‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. आपल्या विनोदाने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या शिवालीने एक विनोदी अभिनेत्री म्हणून स्वतःची एक ओळख तयार केली आहे.
शिवाली प्रेक्षकांना हसवण्यासोबतच सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय आहे. ती नेहमीच विविध पोस्ट, फोटो, व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांच्या संपर्कात राहते. तिचे पोस्ट, फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.
शिवालीला तिच्या फॅन्सने ‘कल्याणची चुलबुली’ हे नाव दिले आहे. शिवाली तिच्या विनोदासोबतच तिच्या सौंदर्यासाठी देखील खूपच लोकप्रिय आहे. अतिशय नाजूक आणि सुंदर शिवाली नेहमीच तिचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
नुकतेच शिवालीने तिचे गुलाबी साडीतील अतिशय आकर्षक फोटो ‘आँखों की गुस्ताख़ियाँ माफ़ हो !’ असे कॅप्शन देत इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो खूपच वययरल झाले असून, शिवालीच्या या लूकची आणि फोटोची खूपच चर्चा होत आहे.
शिवालीच्या फोटोंबद्दल आणि लुकबद्दल सांगायचे झाल्यास तिने मराठमोळं लूक करताना गुलाबी रंगाची कॉटनची काठपदर साडी नेसली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचीच स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहेत. त्यावर मोती असलेले मोठे कानातले घालत, नाकात नथ, केसांचा अंबाडा त्यावर गजरा आणि कपाळावर छोटी चंद्रकोर लावून लूक पूर्ण केला आहे.
शिवालीचा हा लूक तिच्या फॅन्सला खूपच आवडला असून तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा, कौतुकाचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान नुकताच शिवालीचा ‘पाणीपुरी’ नावाचा एक मस्त सिनेमा प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.