Home » तिळगुळ लाडू खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे

तिळगुळ लाडू खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे

मकर संक्रांतीवेळी तिळगूळाचे लाडू तयार केले जातात. तिळगुळाचा लाडूमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जाणून घेऊयात तिळगुळ लाडू खाण्याचे फायदे सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Makar Sankranti
Share

Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. या खास दिवसानिमित्त विविध पदार्थ तयार केले जातात. खासकरून खिचडी आणि तिळगुळ. याशिवाय मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ खाण्याची खास परंपरा आहे. पण तुम्हाला तिळगुळ लाडू खाण्याचे फायदे माहितेयत का तिळगुळात काही पोषण तत्त्वे असतात. याशिवाय हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाल्ल्याने शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी तीळ आणि गुळाचा वापर केला दातो. या दोन्ही गोष्टींमध्ये काही प्रकारचे पोषण तत्त्वे असतात. जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह मजबूत करण्यास मदत करू शकतात.

हाडांसाठी फायदेशीर
तिळगुळात कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. जे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे तिळगुळाचे लाडू हाडांना मजबूती देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

पचनक्रिया सुधारते
तीळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारली जाते. याचे सेवन केल्याने पचनासंबंधित आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

Makar Sankranti 2024

Makar Sankranti 2024

तिळगुळाचे लाडू रेसिपी
-सर्वप्रथम पॅनमध्ये तीळ मंद आचेवर भाजू घ्या आणि ते थंड करून घ्या.

-एका कढईत गूळ टाकून त्याचा पाक तयार झाल्यानंतर त्यात भाजलेले तीळ मिक्स करुन व्यवस्थितीत दोन्ही गोष्टी भाजून घ्या.

-गॅस मध्यम आचेवरच ठेवा. आता यामध्ये शेंगदाणे आणि ड्राय फ्रुट्स मिक्स करून घ्या.

-सर्व गोष्टी व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर गॅस बंद करुन तिळगुळाचे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर हातावर तेल किंवा तूप लावून लाडू तयार करा. (Makar Sankranti 2024)

राज्यानुसार मकर संक्रांतीचा सण साजरा करण्याची परंपरा
-महाराष्ट्रातील लोक तिळगुळ तयार करून नातेवाईकांना देत सणाच्या शुभेच्छा देतात.

-गुजरातमध्ये मकर संक्रांती उत्तरायणच्या रुपात साजरी केली जाते. यादरम्यान लोक नातेवाईक किंवा मित्रपरिवाराला मिठाई देण्यासह पतंग उडवतात.

-उत्तर प्रदेशात या सणाला खिचडी किंवा रसोई नावाने ओळखले जाते. या दिवशी विशेष खिचडी तयार केली जाते. ही खिचडी देवाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते.

-पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला गंगासागरमध्ये पवित्र स्नान करुन साजरा केला जातो. या दिवशी गंगासागरच्या येथे जत्रेचेही आयोजन केले जाते.


आणखी वाचा :
मकर संक्रांतीच्या सणावेळी दान करा या गोष्टी
पाकिस्तानमधील राम मंदिर आता चर्चेत
त्रेतायुग हे मानवी काळातील दुसरे युग

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.