Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला फार महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. याशिवाय दानाच्या दृष्टीकोनातून मकर संक्रांती अत्यंत खास असते. लोक या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, पूजा, धर्म व दानासारखे पुण्य कार्य करतात. अशी मान्यता आहे की, मकर संक्रांतीच्या सणाववेळी काही गोष्टींचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. याबद्दल जाणून घेऊया अधिक….
तीळ
मकर संक्रांतीच्या शुभदिनी तुम्ही तिळाचे दान करू शकरा. या दिवशी ब्राम्हणांना तिळापासून तयार केलेल्या गोष्टींचे दान करू शकता. तसेच भगवान विष्णू, सूर्य आणि शनि देवांची देखील तिळाने पूजा केली जाते. अशी मानता आहे की, शनि देवांनी आपले क्रोधित पिता सूर्य देवांची पूजा काळ्या तिळांनी केली होती. यामुळे सूर्य देव प्रसन्न झाले होते. ज्या लोकांवर शनि दोष आहे त्यांनी तिळाचे दान करावे.
शेंगदाणे
मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतांशजण गंगा स्नान करून शेंगदाण्याचे गरिबांना वाटप करतात. शेंगदाण्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही गंगा स्नान केल्यानंतर घरात पूजा करा. मंदिरात जाऊन गरिबांना शेंगदाण्याचे जरूर वाटप करा.
उबदार कपडे
मकर संक्रांतीच्या दरम्यान फार थंडी असते. कारण जानेवारी महिन्यात सर्वत्र थंडीचे वातावरण असते. अशातच तुम्ही गरजूंना उबदार कपड्यांचे दान करू शकता. तुम्ही काळ्या रंगाची गोधडी किंवा कंबलचे दान करू शकता. यामुळे शनि देव प्रसन्न होत राहू दोषही कमी होऊ शकतो.
तेलाचे दान
मकर संक्रांतीच्या दिवशी शनि देवाच्या मंदिरात तेल अर्पण करावे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शनिदेवांची कृपा तुमच्यावर होत आयुष्यात सुख-समृद्धी येते. याशिवाय तुम्ही घरात तिळाच्या तेलाने पूजाही करू शकता.
खिचडी
देशातील बहुतांश राज्यात मकर संक्रांतीच्या वेळी घरात खिचडी तयार केली जाते. गरिबांना काळे उडीद, हिरवे मूग, हळद आणि तांदूळ वापरून तयार केलेली खिचडीचे दान करावे. यामुळे शनि, गुरु आणि बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात.
गुळाचे दान
मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गंगा स्नान करून घरात पूजा करा. यानंतर मंदिरात जाऊन गुळाचे दान आवश्य करा. या दानामुळे सूर्य, गुरु आणि शनि संबंधित दोष दूर होऊ शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळापासून तयार करण्यात आलेल्या लाडूचे दान केले जाते. (Makar Sankranti 2024)
तूप
मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी मंदिरात तूपाचे दान जरुर करू शकता. याशिवाय तूपापासून तयार करण्यात आलेले पदार्थ देखील दान करू शकता. तूपाचा संबंध हा सूर्य आणि गुरुशी असल्याचे मानले जाते. याशिवाय तूपाचे दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)