भारतातील प्रत्येक क्षेत्राची आपली एक वेगळी परंपरा असते. अशातच एक वेगळी परंपरा असणारी गाव देशात खुप आहेत. पण हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील गाव खास आहे. कुल्लू जिल्ह्यातील मलाणा गावात वेगळे कायदे आहेत. या गावात पर्यटकांना कोणत्याही गोष्टीला हात लावण्यास बंदी आहे. येथे लावण्यात आलेल्या नोटीसीत असे लिहिले आहे की, जर बाहेरच्या लोकांनी येथील कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यास त्यांना १ हजारांचा दंड भरावा लागतो. हा दंड २ हजारांपर्यंत सुद्धा असू शकतो.(Malana Village)
मलाणा गावात ही बंदी ऐवढी कठोर आहे की, बाहेरुन फिरण्यासाठी आलेल्या लोकांना दुकान ठेवण्यात आलेल्या गोष्टींना सुद्धा हात लावण्याची परवानगी नाही. येथे येणारे पर्यटक खाण्यापिण्याचे सामान खरेदी करण्यासाठीचे पैसे दुकानाबाहेर ठेवतात. त्यानंतर दुकानदार त्यांना जी गोष्ट हवी आहे ती देतो.
मलाणा गावात केवळ हिच खासियत नाही. तर येथील संविधान सर्वाधिक जुने असल्याचे मानले जाते. यांचे स्वत:चे असे कायदे आहेत. जे कठोर गुन्हाच्या अधीन आहेत. यामुळे येथे लोक भारतीय संविधानाला मानत नाहीत. यांना जगातील सर्वाधिक जुने लोकशाही असलेले गाव मानले जाते. डोंगरांनी घेरलेले मलाणा गाव हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात आहे. या गावात आपले स्वत:चे संसद ही आहे. येथे संसदेची लहान-मोठे सदन आहेत. मोठ्या सदनात ११ सदस्य असतात, ज्यामध्ये गावातील ८ सदस्यांची निवड केली जाते. अन्य तीन स्थायी सदस्य कारदार, गुर आणि पुजारी असतात. सदनात प्रत्येक घरातील एक सर्वाधिक वृद्ध सदस्य असतो.(Malana Village)
हे देखील वाचा- जगातील ‘हे’ बेट प्रत्येक ६ महिन्याला बदलते देश
कुल्लू जिल्ह्यातील मलाणा गावातील संसदेच्या मोठ्या सदनात जर एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास तर पुन्हा संपूर्ण संसदेचे गठन होते. या व्यतिरिक्त गावात कायदे व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून आपले कायदे, ठाणेदार आणि अन्य प्रशासकीय अधिकारी आहेत. मलाणा मध्ये संसदेचे कार्यवाही चौपालच्या रुपात होते. यामध्ये मोठ्या सदनात सुद्धा ११ सदस्य वरच्या बाजूला बसतात. तर लहान सदनाचे सदस्य खाली बसतात. गावा संदर्भातील नियम घेण्याचे काम सदनातच होते. जर सदन कोणताही निर्णय घेऊ शकत नसेल तर जमलू देवता याचा निर्णय घेतात. येथील लोक जमलू ऋषींना देवता मानत पुजा करतात. गावातील लोकांसाठी यांचा निर्णय हा अंतिम असतो.