Home » डिसेंबरच्या सुट्टीमध्ये हा खास प्लॅन नक्की करा!

डिसेंबरच्या सुट्टीमध्ये हा खास प्लॅन नक्की करा!

by Team Gajawaja
0 comment
December holidays
Share

नोव्हेंबर महिना चालू झाला आहे आणि काहींना वेड लागले आहेत ते डिसेंबरच्या सुट्टीचे(December holidays), नवीन वर्षाचे.  येणारे नवीन वर्ष कुठे साजरे करायचे याचे प्लॅन सुरु आहेत.  फिरायला कुठे जायचं यासाठी शोधाशोध सुरु आहे.  कुठे बर्फवृष्ठी चालू आहे, तर कुठे पाऊस आहे. अशात नेमकं फिरायला कुठे जायचं हा प्रश्न कोणाला पडला असेल तर त्यांच्यासाठी गुजरात हा उत्तम पर्याय असू शकतो. गुजरातमध्ये चालू असलेला रण महोत्सव हा पर्यटकांना आकर्षित करीत आहे.  कच्छच्या रणात होणारी सहल सांस्कृतिक उत्सव, डेझर्ट सफारी, हॉट बलून राइड आणि स्थानिक पदार्थांच्या मेजवानींचा आनंद येथे मिळणार आहे.  यासोबतच गुजरातमधील अन्य पर्यटन स्थळांमध्येही पर्यटकांसाठी भरपूर सुविधा असल्यानं सध्या गुजरात हे पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. नवीन वर्षी साजरं करण्यासाठी या पर्यटन स्थळांवर खास सजावटही करण्यात येत आहे.  (December holidays)

डिसेंबर महिन्यात(December holidays) पर्यटनासाठी गुजरातचे कच्छ सर्वोत्तम पर्याय आहे. ज्यांना कडाक्याची थंडी नको असते, अशी मंडळी समुद्र किनारे किंवा मैदानी प्रदेशांना पहिली पसंती देतात. गुजरातच्या कच्छमध्ये तापमान 12-25 अंश सेल्सिअसपर्यंत असते.  हे तपमान पर्यटकांना सुखावते.  त्यामुळेच कच्छमधील ऐतिहासिक वास्तू, लेणी आणि अनेक पौराणिक मंदिरांना भेटी देण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. याशिवाय कच्छच्या वाळवंटांचे दिवसा आणि रात्री उजळणारे सौदर्य बघण्यासाठी आणि वन्यजीव अभयारण्ये बघण्यासाठीही पर्यटकांची संख्या वाढत आहे.  

गुजरातमध्ये दरवर्षी होणारा रण महोत्सव हा पर्यटकांसाठी विशेषतः परकीय पर्यटकांसाठी आकर्षून घेत आहे. कच्छच्या रणामध्ये दरवर्षी रण महोत्सवाचे आयोजन केले जाते.  यामध्ये, स्थानिक कलाकुसरीच्या वस्तूंची खरेदी, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याव्यतिरिक्त डेझर्ट सफारी, हॉट बलून राइड आदी अनेकांचा समावेश आहे.  हा रण महोत्सव नोव्हेंबर पासून सुरु होतो.   20 फेब्रुवारी 2023 पर्यंत हा रण उत्सव पर्यटकांसाठी एक अद्भुत संधी असते.  या रण महोत्सवात पौर्णिमेच्या दिवशी भेट देणे हे अनेक पर्यटकांचे स्वप्न असते.  पौर्णिमेच्या रात्री कच्छच्या रणात रहाण्याची संधी त्यामुळे मिळते.  यासाठी पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणात तंबू उभारण्यात आले आहेत.  या तंबुंसाठी बुकींग व्यवस्थाही  ऑनलाईन असल्यानं जगभरात कुठल्याही कोप-यातून तुम्हाला बुकींग करता येतं.  तसेच यासंबंधी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा ऑनलाईन  उपलब्ध आहेत, त्याची माहिती घेऊन पर्यटक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात.  यासोबत गोल्फ कार्ट, एटीव्ही राइड, कॅमल कार्ट सहली, पॅरामोटरिंग, मेडीटेटॉन, योग आणि गुजराती संस्कृतीचा आनंदही या रण उत्सवात घेता येतो.   कच्छमधील विविध ठिकाणी आयोजित केलेले हे कार्निव्हल पर्यटकांना स्थानिक सांस्कृतीच्या जवळ नेतात.  ता-यांसोबत रात्र घालवण्यासाठी या रण महोत्वाची लोकप्रियता वाढत आहे.  (December holidays)गुजरातमध्ये दरवर्षी होणारा रण महोत्सव हा पर्यटकांसाठी विशेषतः परकीय पर्यटकांसाठी आकर्षून घेत आहे. कच्छच्या रणामध्ये दरवर्षी रण महोत्सवाचे आयोजन केले जाते.  यामध्ये, स्थानिक कलाकुसरीच्या वस्तूंची खरेदी, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याव्यतिरिक्त डेझर्ट सफारी, हॉट बलून राइड आदी अनेकांचा समावेश आहे.  हा रण महोत्सव नोव्हेंबर पासून सुरु होतो.   20 फेब्रुवारी 2023 पर्यंत हा रण उत्सव पर्यटकांसाठी एक अद्भुत संधी असते.  या रण महोत्सवात पौर्णिमेच्या दिवशी भेट देणे हे अनेक पर्यटकांचे स्वप्न असते.  पौर्णिमेच्या रात्री कच्छच्या रणात रहाण्याची संधी त्यामुळे मिळते.  यासाठी पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणात तंबू उभारण्यात आले आहेत.  या तंबुंसाठी बुकींग व्यवस्थाही  ऑनलाईन असल्यानं जगभरात कुठल्याही कोप-यातून तुम्हाला बुकींग करता येतं.  तसेच यासंबंधी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा ऑनलाईन  उपलब्ध आहेत, त्याची माहिती घेऊन पर्यटक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात.  यासोबत गोल्फ कार्ट, एटीव्ही राइड, कॅमल कार्ट सहली, पॅरामोटरिंग, मेडीटेटॉन, योग आणि गुजराती संस्कृतीचा आनंदही या रण उत्सवात घेता येतो.   कच्छमधील विविध ठिकाणी आयोजित केलेले हे कार्निव्हल पर्यटकांना स्थानिक सांस्कृतीच्या जवळ नेतात.  ता-यांसोबत रात्र घालवण्यासाठी या रण महोत्वाची लोकप्रियता वाढत आहे.  (December holidays)

