भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राजकारणातील सर्वात मोठे नाव म्हणजे महात्मा गांधी. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात महात्मा गांधी यांना ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या आभाळाएवढ्या कर्तृत्वाच्या जोरावर ‘राष्ट्रपिता’ ही पदवी मिळवली. अहिंसेच्या मार्गाने जात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. भारत देशाचा इतिहास हा महात्मा गांधी यांच्याशिवाय आजही अपूर्ण आहे आणि भविष्यात देखील अपूर्णच राहील. आज २ ऑक्टोबर अर्थात महात्मा गांधी यांची जयंती.
महात्मा गांधी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य केवळ देशाच्या आणि लोकांच्या हितासाठीच वेचले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना त्यांनी लोकांना जगण्याचे तंत्र देखील शिकवले. जगण्यासाठी त्यांनी सगळ्यांना चार समजुतीच्या गोष्टी देखील सांगितल्या. केवळ आज नाही तर येणाऱ्या असंख्य पिढयांना त्यांनी जगण्याचे तंत्र शिकवले. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असलेल्या महात्मा गांधी यांनी अनेक देशहिताची आणि लोकहिताची कामे केली. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचे महत्वाचे आणि सगळ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावे असे प्रेरणादायी विचार.
१) इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा.. तुम्हाला तुमचा ‘स्व’ सापडेल.
२) जग बदलायचे असेल तर आधी स्वत:ला बदला.
३) कायम असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.
४) आधी ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील.. आणि नंतर ते तुमच्याशी भांडतील तेव्हा तुम्ही जिंकाल.
५) तुम्ही मला साखळदंडात बांधून ठेऊ शकता.. यातना देऊ शकता…एवढेच नाही तर माझे शरीर नष्ट करु शकता; पण तुम्ही माझे विचार कधीच बंदीस्त करुन ठेऊ शकत नाही.
६) ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे.
७) जेव्हा मी निराश होतो.. तेव्हा मी आठवतो की, संपूर्ण इतिहासात सत्य आणि प्रेमाच्याच मार्गाचा विजय झाला आहे.
८) आपल्या योजनेवर विश्वास ठेवणारा एक सूक्ष्म जीव संपूर्ण इतिहास बदलू शकतो.
९) माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन
१०) केवळ प्रसन्नता हेच एकमेव असे अत्तर आहे, जे तुम्ही दुसऱ्यांवर शिंपडल्यास त्यातील काही थेंब नक्कीच तुमच्यावर देखील पडतील.
११) मानवतेवरील विश्वास गमावू नका. मानवता एखाद्या समुद्राप्रमाणे आहे. जरी या समुद्राचे काही थेंब वाईट असले तरी संपूर्ण समुद्र कधीच वाईट होऊ शकत नाही.
१२) ज्या दिवशी एक महिला रात्री रस्त्यावर एकट्याने फिरू शकेल, त्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले असे आपण म्हणू शकतो.
१३) व्यक्ती हा आपल्या विचारांनी घडणारा प्राणी आहे, तो जो विचार करतो तसाच तो बनतो.
१४) माझ्यातल्या उणीवा…माझे अपयश हे माझे यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळाले आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी ठेवतो.
१५) तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचे असू शकते, पण तुम्ही काहीतरी काम करणे, हे सर्वात महत्त्वाचे आहे…
१६) चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.
========
हे देखील वाचा : लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष
========
१७) इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा..तुमचे ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
१८) जोपर्यंत संपूर्ण मानवजातीच्या ऐक्यास महत्व दिले जात नाही तोपर्यंत देवाची आराधना, प्रार्थना, जप, उपवास सर्वच निरुपयोगी आहे.
१९) अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे.
२०) स्वत्व शोधण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे स्वत:ला दुसऱ्यांच्या सेवेत झोकून देणे.