Makeup Tips : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशातच मेकअप कसा करावा याबद्दल थोडी काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने मेकअप केल्यास तुमचा लुक बिघडला जाईलच. पण तुमचा आत्मविश्वासही कमी होईल. असो, नवं वर्षाच्या स्वागतासाठी एखाद्या पार्टीला जाणार असल्यास मेकअप संदर्भातील काही टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत.
काहीजणींना मेकअप करायला खूप आवडतो. हिवाळ्यात तुम्ही पार्टीसाठी ग्लॉसी मेकअप ट्राय करू शकता. या मेकअपमुळे तुमचा लुक अधिक खुलला जाईल.
चेहरा करा स्वच्छ
कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्यापूर्वी तुम्ही चेहरा स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. यासाठी एखादे सौम्य फेसवॉशचा वापर करू शकताय. याशिवाय एक्सफोलिएशन केल्यास त्वचेवरील मृत त्वचा निघण्यास मदत होईल.
प्राइमर आणि फाउंडेशन
मेकअप एक्सपर्ट्सच्या मते, हिवाळ्यास ग्लॉसी मेकअप करण्यासाठी त्याचा बेस योग्य असणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्या स्किननुसार प्राइमर लावा. जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकून राहिल. यानंतर चेहऱ्यावर ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने हाइड्रेटिंग लिक्विड फाउंडेशन अप्लाय करा.
ब्लश आणि हाइलाइटर
गाल किंवा टोकदार नाक अधिक सुंदर दिसावे म्हणून तुम्ही ब्रॉन्जरचा वापर करू शकताय यानंतर गालांवर पीच शेडचा क्रिमी ब्लश अप्लाय करा. तसेच कपाळावर थोडं लिक्विड हाइलाइटर लावा. (Makeup Tips)
मिनिमल आय मेकअप
डोळ्यांसाठी रोज गोल्ड किंवा सिल्वर आयशॅडो शेड लावा. अथवा आयशॅडोवर आय सेफ क्लिअर लिप ग्लॉस किंवा वॅसलिन लावा. जेणेकरुन डोळे चमकदार दिसतील.
ओठांची काळजी घ्या
आपल्या ओठांवर सर्वप्रथम हाइड्रेटिंग लिपबाम लावा. यानंतर पीच शेडची लिपस्टिक लावा. यावर हाय-शाइन लिप ग्लॉसचा वापर करा.