महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने गुपचूप लगीनगाठ बांधली आहे. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याने त्याची प्रेयसी प्राजक्तासोबत लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पृथ्वीकने त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लग्नाचे सुंदर आणि खास फोटो शेअर करताना पृथ्वीकने कॅप्शनमध्ये लिहिले, “२५-१०-२०२४…एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!” आहे. सोबतच ‘जस्ट मॅरीड’ असा हॅशटॅग देखील दिला आहे.
लग्नासाठी पृथ्वीकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोती घातली आहे. तर त्याच्या पत्नीने प्राजक्ताने गोल्डन रंगाची साडी परिधान केली असून, त्यावर साजेसे दागिने आणि केसात गजरा माळला आहे.
पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचं नाव प्राजक्ता वायकुळ असून ते अनेक एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वीक आणि प्राजक्ता यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे.
पृथ्वीक प्रतापने लग्न करत असताना आपली सामाजिक जबाबदारी देखील जपली आहे. त्याने त्याच्या लग्नाचा सगळा खर्च दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जवाबदारी घेत त्यासाठीच वापरणार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान पृथ्वीकने लग्न केल्यानंतर त्याला अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात श्रुती मराठे, अश्विनी महांगडे, प्रथमेश शिवलकर, अमृता खानविलकर, अक्षया नाईक, स्वानंदी टीकेकर, सिद्धार्थ बोडके, गौरी नलावडे, प्रथमेश परब, साक्षी गांधी, गौरी कुलकर्णी आदी अनेक कलाकारांचा समावेश आहे.