Home » राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न

राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न

by Jyotsna Kulkarni
0 comment
State Film Awards
Share

आपल्या कामाची पोचपावती प्रत्येक व्यक्तीला नेहमीच आवडते आणि अधिक चांगले काम करण्यास प्रेरणा देते. उत्तम काम केल्यावर पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप ही नेहमीच उत्साह आणि आनंद वाढवणारी असते. मनोरंजनविश्वात देखील कलाकारांच्या कामाची पोचपावती म्हणजे त्यांना मिळणारे पुरस्कार. आजच्या घडीला मनोरंजनविश्वात अनेक पुरस्कार दिले जातात.

असाच एक मोठा, महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार. कला क्षेत्रातील मान्यवरांना या मोठ्या आणि प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवले जाते. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असून महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील चित्रपट आणि कलाकारांना दिला जातो.

नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहिर झाले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले गेले. मुंबईमधील वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनामार्फत ५८ आणि ५९ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यावर्षी एकत्रच प्रदान करण्यात आले. २०२३ सालासाठी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार रोख रुपये १० लाख, मानपत्र आणि मानचिन्ह असे स्वरूप असलेला पुरस्कार जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना ‘सीआयडी’ या तुफान गाजलेल्या मालिकेतील ‘एसीपी प्रद्युमन’ या भूमिकेसाठी दिला गेला. तर स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार रोख रुपये १० लाख, मानपत्र आणि मानचिन्ह असे स्वरूप असलेला पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

यासोबतच, २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार रोख रुपये ६ लाख, मानपत्र आणि मानचिन्ह असे स्वरूप असलेला पुरस्कार लेखक-दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार रोख रुपये ६ लाख, मानपत्र आणि मानचिन्ह जेष्ठ लेखक- दिग्दर्शक- संकलक एन. चंद्रा यांना प्रदान करण्यात आला.

यासोबतच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना सन्मानित करण्यात आला.

या कार्यक्रमात यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना, प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2024 आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

58 वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट कथा :- शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ),
पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक ),
उत्कृष्ट संवाद :- शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )
उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक)
उत्कृष्ट संगीत: – राहुल देशपांडे ( मी वसंतराव )
उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- विजय गवंडे ( बापल्योक ),
उत्कृष्ट पार्श्वगायक:- राहुल देशपांडे ( मी वसंतराव )
उत्कृष्ट पार्श्वगायिका:- प्राची रेगे ( गोदाकाठ )
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- सुजितकुमार (चोरीचा मामला )
उत्कृष्ट अभिनेता:- राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट अभिनेत्री :- मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )
उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी ( चोरीचा मामला )
सहाय्यक अभिनेता :- विठ्ठल काळे ( बापल्योक ),
सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे ( फनरल),
प्रथम पदार्पण अभिनेता:- ऋतुराज वानखेडे ( जयंती),
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पल्लवी पालकर ( फास )

59 वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी),
उत्कृष्ट पटकथा :- रसिका आगासे ( तिचं शहर होणं ),
उत्कृष्ट संवाद :- नितीन नंदन ( बाल भारती )
उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी )
उत्कृष्ट संगीत: – अमित राज ( झिम्मा)
उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी),
उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहुल देशपांडे ( गोदावरी ),
उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर),
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर ( लक डाऊन be positive )
उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,)
उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ),
उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू )

======

हे देखील वाचा : जान्हवीने मागितली पंढरीनाथ कांबळेंची माफी

======

सहाय्यक अभिनेता :- अमेय वाघ ( फ्रेम )
सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ),
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )’
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमणध्वनी),
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- निर्मिती सावंत ( झिम्मा )


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.