एकीकडे दाक्षिणात्य इंडस्ट्री त्यांच्या चित्रपटांच्या जोरावर नवनवीन शिखरं गाठत आहे. कमाईचे मोठमोठे रेकॉर्ड बनवत असताना दुसरीकडे मात्र या इंडस्ट्रीला गालबोट लागेल अशी बातमी समोर आली आहे. मल्याळम इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता असलेल्या विजय बाबू संदर्भात. मीडिया रिपोर्ट्सनुसार केरळ पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून विजय बाबूवर लैंगिक शोषणाची केस दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ एप्रिल रोजी त्यांच्याकडे एक महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी विजय बाबू (vijay babu) विरोधात केस नोंदवून घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय बाबूने (vijay babu) कोचीच्या एका फ्लॅटमध्ये त्या पीडित महिलेचे लैंगिक शोषण केले. कोझिकोड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या या महिलेने सांगितले की, एकदा नाही तर अनेकदा तिचे विजय बाबूने शोषण केले. चित्रपटांमध्ये भूमिका देणार असे वचन विजयने त्या महिलेला दिले होते, मात्र ते त्याने कधीच पूर्ण केले नाही. ही तक्रार दाखल होऊन आतापर्यंत पाच दिवस झाले आहेत, मात्र अजूनही पोलिसांनी विजय बाबुला चौकशीसाठी बोलवले नाही.
नक्की हा विजय बाबू (vijay babu) आहे तरी कोण?
विजय बाबू हा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय मोठा अभिनेता आणि निर्माता आहे. विजय बाबूचे ‘फ्राइडे फिल्म हाऊस’ नावाने एक प्रॉडक्शन हाऊस असून त्याने या माध्यमातून त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याला अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित देखील केले गेले आहे. आता हा आरोप झाल्यानंतर आणि तक्रार दाखल झाल्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीमध्ये अक्षरशः भूकंप आला आहे.
या आरोपांवर विजय बाबू काय म्हणाला?
या सर्व आरोपांवर मल्याळम सुपरस्टार विजय बाबूचे (vijay babu) अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. विजय बाबूने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून फेसबुक लाईव्ह घेत सांगितले की, “मी काहीच चुकीचे काम केले नाही त्यामुळे मी अजिबात घाबरत नाही. मी आता पीडित आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप लावले तिला मी २०१८ सालापासून ओळखतो.”
=======
हे देखील वाचा – सिनेरसिकांसाठी मे महिना ठरणार पर्वणी, प्रेक्षकांना मिळणार अनेक बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटांची मेजवानी
=======
सुरुवातीला मीडियामध्ये काम करणारा विजय बाबू (vijay babu) सूर्य टीव्हीमध्ये व्हॉईस प्रेसिडेंट होता. त्यानंतर २०१३ साली त्याने मीडिया सोडून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्याने पेरुचाजी, होम, मुद्दुगौ, अडू आणि अडू २ आदी हिट सिनेमे केले असून, तो विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे.