Home » Sankranti : मकर संक्रांतीलाच हलव्याचे दागिने का घातले जातात?

Sankranti : मकर संक्रांतीलाच हलव्याचे दागिने का घातले जातात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sankranti
Share

मकर संक्रांती म्हटले की, सगळ्यांना एकच उत्साह जाणवतो. कोणाला तीळ पोळी खायला मिळणार याचा आनंद, कोणाला पतंग उडवायला मिळणार याचा आनंद तर नववधूंना पहिली संक्रांत हळदीकुंकू आणि हलव्याचे दागिने घालून मिरवता येणार याचा उत्साह. संक्रांतीचा सण नववधूंसाठी खूपच खास असतो. अनेक घरांमध्ये लग्नानंतर पहिली संक्रांत होत नाही. मात्र दुसरी संक्रांत आणि जिथे पहिली होते तिथे पहिल्या संक्रांतीच्या दिवशी नववधूला काळी साडी दिली जाते. सोबतच तिला त्यावर घालण्यासाठी हलव्याचे दागिने देखील तयार केले जातात. अतिशय सुंदर आणि युनिक अशा या संपूर्ण अवतारामध्ये नववधू तयार होते. त्यानंतर ती तिचा पहिला हळदी कुंकू समारंभ करते. (Sankranti)

मधल्या काळामध्ये आपल्या जुन्या प्रथा परंपरा काळानुरूप मागे पडायला लागल्याचे चित्र जाणवत होते. मात्र सोशल मीडियाची व्याप्ती वाढली आणि आपल्या याच जुन्या परंपरांना संजीवनी मिळाली. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी या सर्व पद्धती अतिशय उत्तमपणे आता पाळल्या जातात. यामुळे जुन्या परंपरा आणि प्रथा नुसत्या टिकत नाही तर आजच्या आणि पुढच्या पिढीला या सर्व गोष्टींची माहिती देखील होते. आपल्या अतिशय पद्धतींमधील एक पद्धत म्हणजे, संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात नवीन नवरीला जिची पहिली संक्रांत आहे तिला काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून सजवले जाते. मात्र असे करण्यामागे नक्की कोणते कारण असावे? संक्रांतीच्या दिवसांमध्ये हलव्याच्या दागिन्यांना का महत्त्व दिले जाते. चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

मकर संक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालणे ही पारंपारिक मराठी परंपरा आहे. मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्याना महत्त्व आहे. या दिवशी हलव्याच्या गोड पदार्थाचा उपयोग करुन विविध प्रकारचे दागिने तयार केले जातात. साधारणतः तिळाच्या गुळाचा हलवा या दागिन्यामध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश त्यमागे असतो. याला हलवा हार म्हणूनही ओळखले जाते. मकर संक्रांतीसाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागामध्ये हलव्याच्या दागिन्यांचे विविध प्रकार केले जातात. हे दागिने मुख्यत: महिलांसाठी तयार केले जातात, मात्र काही ठिकाणी पुरुषांसाठी देखील काही विशिष्ट दागिने तयार केले जातात. (Marathi News)

Sankranti

हे हलव्याचे दागिने खासकरून नवविवाहित जोडपे, नवजात मुलं आणि गर्भवती स्त्रिया सहसा हलव्याचे दागिने घालतात. हलव्याचे दागिने परिधान करणाऱ्याच्या भविष्यातील आशीर्वादांच्या आशेचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हलव्याचे दागिने घालून नवीन वर्ष गोड आणि आनंदाचे जावे म्हणून प्रार्थना करतात. यात साखर आणि तिळापासून बनवलेले दागिने नववधू आणि लहान मुलांना घातले जातात, जेणेकरून त्यांना नवीन आयुष्याची सुरुवात गोड व्हावी आणि हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करता यावा. हा सण कापणीच्या हंगामाच्या समाप्तीचा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा असतो, ज्यामुळे नवीन आणि हलके दागिने घालणे शुभ मानले जाते. (Latest Marathi Headline)

मकर संक्रांती हा कापणीचा सण असून, या निमित्ताने गोड पदार्थ आणि हलव्याच्या दागिन्यांची निर्मिती केली जाते, ज्यामुळे सणाला एक वेगळी ओळख मिळते. लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत नववधूसाठी खास असते. यावेळी हलव्याचे दागिने घालून ती हळदी-कुंकू समारंभ करते. हा सण तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात असते. त्याचा शुभारंभ गोडाने व्हावा यासाठी हे हलव्याचे दागिने केले जातात. लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घातले जातात. शिवाय हे दागिने शुभ मानले जातात आणि सणाचा उत्साह वाढवतात. हे दागिने पारंपरिक पूजा आणि सोहळ्यांमध्ये वापरले जातात. हलव्याचे दागिने हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात आणि हळदीकुंकू समारंभात हे दागिने भेट दिले जातात. (Top Trending News)

========

Sankranti : अशुभ रंग असूनही संक्रांतीला का आहे काळ्या रंगाचे महत्त्व?

Sankranti : मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे काय आहे कारण?

========

या हलव्याच्या दागिन्यांमध्ये खासकरून महिलांसाठी बांगड्या, हार यात मोहनमाळ, बोरमाळ, चिंचपेटीसारखे प्रकार, कानातले, बाजूबंद, नथ, गजरा, कंबरपट्टा, पैंजण. लहान मुलांसाठी (बोरन्हाण) श्रीकृष्णाच्या पेहरावासारखे दागिने, जसे की मुकुट, बासरी, मोरपीस, हार. पुरुषांसाठी नारळ, कफलिंग, बटन, हार आदी प्रकार यात दिसतात. आधुनिक काळानुसार या पारंपरिक दागिन्यांमध्ये आता बदल झाल्याचे चित्र आहे. आता हलव्याच्या दागिन्यांमध्ये लोखंडी, चांदी, आणि सोन्याचा वापर केल्याने त्यात अधिक आकर्षण येते. हलवा हारला आधुनिक डिझाइनची जोड देणे, सोने-चांदीच्या सुईने सजवलेले हलवे, तिळाच्या गुळाच्या कणांच्या स्वरूपात आकर्षक बनवले जातात. (Social News)

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.