षाची असून धारावीत राहणारी आहे. आता ती एक स्टार बनली आहे. नुकत्याच एका लोकप्रिय स्किनकेअर ब्रँन्डसाठी तिची निवड केली गेली होती. तिला फॉरेस्ट एसेंशियल्सचे नवे अभियान युवती सेलेक्शन्ससाठी निवडण्यात आले होते. मलीशाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल हो आहे. खरंतर सामान्य परिवारातून आलेली मलीशाची आता एका प्रसिद्ध ब्युटी ब्रँन्डची अॅम्बेसेडर झाल्याने फार आनंदीत आहे.

एका रिपोर्ट्सनुसार, मलीशाचे मॉडलिंग करियर 2020 पासून सुरु झाले होते. त्यावेळी तिला हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅनने स्पॉट केले होते. खरंतर रॉबर्ट मुंबईत एका म्युझिक व्हिडिओच्या शूटसाठी आला होता. तेव्हाच त्याने मलीशाला पाहिले होते. त्याने मलीशाच्या मदतीसाठी एक क्राउड फंडिंग अकाउंट सुद्धा बनवले. याच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 10.7 लाख रुपये जमवले.
मलीशाने काही मॉडलिंग इवेंट्स मध्ये सुद्धा भाग घेतला होता. त्याचसोबत ती एक शॉर्ट फिल्म Live Your Fairy Tale मध्ये सुद्धा झळकली होती. मलीशाचे असे म्हणणे आहे की, फॉरेस्ट एसेंशियल्सच्या कॅम्पेनचा हिस्सा असणे तिच्यासाठी फार महत्वाचे आहे. सध्या ती मॉडलिंगसोबत आपल्या अभ्यावर ही लक्ष देत आहे.
इंग्रजी हा तिचा आवडीचा विषय आहे. तिला इंग्रजीत बोलणे फार आवडते. तिचे असे म्हणणे आहे की, जेव्हा शाळेत उत्तम ग्रेड मिळाल्यानंतर तिचे वडिल खुप आनंदित होतात. तिला चाइल्ड मॉडेल व्हायचे आहे. तसेच तिला एका पक्क्या घरात, उत्तम जेवण आणि उत्तम शिक्षण घेण्यासाठी पैशांची बचत करायची आहे. (Maleesha Kharwa)
हेही वाचा- दिव्यांग असलेल्या हरि बुद्धा मागरने माउंट एवरेस्ट सर करत रचला इतिहास
मलीशाच्या इंस्टाग्रामवर दोन लाखांपेक्षा ही अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे मॉडलिंगचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आहेत. तिच्या या फोटो-व्हिडिओला खुप पसंद केले गेलेय. मलीशाच्या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्यूज आहेत.