सध्या बॉक्स ऑफिसवरची वर्दळ कमालीची वाढलेली दिसत आहे. आधी ‘सैय्यारा’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या ‘महावतार नरसिम्हा’ने देखील कमाल करत सैय्याराला पछाडले आहे. साऊथचा सिनेमा असलेल्या ‘महावतार नरसिम्हा’ने दमदार कमाई करत नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस असलेल्या ‘होम्बाले फिल्म्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Todays Marathi Headline)
‘महावतार नरसिम्हा’ या ॲनिमेटेड चित्रपटाची कथा ही पौराणिक आहे. विशेष बाब म्हणजे सिनेमाची कथा जवळपास सर्वांनाच आधीपासूनच माहीत आहे. तरी सुद्धा या सिनेमातील काही खास गोष्टींमुळे सिनेमा कमालीचा गाजत आहे. या सिनेमाची मांडणी, चित्रपटातील संवाद, दृश्ये आणि मुख्य म्हणजे जबरदस्त ॲनिमेशन या कारणामुळे ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या सहाच दिवसांत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. पुन्हा एकदा एका प्रादेशिक चित्रपटाने बॉलिवूडच्या सिनेमावर बाजी मारली आहे. (Top Trending News)
महर्षी कश्यप आणि त्यांच्या पत्नी दितीच्या घरात जन्मलेल्या दोन राक्षसांपासून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हे दोघं संपूर्ण ब्रह्मांडावर अत्याचार करत असतात. हिरण्याक्षाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू वराहावतार घेतात. त्यानंतर हिरण्यकश्यप भगवान विष्णूशी सूड घेण्याचा निश्चय करतो. पण त्याचाच मुलगा प्रह्लाद हा विष्णूचा मोठा भक्त असतो. हिरण्यकश्यप स्वतःच्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न करतो. शेवटी भगवान विष्णू नरसिंह रूपात अवतार घेतात. ही या ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाची साधी सरळ सर्वश्रुत कथा आहे. (Marathi Top NEws)
‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाच्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, सॅकॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘महावतार नरसिम्हा’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. ही कमाई पहिल्या दोन दिवसांच्या कमाईच्या तुलनेत खूप जास्त आहे. सुट्टी नसूनही सिनेमासाठी कमालीची गर्दी होताना दिसत आहे. सिनेमाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढत असल्यामुळे सिनेमा आठवड्याच्या शेवटपर्यंत ५० कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी १.७५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ४.६ कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी ९.५ कोटी, चौथ्या दिवशी ६ कोटी, पाचव्या दिवशी ५ कोटी… म्हणजे सिनेमाने आतापर्यंत २६.८५ कोटी रुपयांचा कमाई केली आहे. (Marathi Latest NEws)
‘महावतार नरसिम्हा’ या सिनेमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हा चित्रपट ॲनिमेटेड असल्याने त्यात व्हिज्युअल इफेक्ट्स व्हीएफएक्सचेच मुख्य काम आहे. या चित्रपटाच्या यशात VFX चा खूप मोठा वाटा आहे. शिवाय या चित्रपटात एकापेक्षा एक दमदार सीन्स आहेतच. या सिनेमाचे पार्श्वसंगीत देखील प्रेक्षकांना आवडत आहे. ‘होम्बाले फिल्म्स’ ही कन्नड सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखली जाते. यामध्ये ऋषभ शेट्टीच्या ‘केजीएफ १ ’ आणि ‘केजीएफ 2’, ‘सलार- पार्ट 1 – सीझफायर’ यांसारख्या चित्रपटांचीही निर्मिती या संस्थेनं केली आहे. या यादीत आता ‘महावतार नरसिम्हा’चाही समावेश होणार आहे. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
=========
या चित्रपटांसोबत आता होम्बाले फिल्म्सची सात भागांची फिल्म फ्रँचाइजी सुरू झाली आहे. हे सात चित्रपट पुढील १२ वर्षांत प्रदर्शित होणार आहेत. सर्व चित्रपट पौराणिक असून भगवान अविष्णूंच्या अवतारांवर आधारित असतील. २०३७ मध्ये ‘महावतार कल्की- भाग 2’सह या फ्रँचाइजीचा शेवट होईल. त्याआधी ‘महावतार परशुराम’ (२०२७), ‘महावतार रघुनंदन’ (२०२९), ‘महावतार द्वारकाधीश’ (२०३१), ‘महावतार गोकुळानंद’ (२०३१) आणि ‘महावतार कल्की- भाग 1’ (२०३५) हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics