Home » Maharashtra Election : ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी’चे पुन्हा बारा वाजता वाजता राहिले!

Maharashtra Election : ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी’चे पुन्हा बारा वाजता वाजता राहिले!

by Team Gajawaja
0 comment
Maharashtra Election
Share

सध्या महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस का ते नव्याने सांगायची गरज नाही. आजही हे चारही पक्ष युद्धभूमीसारखेच वावरत असतात. पण शिवसेनेत जितकी गरमागरमी आहे, तितकी राष्ट्रवादीत तशी दिसत नाही. हो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एकाच घरातल्या स्त्रिया एकमेकांसमोर आल्या होत्या. यावेळी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे जिंकल्या आणि त्यांचं-त्यांचं त्यांनी मिटवून घेतलं. नंतर विधानसभा इलेक्शनमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस पहायला मिळाली. पण एका गोष्टीमुळे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड नुकसान सोसावं लागलं. अगदीच इलेक्शनमध्ये तुतारीचे बारा वाजले असं म्हटलं तरी हरकत नाही. हे नुकसान झालं पिपाणी या चिन्हामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हे चिन्ह हटवण्याची मागणी केल्यामुळे निवडणूक आयोगाने हे पिपाणी चिन्ह वगळलं. पण याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा आणि विधानसभेत कसा फटका बसला, यावर एक नजर टाकूया ! (Maharashtra Election)

राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर मूळ चिन्ह म्हणजेच घड्याळ आणि पक्ष अजित पवारांच्या पारड्यात पडलं. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह मिळालं. आता अनेकांना निवडणुकीमधली लफडी माहितीच असतील की, कशाप्रकारे काही अपक्ष उमेदवारांची सेम टू सेम नावं असतात, चिन्ह थोडं सिमिलर असतं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबतही असाच झोल झाला आणि त्यांच्या विरोधात आलं पिपाणी चिन्ह  मुळात एखाद्या पक्षाचं चिन्ह हाच त्यांचा चेहरा असतो आणि काही लोकं चिन्ह दिसत की वोट टाकतात. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पिपाणीने मात्र राष्ट्रवादीच्या तुतारीचे बाराच वाजवले होते.  (Political News)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीसमोर बाकीच्या मोठ्या पक्षांचं आव्हान तर होतच, पण सर्वात मोठ आव्हान आलं होतं, अपक्षांच्या ‘पिपाणी’ या चिन्हाचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तर असाही दावा केला होता की, या पिपाणीमुळे लोकसभा निवडणुकीत तुतारीऐवजी पिपाणीला लाखो मतं पडली. आणि हेच पुढे विधानसभा निवडणुकीतही घडलं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १९ उमेदवार पडले. पण त्यांच्या दाव्यात खरच तथ्य होतं का ? तर हो, रावेर, दिंडोरी, भिवंडी, शिरुर, अहमदनगर, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना हजारो-लाखो मते मिळाली होती. आता तुलना बघुया रावेरमध्ये विजय झाला रक्षा खडसे यांना त्यांना मतं मिळाली ६३०८७९ दुसऱ्या क्रमांकावर होते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे श्रीराम पाटील ज्यांना मिळाली ३५८६९६ मत यातच चौथ्या क्रमांकावर होते पिपाणीवाले अपक्ष एकनाथ साळुंके ज्यांना ४३ हजार ९५७ मतं मिळाली. (Maharashtra Election)

