उद्या मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशात साजरा होणार आहे. उद्यापासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांतीचा उत्सव साजरा होणार आहे. प्रत्येक स्त्री संक्रांत, हळदी कुंकू, बोरन्हाण यामध्ये आता व्यस्त असणार. संक्रातीच्या या प्रत्येक कार्यक्रमासाठी आपण कसे चारचौघात उठून दिसणार याचीच महिला तयारी करत असतील. संक्रांतीला खासकरून काळ्या रंगाचेच कपडे किंवा साड्या घातल्या जातात. शिवाय यादिवशी पारंपरिक लूक आणि मेकअपला प्राधान्य दिले जाते. मकर संक्रांतीला काळात परफेक्ट लूक कसा मिळवाल यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही मेकअप केला तर नक्कीच तुम्ही अतिशय सुंदर दिसाल. (Make Up)
संक्रांतीचा सण हिवाळ्यात येतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असते. त्यामुळे या दिवसांमध्ये पारंपारिक लूकसोबत जास्तीचा डार्क मेकअप करणे हे थोडे कठीण असते. कारण, या दिवसांमध्ये आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे, या कोरड्या त्वचेवर जास्त हेव्ही मेकअप करणे अवघड होऊन बसते. मात्र, जर तुम्हाला पारंपारिक लूकसोबत नैसर्गिक लूक हवा असेल तर, ब्लशचा वापर करायला विसरू नका. ब्लशचा वापर केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर रेग्युलर फाऊंडेशनचा टच द्या. (Marathi News)
पारंपारिक साडी किंवा अन्य आऊटफीट्सवर तुम्ही मॅट लूक निवडू शकता. कारण, पारंपारिक लूकवर हा मॅट मेकअप अधिक उठून दिसतो. मॅट मेकअप लूकमुळे तुमचा मकर संक्रांती लूक हा परफेक्ट दिसण्यास मदत होईल. मॅट मेकअपमुळे तुमची स्किन ग्लोईंग आणि नैसर्गिक दिसते. पारंपारिक साडी किंवा पारंपारिक आऊटफिट्सवर डार्क लिपस्टिक नेहमीच शोभून दिसते. संक्रांतीच्या सणासाठी तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसा किंवा इतर कोणत्याही रंगाची नेसा. (Latest Marathi News)

या साडीवर तुम्ही लाल किंवा चॉकलेटी रंगाची डार्क लिपस्टिक लावा. यामुळे, तुमचा मेकअप परफेक्ट दिसेल. किंवा तुम्ही तुमच्या ओठांसाठी गडद लाल, मरून किंवा पीच शेडची लिपस्टिक ट्राय करू शकता. जर दिवसाच्या कार्यक्रमासाठी लूक असेल तर न्यूड किंवा गुलाबी शेडही सुंदर दिसतात. ओठ कोरडे दिसू नयेत यासाठी आधी लिप बाम नक्की लावा. पारंपरिक आणि मॉडर्न असा हेअर आणि मेकअप करताना उत्तम आणि तुमच्या साडीला मॅच होतील असे दागिने निवडणे गरजेचे आहे. नथ, ठुशी, कानातले आणि जोडवी यांसोबत मेकअप जास्त भडक न करता संतुलित ठेवावा. त्यामुळे संपूर्ण लूक सोज्वळ आणि आकर्षक दिसतो. (Top Marathi Headline)
पार्टीवेअर किंवा फेस्टिव्ह लूकसाठी तुम्ही शिमरी आयशॅडोजचा वापर नेहमीच करता. डोळ्यांवर हे शिमरी आयशॅडोज अधिक खुलून दिसतात, यात काही शंका नाही. तुम्ही सुद्धा संक्रांतीच्या पारंपारिक साडीवर मॅच होणाऱ्या शिमरी आयशॅडोजचा वापर नक्कीच करू शकता. सिल्वर किंवा गोल्ड रंगाचे शिमरी आयशॅडोज पारंपारिक लूकवर अधिक सुंदर दिसतात. (Top Trending News)
========
Bornhan : मकरसंक्रांतीच्या काळात लहान मुलांचे बोरन्हाण का करतात?
========
मकर संक्रांतीसाठी सर्वात जास्त पसंती दिली जाणारी हेअरस्टाईल म्हणजे वेणी. साधी वेणी, मोगऱ्याची वेणी किंवा गजऱ्याने सजवलेली वेणी पारंपरिक लूक आणखी खुलवते. नऊवारी किंवा पैठणीवर वेणी खूपच शोभून दिसते. वेणीला केसांतून हलकासा तेलाचा शाइन दिल्यास लूक छान येतो. शिवाय हेयर स्टाईल करताना देखील तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला टिपिकल पारंपरिक, रिच लूक हवा असेल, तर अंबाडा हा उत्तम पर्याय आहे. मागे किंवा थोडा बाजूला केलेला अंबाडा, त्यावर मोगरा किंवा गुलाबाची फुले लावल्यास पारंपरिक सौंदर्य अधिक खुलते. अंबाड्याबरोबर नथ, ठुशी आणि कानातले खूपच सुंदर दिसतात. जर अंबाडा नसेल पाहिजे तर तुम्ही पुढचे केस हलके वळवून मागे क्लिपने लावून घ्या. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
