यंदाच्या वर्षी १५ जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाणार आहे. मकर संक्रातीवेळी काळ्या रंगाचे वस्र परिधान करण्याची परंपरा आहे. तसेच भारतात या दिवशी पतंग उडवले जातात, महिला हळदी कुंकू ठेवतात आणि तिळगुळ ही दिले जातात. तसेच नवं वधुला हलव्याचे दागिने ही घातले जातात. तर या दिवशी सूर्याच्या पुजेसह दानाचे सुद्धा फार महत्व असते. खरंतर वर्षभरात १२ संक्रांत असतात. पण त्यापैकी मकर संक्रात ही खास असते. यामागील नक्की कारण काय तेच आपण या लेखात पाहूयात. (Makar Sankranti)
मकर संक्रातीला अधिक महत्व का असते?
जेव्हा सूर्य मकर राशित प्रवेश करतो तेव्हा तो पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या दिशेने जाऊ लागतो. कारण आपला देश उत्तर गोलार्धात आहे. त्यामुळे सुर्याच्या उत्तर गोलार्धात जात असताना दिवस मोठा होतो आणि रात्र लहान असते.
धार्मिक मान्यतानुसार सुर्याची ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते. या दरम्यान, सुर्याची किरणांमुळे शेती पिकते असे मानले जाते. त्याचसोबत मकर संक्रातीपासून थंडी कमी होण्यास सुरुवात होते. धार्मिक आणि वैज्ञानिक महत्वाव्यतिरिक्त मकर संक्रातीचे आयुर्वेदात ह महत्व आहे.

संक्रातीवेळी भात, तिळ आणि गुळापासून बनवण्यात आलेले पदार्थ खाल्ले जातात. यामुळे शरिराला उर्जा मिळते. त्यामुळेच या सणाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
अन्य संक्रांतीबद्दल सुद्धा जाणून घ्या
जेव्हा सूर्य मेष राशित प्रवेश करतो तेव्हा ती मेष संक्राती असते. या व्यतिरिक्त सुर्य मीन राशितून मेष मध्ये प्रवेश करतो त्या दिवशी पंजाब मध्ये बैसाख पर्व साजरा केला जातो. बैसाखीच्या वेळी आकाशात विशाखा नक्षत्र असते.
याला शेतीचा उत्सव असे ही म्हटले जाते. कारण रब्बी पिकांची शेती तयार होते. तर सुर्य जेव्हा तुळ राशित प्रवेश करतो तेव्हा त्याला तुला संक्राती असे म्हणतात. ऑक्टोंबर महिन्याच्या मध्यात या दिवसाला कर्नाटकात तुला संक्रमण असे म्हटले जाते. कार्तिक स्नान ही याच दिवसापासून सुरु होते. (Makar Sankranti)
हे देखील वाचा- 2023 हे बाजरी या धान्याला समर्पित असं वर्ष…
मकर संक्राती ते कर्क संक्राती दरम्यान ६ महिन्यांचा कालावधी असतो. सुर्य या दिवशी मिथून राशितून निघून कर्क राशित प्रवेश करतो. तर कर्क संक्राति जुलै महिन्याच्या मध्यात असते. परंतु या सर्व संक्रांतींपैकी मकर संक्रातीचे महत्व फार आहे. कारण सुर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या आधारावर आहे आणि सूर्याला सर्वाधिक महत्व असते.