Home » शरीरशुद्धीसाठी ‘या’ पद्धतीने घरच्या घरी बनवा डिटॉक्स वॉटर

शरीरशुद्धीसाठी ‘या’ पद्धतीने घरच्या घरी बनवा डिटॉक्स वॉटर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Detox Water
Share

आपण नेहमीच अनेक तज्ज्ञ लोकांकडून, डॉक्टरांकडून दोन वाक्य हमखास ऐकत असतो आणि ते म्हणजे, ‘आपले शरीर हे मंदिर आहे’ आणि ‘उत्तम आरोग्य हाच खरा दागिना’. आजच्या धावपळीच्या युगात आपण नेहमीच आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. पार्लरमध्ये जाऊन स्पा घेणे, फेशियल करणे हे तर आलेच, मात्र हे सर्व वरवर काळजी घेण्यासारखे आहे. आपण आपल्या शरीराची आतून देखील काळजी घेतली पाहिजे.

आता शरीराची आतून काळजी कशी घेणार? कोण घेते शरीराची आतून काळजी? आदी अनेक प्रश्न निर्माण होत असतील. मात्र निरोगी राहण्यासाठी केवळ बाह्य स्वच्छता पुरेशी नसते त्यासाठी वेळोवेळी शरीर आतून डिटॉक्स करणे देखील आवश्यक आहे. डिटॉक्स या प्रक्रियेत शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे शरीराचे सर्व अवयव निरोगी राहून त्यांचे काम उत्तम प्रकारे करतात.

आपण जे काही खातो पितो ते सर्व आपले शरीर बाहेर टाकते. पण, त्याचा काही भाग आपल्या शरीरात राहतच असतो. यामुळेच आपल्याला वेळोवेळी आपले शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. डिटॉक्सिफिकेशनमुळे शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आणि तंदुरुस्त होतो आणि शरीर पूर्णपणे आतून स्वच्छ होते.

शरीराला डिटॉक्स करायचे ऐकल्यावर अनेकांना वाटले असेल, ही खूपच खर्चिक आणि त्रासदायक प्रक्रिया असेल. मात्र असे अजिबातच नाहीये. डिटॉक्ससाठी तुम्हाला कोणतीही वेगळी मेहनत करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात काही छोटे छोटे बदल केले तरी तुमचे शरीर डिटॉक्स होऊ शकते. शरीर डिटॉक्स केल्याने आपले रक्त स्वच्छ होते, रक्ताच्या साहाय्याने शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचतो, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत रक्त स्वच्छ असणे महत्वाचे आहे.

आपल्या देशात चहाला अमृताचा दर्जा दिला जातो. जवळपास सर्वच लोकं सकाळची सुरुवात चहा, कॉफीने करतात. काही लोकं गरम पाणी मध आणि लिंबू घेतात. परंतु जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात डिटॉक्स पाण्याने केली तर आपल्या शरीरातील सर्व अशुद्धी दूर होईल. आता हे डिटॉक्स पाणी कसे असते? ते कुठे मिळते? कसे बनवतात? या सर्व प्रश्नांची आम्ही तुम्हाला उत्तरं देणार आहोत. डिटॉक्स पाणी करणे अगदी सोपे आहे. घरातल्या सोप्या गोष्टींपासून ते घरच्याघरी बनवता येते.

Detox Water

लिंबू आणि पुदिन्याचे पाणी
हे एक पेय आहे जे आपले पचन सुधारते. याशिवाय हे पेय रोगप्रतिकारक शक्तीसाठी सुद्धा उत्तम आहे. हे बनविण्यासाठी तुम्हाला लिंबू आणि ताजी पुदिना पाने आवश्यक आहे. हे बनवण्यासाठी लिंबाचे पातळ तुकडे करून पुदिन्याची पाने तोडून घ्या. हे फक्त पाण्यात टाका आणि थोडा वेळ राहू द्या.

लिंबू आणि आल्याचे पाणी
हे ड्रिंक सुद्धा पचनासाठी चांगले आहे. ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या आहेत ते हे ड्रिंक पिऊ शकतात. याशिवाय इन्फ्लेमेटरी प्रॉब्लेम्सचा सामना करण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. ते बनवण्यासाठी आलं आणि लिंबू धुवून घ्या. नंतर आले सोलून घ्या. आले आणि लिंबाचे पातळ तुकडे करून पाण्यात घाला.

सफरचंद आणि दालचिनीचे पाणी
चयापचय वाढवण्यासाठी हे खूप चांगले पाणी आहे. ते प्यायल्याने रक्तातील साखरेच्या नियमनात मदत होईल. ते तयार करण्यासाठी आधी सफरचंद धुवून घ्या आणि नंतर बारीक चिरून घ्या. आता ते पाण्यात टाका आणि त्यात दालचिनीचा १ मोठा तुकडा घाला.

काकडीचे पाणी
पावसाळ्यात काकडीचे पाणी प्यावे. हे प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. याशिवाय त्वचेच्या आरोग्यासाठीही हे चांगले मानले जाते. हे बनवण्यासाठी काकडी धुवून नंतर बारीक कापून पाण्यात टाका.

ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरातील चयापचय सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून तुम्हाला हलके वाटते. ग्रीन टी दिवसातून दोनदा प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते आणि पचन सुधारते.

हळदीचे दूध
हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीरासाठी एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे जे शरीरातील हानिकारक घटक काढून टाकते. तसेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि शरीराची अंतर्गत स्वछता होते.

==========
हे देखील वाचा : केळी सेवनाचे ‘हे’ आहेत जादुई फायदे
==========

आवळा रस
आवळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि शरीरातील डिटॉक्स प्रक्रियेला गती देते. हे पचन सुधारून त्वचा सुधारते. रोज सकाळी ताज्या आवळ्याचे रस सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्यामुळे यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.