Home » Divya Deshmukh : दिव्या देशमुखने वर्ल्ड नंबर 1 खेळाडूला केले ‘चेकमेट’, मोदींसह दिग्गजांनी केले कौतुक

Divya Deshmukh : दिव्या देशमुखने वर्ल्ड नंबर 1 खेळाडूला केले ‘चेकमेट’, मोदींसह दिग्गजांनी केले कौतुक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Divya Deshmukh
Share

भारताचे खेळाडू संपूर्ण जगात भारताचा नावलौकिक उंचावत आहे. फक्त क्रिकेटच नाही तर इतरही सर्वच खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची आघाडी पाहायला मिळत आहे. अशीच एक अलौकिक कामगिरी केली आहे, महाराष्ट्राच्या लेकीने. दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे. नागपूर येथील १९ वर्षीय दिव्या देशमुखने सोमवारी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची बुद्धिबळपटू हौ यिफानचा पराभव केला. (Divya Deshmukh)

ज्युनियर गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या दिव्याने चीनच्या हौ यिफानचा पराभव केला आणि जागतिक टीम रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत ३ पदके जिंकली. यामध्ये रॅपिड बुद्धिबळात रौप्य आणि ब्लिट्झमध्ये कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Marathi News)

दिव्याने मिळवलेल्या या मोठ्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नामचीन व्यक्तीने तिचे कौतुक केले आहे. लंडनमध्ये पार पडलेल्या FIDE वर्ल्ड ब्लिट्झ टीम बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात नागपूरच्या दिव्याचा सामना यिफानशी झाला. हा सामना बुद्धिबळाच्या सर्वात वेगवान स्वरूपात होता. डब्ल्यूआर बुद्धिबळ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यिफानने राउंड-रॉबिन सेमी फायनल सामन्याच्या पहिल्या सत्रात दिव्याला हरवले होते, परंतु दिव्याने दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं आणि पांढऱ्या सोगट्यांनी खेळून सुरुवातीला फायदा घेतला. (Top Marathi Headline)

Divya Deshmukh

वुमन ग्रॅण्डमास्टर असलेल्या १९ वर्षीय दिव्याने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात उत्कृष्ट व आक्रमक चाली खेळून सर्वांना चकित केले. दिव्याने ७४ चालींमध्ये तीन वेळा ‘ वर्ल्ड चॅम्पियन ‘ राहिलेल्या यिफानला पराभूत केले. मात्र, निर्णायक लढतीत दिव्याचा उझबेकिस्तानची महिला फिडेमास्टर निलोफरखान इमोमकुझिव्हाने पराभव केला. १९ वर्षीय दिव्याने ब्लिट्झमध्ये कांस्य आणि रॅपिडमध्ये रौप्यपदक जिंकले. वैयक्तिक गटात तिला रॅपिडमध्ये रौप्य आणि ब्लिट्झमध्ये कांस्यपदक मिळाले. तिने सोशल मीडियावर लिहिले, “जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिप संपली आहे! संघाने रॅपिडमध्ये दुसरे आणि ब्लिट्झमध्ये तिसरे स्थान मिळवले. (Todays Marathi Headline)

कोण आहे दिव्या देशमुख?
नागपुरच्या दिव्या देशमुख हिचा जन्म ९ डिसेंबर २००५ मध्ये झाला. ती वयाच्या ५ व्या वर्षीपासून बुद्धिबळ खेळायला शिकत होती. दिव्याचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. तर दिव्याची बहीण बॅडमिंटनपटू असून तिला सुरुवातीपासून खेळाचे आकर्षण होते. २०१२ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी दिव्याने अंडर -7 राष्ट्रीय चँपियनशिप जिंकली होती. त्यानंतर तिने अंडर-10 (डरबन, 2014) आणि अंडर-12 (ब्राजील, 2017) मध्ये जागतिक युवा विजेतेपद पटकावले. दिव्याने Woman FIDE Master (WFM) ही पदवी मिळवली. ऑक्टोबर 2021 मध्ये तिने Woman Grandmaster (WGM) ही मानद पदवी मिळवली. ही कामगिरी करणारी विदर्भातील पहिली आणि भारताची 22वी महिला खेळाडू ठरली. (Top Marathi News)

२०२३ मध्ये दिव्याने International Master (IM) ही अत्यंत प्रतिष्ठित पदवीही संपादन केली. दिव्याचे नाव आज जागतिक कनिष्ठ क्रमवारीत नंबर १ म्हणूनही घेतलं जातं. २०२४ मध्ये झालेल्या World Junior Girls U-20 Championship मध्ये तिने 11 पैकी 10 गुण मिळवत विजेतेपद मिळवले. दिव्याने केवळ वैयक्तिक स्पर्धांमध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघासाठीही मोठं योगदान दिलं आहे. ४५व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका होती. तिने World Team Rapid and Blitz Championship च्या Blitz विभागात २६०० पेक्षा जास्त परफॉर्मन्स रेटिंग मिळवत आपली ताकद सिद्ध केली. (Marathi Latest News)

Divya Deshmukh

दिव्याच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ‘एक्स’वर या सामन्यातील काही फोटो शेअर करीत तिचे कौतुक करताना लिहिले. ‘दिव्याच्या यशातून तिची जिद्द आणि तिचा दृढनिश्चय स्पष्ट दिसून येतो. तिची कामगिरी देशातील अनेक युवा बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारी ठरेल. तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,’ (Social News)

===========

हे देखील वाचा : Gupt Navratri : गुप्त नवरात्रीचे रहस्य !

Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

===========

दिव्याच्या या मोठ्या यशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील तिचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा युवा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश याने नॉर्वे चेस स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते. दिव्याचा हा विजय गुकेशच्या त्या सामन्याची आठवण करून देणारा ठरला. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.