हिंदू धर्मात मकर संक्रात ही मोठ्या आनंदात-उत्साहात साजरी केली जाते. ज्योतिष शास्रनुसार, जेव्हा सुर्य धनू राशितून निघून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्राति असे म्हटले जाते. यंदाच्या वेळी मकर संक्रात १५ जानेवारी २०२३ ला साजरी केली जाणार आहे. यावेळी भगवान सुर्यदेवाची विशेष उपासना केली जाते. या दिवशी दानाचे फार मोठे महत्व असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, पूजा पाठ, धर्म व दान पुण्याचे कार्य करुन पुण्य मिळवू शकतात. परंतु मकर संक्रातिवेळी काही गोष्टींचे दान करणे फलदायी मानले जाते. दान केल्याने सुख-सौभाग्य लाभते असे मानले जाते. तर जाणून घेऊयात मकर संक्रातीवेळी कोणत्या गोष्टींचे दान केले पाहिजे त्याबद्दल अधिक. (Makar Sankranti 2023)
-खिचडीचे दान
मकर संक्राती दिवशी तांदूळ किंवा काळ्या उडदाच्या डाळीची खिचडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि आरोग्याचे वरदान प्राप्त होते.
-तिळाचे दान
मकर संक्रातिवेळी काळ्या तिळापासून बनवण्यात आलेल्या गोष्टी दान केल्याने सुर्यदेव, भगवान विष्णू आणि शनिदेव प्रसन्न होतात. मकर संक्रातिला तिळ संक्राति असे म्हटले जाते. काळ्या तिळ्याच्या दानाने दुर्भाग्य दूर होते.
-गुळाचे दान
मकर संक्रातीवेळी गुळाचे दान आवश्यक करणे. गुळाचे दान केल्याने गुरु, शुक्र आणि शनि तीन ग्रहांची कृपा मिळते.
-मीठाचे दान
शास्रानुसार, मकर संक्रातिवेळी मीठाचे दान केल्याने नकारात्मक उर्जा दूर होतात. त्यामुळे या दिवशी मीठाचे दान करावे.
-तेलाचे दान
मकर संक्रातीवेळी शनिदेवाच्या मंदिरात तेल चढवणे फार शुभ मानले जाते. यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. आयुष्यात सुख-समृद्धी येते.
-दीपदान
मकर संक्रातीवेळी दीपदानाचे फार मोठे महत्व असते. यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहते. (Makar Sankranti 2023)
-पशूंना चारा द्या
मकर संक्रातीवेळी गायीचा चारा देण्याचे फार महत्वाचे आहे. यामुळे घरात नेहमीच आनंदाचे वातावरण राहते.
हे देखील वाचा- महाराष्ट्रातील ‘या’ गावात शनि देवाची कृपा म्हणून घराला दरवाजेच लावले नाहीत
-काळ्या गोष्टींचे दान
मकर संक्रातीवेळी काळ्या गोष्टींचे दान केल्याने सर्व प्रकारचे शनिदोष आणि राहू दोष दूर होतात. नवे काळे कपडे, कंबल यासारख्या गोष्टींचे दान तुम्ही करु शकता.
तर मकर संक्रातीवेळी गरजूंच्या घरी तांदळाचे दान करणे फार लाभदायी असते. कारण तांदळाचे दान म्हणजे अक्षय दान मानले जते. जेवढे तुम्ही दान करता, त्यापेक्षा शंभर पटीने तुम्हाला प्राप्त होते.