दिंडोरीमध्ये जरी शरदचंद्र पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा ५७७३३९ मतांनी विजय झाला असला, तरी तिसऱ्या क्रमाकांवर पिपाणी चिन्हासह अपक्ष उभे असलेल्या बाबू भगरे यांना तब्बल १ लाख ३ हजार ६३२ मतं मिळाली. या यादीत दुसऱ्या क्रमांकांची मतं मिळाली भाजपाच्या डॉ. भारती पवार यांना ४६४१४० . भिवंडीत शरदचंद्र पवार गटाच्या बाळ्या मामा म्हात्रे यांचा ४९९४६४ मतांनी विजय झाला. दुसऱ्या क्रमांकावर होते भाजपाचे कपिल पाटील ज्यांना ४३३३४३ मतं मिळाली. याच लिस्टमध्ये चौथ्यावर होत्या पिपाणी चिन्ह असलेल्या कांचन वखरे… ज्यांना २४ हजार ६२५ मतं मिळाली. शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे ६९८६८२ मतांसोबत जिंकले. दुसऱ्यावर होते अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव ज्यांना मिळाली ५५७७४१ मतं आणि तिसऱ्यावर होते, पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष मनोहर वाडेकर ज्यांना २८ हजार ३२४ मतं मिळाली. (Political News)

अहिल्या नगरमध्ये शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके ६२४६९७ मतांसह जिंकले. दुसऱ्या क्रमाकांवर भाजपाचे सुजय विखे पाटील ५९५८६८ मतांसह होते. आणि तिसऱ्यावर पुन्हा पिपाणी गोरख आळेकर ज्यांना ४४ हजार ५९७ मतं पडली. पिपाणीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला सातारामध्येच बसला. सातारा लोकसभा मतदारसंघात तुतारीसह शशिकांत शिंदे उभे राहिले होते. दुसरीकडे होते भाजपाचे उदयनराजे भोसले… यावेळी उदयनराजे यांना ५७११३४ मतं पडली. दुसऱ्यावर राहिले शशिकांत शिंदे… ज्यांना मिळाली ५३८३६३ मतं… आणि तिसऱ्यावर पिपाणी चिन्हासह अपक्ष होते साताऱ्याचे संजय गाडे ज्यांना ३७ हजार ६२ मतं मिळाली होती. (Maharashtra Election)

आता पिपाणीला इतकी हजारो-लाखो मतं मिळत असल्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने पिपाणी चिन्ह वगळण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र आयोगाने हे फेटाळून लावलं. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीला अपक्ष ठिकठिकाणी पिपाणी घेऊन तयारच झाले. आणि व्हायचं तेच झालं शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघामध्ये पिपाणीला पसंती मिळाली. तुतारी काही वाजू शकली नाही. त्यासोबतच जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा या मतदारसंघांत शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला, त्यापेक्षा अधिक मतं पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्षा उमेदवारांना मिळाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं असं म्हणण होतं की, ही मतं विभाजित झाली नसती तर आमचे १९ आमदार निवडून आले असते. इथेच अजून एका गोष्टीमुळे जास्तच फटका बसला, ते म्हणजे पिपाणी या चिन्हालासुद्धा निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव होतं. आता सेम सेम नावं, चिन्ह पण थोडेफार सिमिलर त्यामुळे मतदात्यांचा गोंधळ उडण साहजिकच होतं. विधानसभा निवडणुकीत ८५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते आणि या सर्वच जागांवर पिपाणीवाले अपक्षसुद्धा होते. याच्याव्यतिरिक्त विधानसभेच्या २८८ पैकी १६३ ठिकाणी पिपाणी चिन्हाचे उमेदवार होते. (Political News)

========================

हे देखिल वाचा : Bihar Election : १५ वर्षे झगडूनही लालूंचा पोरगा का जिंकत नाही..

========================

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेत म्हटलं होतं, की तुतारीची आता पिपाणी करायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांकडूनच अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देऊन मैदानात उतरवण्याचा हा डाव असू शकतो. यात शंकाच उरत नाही. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पिपाणीमुळे तुतारीला नुकसान होऊ नये, म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी करण्यात आली होती. आणि आता अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत आगामी निवडणुकीत पिपाणी चिन्ह वगळलं आहे. आयोगाने आपल्या १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणीला वगळून टाकलं आहे. एकंदरीत तिसऱ्यांदा पिपाणीकडून तुतारीचे बारा वाजता वाजता राहिले. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये याचा फायदा शरद पवार गटाच्या उमेदवारांना होईल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. (Maharashtra Election)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.