साडी ही अशी बाब आहे जी प्रत्येक भारतीय महिलेच्या कपाटात असते म्हणजे असतेच. साडीशिवाय महिलांचे कपाट अपूर्णच असते. या साडीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूपच महत्व आहे. महिला किती मॉडर्न झाल्या आणि वेस्टर्न कपडे घालू लागल्या तरी, त्या साडीमध्ये जशा आकर्षक आणि सुंदर दिसतात तशा त्या कोणत्याच कपड्यांमध्ये दिसत नाही. (Old Saree New Dress)
असं म्हणतात की साडीशिवाय स्त्रीचे सौंदर्य अपूर्ण आहे. अगदी खरं आहे. साडीने आपल्या कपाटात तिचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे. साडी हा असा प्रकार आहे, जो वर्षानुवर्षे टिकतो. एवढे वर्ष टिकूनही तिच्या सौंदर्यात किंचितही कमी होत नाही. अशी ही साडी आपल्या घरातील आई, आजी यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक साडीमागे त्यांची एक आठवण दडलेली असते. त्यामुळेच कदाचित साडी जुनी झाली तरी ती टाकून देण्याची इच्छा कोणाचीच नसते.
मात्र एकच साडी सारखी सारखी नेसायला देखील स्त्रियांना आवडत नाही. त्यामुळे अनेकदा नेसून झालेली साडी पुन्हा नेसवत नाही आणि फेकवत पण नाही अशा वेळेस या जुन्या साड्यांचा अतिशय चांगला उपयोग करता येईल. जुन्या साड्यांपासून आपण अतिशय स्टायलिश ड्रेस बनवून फ्लॉन्ट करू शकतो. (Old Saree New Dress)
अतिशय चांगल्या साड्यांपासून विविध पॅटर्नचे डिझायनर ट्रेंडी ड्रेस बनवण्याची सध्या खूपच फॅशन आहे. या नवीन ट्रेंडमुळे पैशांची बचत होत, हटके आणि आकर्षक स्टाइल स्टेटमेंट दिसतो. शिवाय साडीसोबत जोडल्या गेलेल्या भावना आणि आठवणींना ड्रेसच्या माध्यमातून नव्याने उजाळा मिळतो. आज आपण या लेखात जुन्या साड्यांपासून आपण कोणकोणत्या प्रकारचे ड्रेस बनवू शकते हे जाणून घेऊया.
कुर्ता :
जुन्या साडीपासून तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे फॅशनेबल कुर्ते शिवू शकतात. तुम्ही कोणत्या फॅब्रिकच्या साडीचा कुर्ती शिवण्यासाठी वापर करता त्यानुसार तुम्ही कुर्त्याचा पॅटर्न ठरवा. अनारकली किंवा फ्लोई ड्रेससाठी तुम्हाला शिफॉनसाडी चांगला पर्याय आहे. सोबतच मोठे काठ असलेल्या साड्यांचा ए लाइन कुर्ता देखील चांगला दिसेल. या साड्यांच्या मोठ्या काठांचा वापर करत तुम्ही वेगवेगळे पॅटर्न तयार करू शकता. (Old Saree New Dress)
लेहेंगा चोली :
जर तुमच्याकडे महागड्या मात्र जुन्या साड्यांमध्ये सॉफ्ट सिल्क, पैठणी, कांजिवरम, प्युअर सिल्क, हेवी एम्ब्रॉडरी प्रकारातल्या अशा काही साड्या असतील तर तुम्ही लेहेंगा चोली बनवण्याचा विचार करू शकता. असे ड्रेस पारंपरिक समारंभांमध्ये खूपच उठून दिसतात.
पलाझो पँट्स :
साड्यांपासून नवीन ड्रेस रेक्रीयेट करण्यासाठी आपल्याकडे महागड्या आणि हेवी साड्याच पाहिजे असे अजिबातच नाही. तुमच्याकडे सध्या मात्र एलिगंट किंवा सुळसुळीत साड्या असतील तर तुम्ही त्यापासून पलाझो पँट्स देखील शिवून घेऊ शकतात. या पँट्स तुम्ही वेगवेगळ्या कुर्त्यांवर टॉप घालून स्टायलिश दिसू शकतात.
जॅकेट :
पैठणी किंवा हेवी काठ असलेल्या साड्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्यापासून जॅकेट बनवू शकतात. विविध समारंभांमध्ये हे जॅकेट अतिशय स्टायलिश आणि एलिगंट लूक देण्यासोबतच तुमची फॅशन देखील हायलाइट करतात. फक्त स्त्रिया नाही तर पुरुष देखील हे जॅकेट घालून मिरवू शकतात.
लहान मुली आणि मुलांसाठी ड्रेस :
जुन्या साड्यांपासून तुम्ही लहान मुलींसाठी विविध प्रकारचे स्टायलिश फ्रॉक, वेस्टर्न, इंडो वेस्टर्न ड्रेस, परकर पोलकं आदी अनेक ड्रेस बनवून घेऊ शकतात. शिवाय या साड्यांपासून मुलांसाठी देखील कुर्ता, जॅकेट बनवता येईल.
======
हे देखील वाचा : मॉन्सूनमध्ये साडीत आकर्षक दिसण्यासाठी टिप्स
======
गाऊन :
जुन्या साड्यांपासून लॉन्ग गाऊन किंवा लॉन्ग टॉप शिवू शकतात. आजकाल अशा लॉन्ग ड्रेसेसची खूपच चलती आहे. त्यामुळे तुम्ही असे ड्रेस शिवून घेतले तर नक्कीच कार्यक्रम, पार्टीमध्ये उठून आणि हटके दिसाल हे नक्की. (Old Saree New Dress)
अंब्रेला पॅटर्न :
साड्यांपासून तुम्ही अंब्रेला पॅटर्नचे विविध ड्रेस शिवू शकतात. यात स्टायलिश अंब्रेला कुर्ती, लॉन्ग, शॉर्ट स्कर्ट आदी प्रकार आवडीनुसार बनवले जाऊ शकतात. अंब्रेला पॅटर्न ही कधीच आऊटडेटेड न होणारी फॅशन आहे. आजच्या फॅशन किंवा ट्रेंडनुसार तुम्ही अंब्रेला पॅटर्न निवडू शकतात.