Home » Maharashtra : ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान

Maharashtra : ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान

by Jyotsna Kulkarni
0 comment
Maharashtra
Share

नुकताच मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यंदाचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा असल्याने याला विशेष महत्व होते. ५ ऑगस्ट २०२५ रोजी वरळीमधील एनएससीआय डोम याठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावर्षी विविध श्रेणींमध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जाणून घेऊ विजेत्यांची नावे (Todays Marathi Headline)

* राज कपूर विशेष योगदान पुरस्कार: अभिनेत्री काजोल
* राज कपूर जीवनगौरव पुरस्कार: अभिनेते अनुपम खेर
* व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार: अभिनेत्री मुक्ता बर्वे
* व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार: दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार: गझलकार पंडित भीमराव पांचाळे

Maharashtra

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

* सर्वोत्कृष्ट चित्रपट : धर्मवीर
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रवीण तरडे (धर्मवीर)
* सर्वोत्कृष्ट अभिनेता : प्रसाद ओक (धर्मवीर)
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) : अमृता खानविलकर (चंद्रमुखी), सई ताम्हणकर (पाँडिचेरी)
* उत्कृष्ट सहायक अभिनेता : योगेश सोमण (अनन्या)
* उत्कृष्ट सहायक अभिनेत्री : मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)
* सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : संजय नार्वेकर (टाईमपास 3)
* उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता : जयदीप कोडोलीकर (या गोष्टीला नावच नाही)
* उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री : ऋता दुर्गुळे (अनन्या)
* अंतिम फेरीतील दिग्दर्शक : ऋषी देशपांडे (समायरा)
* अंतिम फेरीतील चित्रपट : समायरा
* प्रथम पदार्पण दिग्दर्शक : प्रताप फळ (अनन्या)
* प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती : झेनिथ फिल्म्स (आतुर)
* उत्कृष्ट गीत : ढगा आड या – अभिषेक खणकर
* उत्कृष्ट पार्श्वसंगीत : हनी सातमकर – चित्रपट आतुर
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : मनीष राजगिरे – भेटला विठ्ठल गीत – धर्मवीर
* उत्कृष्ट गायिका (विभागून) : आर्या आंबेकर – बाई गं- चंद्रमुखी अमिता घुगली – तुला काय सांगू कैना
* उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : उमेश जाधव – धर्मवीर – गीत आई जगदंबे
* सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : निहार शेंबेकर
* उत्कृष्ट बालकलाकार (विभागून) : त्रिशा ठोसर (नाळ 2) आणि कबीर खंदारे (जिप्सी)
* उत्कृष्ट तृतीय क्रमांक चित्रपट दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे (हर हर महादेव)
* तृतीय क्रमांक चित्रपट : हर हर महादेव
* द्वितीय क्रमांक दिग्दर्शक : सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)
* क्रमांक दोन चित्रपट : पाँडिचेरी
* उत्कृष्ट तृतीय क्रमांक चित्रपट दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे (हर हर महादेव)
* तृतीय क्रमांक चित्रपट : हर हर महादेव
* द्वितीय क्रमांक दिग्दर्शक : सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)
* क्रमांक दोन चित्रपट : पाँडिचेरी
* सर्वोत्कृष्ट चित्रपट : भेरा
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : श्रीकांत प्रभाकर (भेरा)
* सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमेय वाघ (जग्गू आणि ज्युलिएट)
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : रिंकु राजगुरु (आशा)
* अंतिम फेरीतील दिग्दर्शक : दीपक पाटील (आशा)
* अंतिम फेरीतील चित्रपट : आशा
* प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक : आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)
* प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती : बोलपट निर्मिती (जिप्सी)
* सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता : दीपक जोईल (भेरा)
* सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून) : श्रद्धा खानोलकर (भेरा) गौरी देशपांडे (श्यामची आई)
* उत्कृष्ट गीत : वैभव देशमुख – गीत भिंगोरी (नाळ 2)
* उत्कृष्ट पार्श्वसंगीत : अद्वैत नेमळेकर (नाळ 2)
* उत्कृष्ट पार्श्वगायक : मोहित चौहान (घर बंदुक बिर्यानी)
* उत्कृष्ट पार्श्वगायिका : रुचा बोंद्रे (श्यामची आई) – गीत भरजरी गं पीतांबर
* उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : राहुल ठोंबरे आणि संजीव हाउलदर ( जग्गू आणि ज्युलिएट)
* उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)
* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : संतोष जुवेकर (रावरंभा)
* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : आशा (उषा नाईक)
* उत्कृष्ट विनोदी अभिनेता : उपेंद्र लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)
* उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : निर्मिती सावंत (झिम्मा 2)
* अंतिम फेरीतील दिग्दर्शक आणि चित्रपट : सुधाकर रेड्डी यक्कंडे (नाळ 2)
* सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक तीन : नाळ 2
* उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक दोन : महेश लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)
* सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक दोन : जग्गू आणि ज्युलिएट

Maharashtra

 

या सोहळ्यात “छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025” देखील जाहीर करण्यात आला. राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव या विशेष पुरस्काराने करण्यात आला. (Top Marathi News)

दरम्यान ५० वर्षांहून अधिक काळ गझल गायकीचा ठेवा जपणारे गझलसम्राट भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल अस या पुरस्काराचे स्वरुप आहे. भीमराव पांचाळे यांनी मनोगत व्यक्त करताना ‘आज मी भरुन पावलो’ अशी भावना व्यक्त केली. (Marathi Trending News)

अभिनेते अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने राज्य सरकारकडून सन्मानित करण्यात आले. चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनुपम खेर यांचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात खास सन्मान करण्यात आला. तर अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Top Stories)

बॉलिवूड अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी तिची आई आणि जेष्ठ अभिनेत्री तनुजा देखील उपस्थित होत्या. या सोहळ्यात काजोलने मराठीमध्ये तिचे मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेला चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.