Home » Bhogi Bhaji भोगीच्या भाजीची पद्धत आणि महत्व

Bhogi Bhaji भोगीच्या भाजीची पद्धत आणि महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bhogi Bhaji
Share

आज सर्वत्र भोगीचा सण साजरा केला जात आहे. संक्रांतीच्या आधीच एक दिवस हा भोगी (Bhogi) म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये भोगीची खास पद्धतीचे जेवण बनते. यात सर्वात जास्त आकर्षणाचा पदार्थ असतो तो, भोगीची भाजी. भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टीक पदार्थ तयार तयार केले जातात. (Bhogi Bhaji)

या दिवशी भोगीची भाजी केली जाते. भोगी हा सण हिवाळ्यात येतो म्हणून या काळात मिळणाऱ्या अनेक भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून ही भोगीची चविष्ट भाजी बनवली जाते. अनेक भाज्या एकत्र केल्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक आणि सकस बनते. थंडीच्या दिवसात प्रत्येक जणं ही भाजी खातोच. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करुन भोगीची भाजी, भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याचीही पध्दत आहे. (Makar Sankrant 2025)

थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात भोगीची भाजी खाण्याचे अनेक फायदे शरीराला होतात. मुळातच थंड वातावरण असल्याने आपल्याला थंडीचा आणि याकाळात होणाऱ्या आजारांचा त्रास होत असतो. अशातच ही भोगीची भाजी आपले शरीर उष्ण ठेवण्यास मदत करून आजारांना देखील दूर करते. सोबतच आपल्या शरीरात असणारे अनेक आजार देखील बरे करण्यास मदत करते. अशा या बहुगुणी भाजीची पद्धत जाणून घेऊया. (Marathi Top News)

भोगीच्या भाजीचे साहित्य

तेल, मोहरी, जिरे, तीळ, आले-लसुण पेस्ट, हळद, हिंग, लाल तिखट, वांगे, पावटा, घेवडा, हरभरा, गाजर, काच्चे शेंगदाणे, हिरवा वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो, शेंगदाण्याचे कूट, तीळाचा कूट, कांदा-लसूण मसाला चटणी आणि मीठ. (सर्व भाज्या स्वच्छ धुऊन निवडून, चिरून घ्याव्यात)

Bhogi Bhaji

कृती

एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरे, तीळ टाका. तीळ आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात एक चमचा आले-लसूण पेस्ट टाका. ही पेस्ट आता तेलात थोडी परतून घ्या. आता यामध्ये एक चमचा हळद, काश्मिरी लाल तिखट आणि थोडासा हिंग टाका. (काश्मिरी लाल तिखटामूळे भाजीला फक्त लाल रंग येतो. भाजी तिखट होत नाही )

आता सर्व घेतलेल्या भाज्या (वांगे, पावटा, घेवडा, हरभरा, गाजर, हिरवा वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो) फोडणीमध्ये टाकाव्यात. भाजी टाकताना हळूहळू त्या मिक्स करत राहा आणि गॅस मध्यम आचेवर ठेवावा. सर्व मिश्रण २ मिनिट नीट परतून घ्या. आता त्यावर कच्चे शेंगदाणे टाकावेत. पुन्हा एकदा परतून त्यावर झाकण ठेऊन भाजीला १० मिनिटं वाफ काढा.

==========

हे देखील वाचा : Pongal जाणून घ्या दक्षिण भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पोंगल सणाची माहिती

Bhogi 2025 जाणून घ्या भोगी सण म्हणजे काय आणि त्याचे महत्व

==========

भाजी पुन्हा एकदा नीट मिक्स करा आणि यामध्ये आवडीनुसार शेंगदाणा कूट, तीळाचा कूट आणि कांदा-लसूण मसाला टाकावा आणि शेवटी चवीपुरते मीठ टाकावे. भाजी पुन्हा एकजीव करावी. सगळे मसाले एकत्र झाले की आपल्याला भाजी सुकी हवी की पातळ यानुसार त्यामध्ये गरम पाणी टाकावे. शेवटी कोथिंबीर घालून भाजी सर्व करावी.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.