Home » Makar Sankrant संक्रांत स्पेशल गुळपोळीची सोपी रेसिपी

Makar Sankrant संक्रांत स्पेशल गुळपोळीची सोपी रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Makar Sankrant
Share

उद्या १५ जानेवारी रोजी आपण सगळे मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत. संक्रांत म्हणजे आनंद, उत्साहाचा सण. या दिवशी सर्व कडू आठवणींना बाजूला सारून गोड बोलण्याचे सांगितले जाते. अतिशय महत्वाचा आणि मोठा सण म्हणून या सणाची ओळख आहे. (Makar Sankrant)

संक्रांत म्हटले की डोळ्यासमोर येते रंग बेरंगी पतंग, काळ्या साड्या, हळदी कुंकू, वाण, हलव्याचे दागिने, बोरन्हाण आणि गुळ पोळी. संक्रांतीचे तीन दिवस घरात नुसती रेलचेल आणि खाण्याची चंगळ असते. संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा केला जातो. या तिन्ही दिवसात अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. संक्रांतीच्या सणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुळपोळी. (Gulpoli Recipe)

प्रत्येकालाच गुळपोळी खूपच आवडते. संक्रांतीच्या दिवशी गुळपोळी खाण्याची मजा काही औरच असते. गुळपोळी केवळ संक्रांतीच्या दिवसांमध्येच केली जाते. त्यामुळे सगळे जणं या सणाची आतुरतेने वाट बघतात जेणेकरून गुळपोळी खायला मिळेल. गुळाची पोळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही पोळी तयार करण्यासाठी फारसा वेळ द्यावा लागत नाही. करायला सोपी आणि खायला अतिशय चविष्ट असणाऱ्या या गूळपोळीची रेसिपी जाणून घेऊया.

Makar Sankrant

साहित्य
अर्धा किलो गुळ किसलेला
अर्धा वाटी भाजलेल्या तिळाची पूड
अर्धी वाटी डाळीचे पीठ
एक लहान चमचा वेलची पूड
6 वाट्या गव्हाची कणिक
पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन
पीठ भाजण्यासाठी तेल
चिमूटभर मीठ

कृती

डाळीचे पीठ तेलावर भाजून गार करुन घ्यावे. किसलेल्या गुळात डाळीचे पीठ, भाजलेल्या तिळाची पावडर, वेलदोडा पूड घालून हे मिश्रण एकजीव करावे. आवश्यक असल्याचं हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये देखील बनवू शकता किंवा फिरवून घेऊ शकता. आता सारण तयार झाले.

पुढे कणिक नीट चाळून घ्यावी. त्यात तेलाचे मोहन, मीठ घालून घट्ट भिजवून घ्यावी. तेलाचा हात लावून थोडा वेळ बाजूला ठेवावी. नंतर एक गोळा तयार करून त्यात पुरण भरतो तसे वरील तयार सारण भरावे. त्यांचे तोंड नीट बंद करून ही पोळी पिठीवर पातळ पोळी लाटावी. पोळी चांगली खमंग भाजावी. तव्यावर तूपात भाजता येते किंवा कोरडी भाजून वरुन तुपाचा गोळा ठेवून देखील खाता येते.

==========

हे देखील वाचा : Makar Sankrant मकर संक्रांतीचे महत्व आणि माहिती

Bhogi 2025 जाणून घ्या भोगी सण म्हणजे काय आणि त्याचे महत्व

==========

गुळाच्या पोळीसाठी तयार सारण १५ ते २० दिवस सहज टिकते. ही पोळी हलक्या हाताने लाटावी आणि कडेपर्यंत सारण पसरत आहे ना हे पाहावे. पोळी खमंग भाजावी नाहीतर गार झाल्यावर मऊ पडते. पोळी तव्यावर फुटत असल्यास एक स्वच्छ कापड पाण्यात भिजवून तव्यावरून फिरवावे. गुळाच्या तयार पोळ्या देखील तीन-चार दिवस सहज टिकतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.