जानेवारीचा महिना सुरु झाला की सगळ्यांना वेध लागतात ते संक्रांतीचे. नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकरसंक्रांतीला ओळखले जाते. दरवर्षी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा होतो. मकर संक्रांतीचा सण हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. मकरसंक्रांत या सणाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे हा सण दरवर्षी १४ जानेवारीलाच येतो. कधीतरी हा सण १३ जानेवारी किंवा १५ जानेवारीला आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पौष महिन्यात जेव्हा सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे. भारतात मकरसंक्रातील मोठे महत्त्व आहे. देशातील कानाकोपऱ्यात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. (Makar Sankranti)
यावर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. सूर्य दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पुण्यकाळाची सुरुवात सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांनी होईल. यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग जुळून आला आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी देखील साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी सूर्यदेवाबरोबरच भगवान विष्णूंची कृपाही लाभेल. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी व्रताचा दुर्मिळ योगायोग १४८ वर्षांनंतर घडणार आहे. (Marathi)
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सुर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण १० ते १५ दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असतेपौराणिक कथांमध्येही मकर संक्रांतीचा उल्लेख आढळतो. महाभारत काळात, भीष्म पितामह जेव्हा बाणांच्या शय्येवर झोपले होते तेव्हा त्यांनी मकर संक्रांतीपर्यंत आपले प्राण न सोडण्याची प्रतीक्षा केली होती. भीष्म पितामह यांनी मकर संक्रांतीच्या दिवशीच आपले प्राण त्यागले होते. मकर संक्रांती (उत्तरायण) हा काळ खूप पुण्यदायी मानला जातो. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सुर्याची तीव्रता अधिक वाढायला सुरुवात होते. संक्रांतीनंतर १०/१५ दिवसांनी रथसप्तमी येते. रथसप्तमीपासून सुर्याच्या रथाला घोडे लागतात असे म्हटले जाते. (Top Marathi HEadline)

मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजतात. सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी. संक्रांतीच्या काळात बाजारात सुगड विकायला येतात. संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी विवाहित महिला काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करतात. वर्षातला हा एकमेव असा सण असतो ज्या दिवशी काळा रंग परिधान करून पूजा केली जाते. देवघरात पाच सुगड घेऊन ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधावा आणि हळद कुंकू वाहावे. मग त्या सुगड्यांमध्ये बोरे, गाजर, शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावे. (Latest Marathi News)
यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे तर दुसरे तुळशी जवळ ठेवावे. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओवसा करावा आणि एक सुगड रामापाशी ठेवावे. एक सुगड सवाष्णीला द्यावे आणि एक सुगड कोणत्याही एका मंदिरात ठेवावे. संक्रांतीच्या दिवशी घरांमध्ये तिळाची गोड पोळी केली जाते. शिवाय एकमेकांना तिळाचा लाडू देऊन “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असे बोलतात. तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. (Top Trending Headline)
संक्रांतीच्या काळात सुवासिनी या हळदीकुंकवाचे आयोजन करतात. लहान मुलांचे या काळात बोरन्हाण केले जाते. शिवाय संक्रांतीच्या दिवसांमध्ये पतंग मोठ्या प्रमाणावर उडवली जाते. महाराष्ट्र आणि गुजरातसह भारतातील अनेक राज्यांमध्ये पतंग उडवली जाते. मात्र गुजरातमध्ये पतंग उडवण्याची मजा खूपच खास असते. इथे तर भरपूर पतंग महोत्वाचे आयोजन केले जाते. देश विदेशातील पर्यटक खास संक्रांतीच्या काळात गुजरातमध्ये जातात. (Top Stories)
=========
Ekadshi : जाणून घ्या नवीन वर्षातल्या पहिल्या षटतिला एकादशीची माहिती आणि मुहूर्त
=========
पौराणिक कथेनुसार शनिदेव आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात आणि शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो. तसेच यादिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष्य घटनांसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे. आणखी एका कथेनुसार देवीने संकरासूर राक्षसाचा वध ज्यादिवशी केला त्या दिवसाला मकर संक्राती म्हटले जाते. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी देवीने किंकरासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो असे मानतात. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
