Home » अर्जुन कपूरच्या बर्थ डेला मलायकाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण

अर्जुन कपूरच्या बर्थ डेला मलायकाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण

by Jyotsna Kulkarni
0 comment
malaika arora shares cryptic note on arjun kapoor bday
Share

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेले आणि प्रचंड लाइमलाइट मिळवणारे कपल म्हणून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. दोघेही त्यांच्या रिलेशनशिप पेक्षा त्यांच्यात असणाऱ्या वयाच्या अंतरामुळे आणि मलायकाच्या घटस्फोटित असण्यामुळे जास्त चर्चेत येतात. मलायकाचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर ती अर्जुनसोबत नात्यात होती. या दोघांना मीडियाने सतत स्पॉट केले.

मलायका आणि अर्जुन विविध ट्रिप, डिनर, आऊटिंगसाठी नेहमीच एकत्र दिसायचे. मात्र मधल्या काही काळापासून या दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याचे समोर येत होते. याबद्दल या दोघांनी कधीच खुलेपणाने त्यांचे मत मांडले नाही. मात्र सोशल मीडियावरील पोस्टमधून अनेकदा मलायका आणि अर्जुन ते एकत्र असल्याचे आणि त्यांचे नाते सुरक्षित असल्याचे सांगायचे.

दरम्यान आज अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस. त्याला आज संपूर्ण जगभरातून त्याचे फॅन्स आणि शुभचिंतक वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र त्याची जवळची मैत्रीण असणाऱ्या मलायकाने मात्र त्याला शुभेच्छा न देता एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टवरून आता त्या दोघांचे ब्रेकअप झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हे देखील वाचा : 28 वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमातील सीनमुळे नाना पाटेकर आणि संजय लीला भंन्साळींमध्ये झाला होता वाद

दरम्यान मागील अनेक वर्षांपासून ते दोघं एकमेकांचा वाढदिवस आणि इतर स्पेशल डे ते मोठ्या आनंदाने साजरे करायचे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट देखील कमालीच्या व्हायरल व्हायच्या. मात्र आता हा अर्जुनाचा पहिला असा वाढदिवस असेल जेव्हा मलायका त्याच्यासोबत नाही आणि तिने अशी एक वेगळ्याच आशयाची पोस्ट शेअर केली आहे.

malaika arora shares cryptic note on arjun kapoor bday

हे देखील वाचा : लग्नानंतर सासरी आलेल्या सोनाक्षी सिन्हाला पती जहीर इकबालने दिले ‘हे’ महागडे गिफ्ट, किंमत ऐकाल तर व्हाल चकित

मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “मला असे लोकं आवडतात, ज्यांच्यावर मी डोळे बंद करून आणि त्यांच्या पाठीमागे देखील विश्वास ठेऊ शकते.” या पोस्टला तिने कोणतेही कॅप्शन दिले नाही आणि कोणाचे नाव देखील लिहिले नाही. मात्र या पोस्टवरून तिने ही पोस्ट अर्जुनसाठी लिहिली असल्याचे कयास लावले जात आहे.

यावरून आता पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण आले आहे. मधल्या काही काळापासून मीडियामध्ये सतत त्यांच्या ब्रेकअपबद्दल बातम्या येत होत्या. ही पोस्ट आता त्यांचे नाते संपुष्टात आल्यानेच सांगत आहे असे वाटत आहे.

तत्पूर्वी मलायका आणि अर्जुन यांनी त्यांचे नाते २०१९ साली सार्वजनिक केले होते. त्याआधीपासूनच त्यांच्या नात्याबद्दल बोलले जायचे.

हे देखील वाचा : आरोपांचा काही फरक…” बऱ्याच वर्षांनी लैंगिक छळाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिली प्रतिक्रिया


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.