Make up kit tips- मेकअप करणे तर प्रत्येक तरुणीला-महिलांना आवडते आणि त्या या कामामध्ये हुशार असतात. मेकअपचा योग्य वापर करुन तुम्ही तुमचे सौंदर्य अधिक खुलवता. परंतु तुमची एखादी चूक सुद्धा तुमचा पूर्ण लूक हा बिघडवू शकतो. बहुतांश मुलींना अशी समस्या असते की, आपल्याकडे ब्युटी प्रोड्क्टस आहेत पण त्यांचा योग्य वापर कसा करावा हे त्यांना कळत नाहीत. त्यामुळेच आम्ही तुम्हाला मेकअपच्या कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात आणि त्यांचा योग्य प्रकारे कसा वापर केला पाहिजे याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात मेकअपचा किट योग्य पद्धतीने कशी वापरावी.
मेकअप किटमध्ये काय-काय असायला पाहिजे?
मेकअप करणे ही एक कला आहे जी आपले सौंदर्य अधिक खुलवते. परंतु मेकअपचा योग्य वापर न केल्यास तुमचा लूक बिघडेल आणि तुमची मेकअप करण्याची इच्छा ही होणार नाही. पण तत्पूर्वी आपण मेकअप किट मध्ये अशा कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत याबद्दल पाहू.
तुमच्या मेकअपकिटमध्ये पुढील काही गोष्टी जरुर असू द्या-
क्लिंजिंग मिल्क, प्राइमर, कंसीलर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पाउडर, ब्लश, हायलाइटर, कोंटोर पॅलेट, आयब्रो पेन्सिल, काजळ, आयलाइनर, आय शॅडो पॅलेट, मस्करा, लिप लाइनर, लिपस्टिक, मेकअप ब्रेश सेट, नेल पेंट, नेलपेंट रिमूव्हर किंवा थिनर, टिकली आणि सेटिंग स्प्रे.
मेकअप किटमध्ये असलेल्या ‘या’ काही महत्वाच्या गोष्टी कशा पद्धतीने वापराव्यात?
-क्लिंजिंग मिल्क
त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लिंजिंग मिल्क फार महत्वाचे आहे. याचा वापर चेहरा स्वच्छ करण्यसाठी केला जातो. क्लिजिंग मिल्क हे आपल्या चेहऱ्यावर १-२ मिनिटे मसाज कारावे. त्यानंतर कॉटन बॉलच्या मदतीने चेहरा पुसून घ्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करावा. क्लिंजिंगचा उपयोग हा चेहऱ्यावरील घाम, मेकअप आणि धूळ स्वच्छ करण्यासाठी केला जातो.
–मॉइस्चराइजर
वृक्ष त्वचा दूर करण्यासाठी मॉइस्चराइजरचा वापर केला जातो. यामुळे चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. तसेच मेकअप ड्राय सुद्धा होत नाही. मॉइस्चराइजर लावल्यानंतर दोन मिनिटांनी मेअकअप किटमधील कोणतेही प्रोडक्ट्स तुम्ही लावू शकता.(Make up kit tips)
हे देखील वाचा- झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनिटे करा ‘अशी’ स्ट्रेचिंग, रहाल दिवसभर फ्रेश
-प्राइमर
ओपन पोर्स बंद किंवा भरण्यासाठी मेकअप पूर्वी प्राइमरचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे मेकअप अधिक वेळ टिकून राहतो. प्राइमर त्वेचेसोबत ब्लेंन्ड होण्यासाठी काही वेळ लागतो. अशातच ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्याला जर तुम्ही प्रायमर लावले असेल तर ५ मिनिटे थांबा.
-कंसीलर
कंसीलरचा उपयोग डोळ्यांखालील डार्क सर्कल्स किंवा डाग लपवण्यासाठी केला जातो. नेहमीचे आपल्या त्वचेनुसार कंसीलरची निवड करण्याचा सल्ला दिला जातो.
-फाउंडेशन
डल त्वचेला तेज आणण्याचे काम फाउंडेशन करते. याचा वापर करताना लक्षात ठेवा की, फाउंडेशन हा तुमच्या स्किन टोन नुसारच असायला पाहिजे.मेकअपचा बेस तयार करण्यासाठी फाउंडेशनचा वापर केला जातो.