=========

हे देखील वाचा : अलर्ट! तुमचा पासवर्ड ****ket असा आहे का? सहज होऊ शकतो हॅक

========

यासोबतच गुजरातमधील अन्य पर्यटन स्थळंही पर्यटकांना आकर्षून घेत आहेत.  यामध्ये कच्छमध्ये असलेल्या मांडवीचे बीचचे नावही आहे.  मांडवी समुद्रकिनारा हा सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारा आहे.  त्यामुळेही पर्यटक या समुद्रकिना-याला पसंती देतात.  याशिवाय भुज हे पर्यटन स्थळ देखील गुजरातच्या कच्छमध्ये आहे. भुजचे हवामान डिसेंबरमध्ये अल्हाददायक असते.  भुजमधील स्वामी नारायण मंदिर, ऐतिहासिक राजवाडा आणि राष्ट्रीय उद्यान यांनाही पर्यटकांची पसंती मिळते.   कच्छमधील सेओत लेणी आणि टोपनसर तलाव ही पर्यटन स्थळंही सध्या चर्चेत आहेत.  याशिवाय टोपनसर तलाव परिसरात डिसेंबर महिना अखेरीस स्थलांतरित पक्षी येतात.  या पक्षांना बघण्याचा आनंदही पर्यटक घेतात.  कांकरिया तलाव देखील पर्यटकांना आकर्षित करीत आहे.   कांकरिया तलाव 1451 मध्ये सुलतान कुतुबुद्दीनने बांधला होता. हा तलाव अहमदाबाद येथे आहे आणि शहरातील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक आहे. येथील बोट क्लब, प्राणीसंग्रहालय आणि संग्रहालय हे देखील पर्यटकांना आकर्षित करते.  याशिवाय गुजरातमधील सोमनाथमंदिर प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे.  हे स्थान भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.  सोमनाथ मंदिरांमध्ये गीता मंदिर, बलुखा तीर्थ, कामनाथ महादेव मंदिर आणि सोमनाथ संग्रहालय यांना पहातांना प्रेक्षक दंग होऊन जातात.(December holidays)

याव्यतिरिक्त गिर नॅशनल पार्क, गुजरातमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. आशियाई सिंहांचे संरक्षण करण्यासाठी या अभयअरण्याची निर्मिती करण्यात आली.  येथेही पर्यटकांची मोठी गर्दी असते.  याशिवाय वडोदरा येथील मराठा नेते सयाजी राव गायकवाड तिसरे यांचे स्मारक,  लक्ष्मी विलास पॅलेस,  गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिर,  चंपानेर येथील पावागड,  गिरनार पर्वतावरील दत्तमहाराजांचे मंदिर आदी अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.    

गुजरातमध्ये पर्यटन स्थळांची संख्या जेवढी मोठी आहे, तेवढीच तेथील खाद्यसंस्कृतीही मोठी आहे.  नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात गुजरातमध्ये पर्यटकांसाठी विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.  त्यातून स्थानिक संस्कृतीचेही दर्शन होतेच पण खाद्यसंस्कृतीचीही माहिती मिळते.  त्यामुळेच नववर्ष साजरं करण्यासाठी पर्याय शोधत असाल तर गुजरातचा नक्की विचार करा.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.