Home » उस ‘न’ वापरता घरीच बनवा उसाचा रस, कसा ? या जाणून घेऊ

उस ‘न’ वापरता घरीच बनवा उसाचा रस, कसा ? या जाणून घेऊ

by Team Gajawaja
0 comment
sugarcane juice
Share

उन्हाळ्यात शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी जवळजवळ सर्वचजण उसाचा रस(sugarcane juice) पितात. बाजारातील उसाचा रस तुम्ही अनेकदा प्यायला असेल. रस्त्यावर, चौकात, बाजारात किंवा शाळा-कॉलेजजवळ तुम्हाला तो अगदी सहज मिळू शकतो. तुम्ही नेहमी ऊस मशीनमध्ये टाकून रस काढताना पाहिले असेल. अशा परिस्थितीत, घरच्या घरी उसाचा रस(sugarcane juice) बनवणे विचित्र वाटू शकते. पण आज आम्ही तुम्हाला उसाचा रस घरी बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, यामध्ये उसाचीही गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया की, कसा बनवायचा स्वादिष्ट उसाचा रस.

उसाच्या रसासाठी लागणारे साहित्य

घरी उसाचा रस बनवण्यासाठी तुम्हाला पुदिन्याची पाने, काळे मीठ, लिंबाचा रस, बर्फाचे काही तुकडे आणि गूळ लागेल.

====

हे देखील वाचा – ‘या’ नवीन पद्धतीने बनवा ऑम्लेट; लहान मुलांनाच काय, तर मोठ्यांनाही आवडेल

====

उसाचा रस कसा बनवायचा?

उसाचा वापर न करता, घरी उसाचा रस बनवण्यासाठी गूळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण उसाचा रस शिजवूनच गूळ बनवला जातो. त्यामुळे उसाचा रस तयार करण्यासाठी गूळ वापरता येतो. सर्व प्रथम गूळ पाण्यात भिजवून ठेवावा. गूळ पूर्णपणे वितळल्यावर, पाण्यातील हा गूळ गाळून घ्या. जेणेकरून गुळात पडलेली घाण वगैरे गाळून निघते. आता पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि लिंबाचा रस मिक्सरमध्ये टाका आणि हे सर्व बारीक करा.

नंतर या पुदिन्याच्या पानांच्या मिश्रणात गाळलेले गुळाचे मिश्रण घाला. नंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. जेणेकरून सर्व काही व्यवस्थित मिसळले जाईल. नंतर याला मिक्सरमधून काढा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून, हे गूळ आणि पुदिन्याच्या पानांचे मिश्रण पातळ करा. नंतर सर्व व्यवस्थित गाळून घ्या. आता यात बर्फाचे तुकडे घालून थंड करा.

बनवलेला हा रस ग्लासमध्ये टाका आणि ग्लासच्या कोपऱ्यावर पुदिन्याची पाने आणि लिंबाचे काप लावून त्याला सजवा. तुमचे थंडगार उसाचे सरबत तयार आहे. हे प्या आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा द्या. कडक उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी ही देसी रेसिपी खूप उपयुक्त आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.