भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी आहे. आज दिवस सगळीकडे महापरिनिर्वाण दिन साजरा होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात.
समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ६ डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान आणि माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात त्यांनी सखोल ज्ञान प्राप्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम समाजातील दुर्लक्षित वर्गाला प्राधान्यामध्ये ठेऊन त्यांच्यासाठी कार्य केले. तयांनी दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. बाबासाहेब डॉ भीमराव रामजी आंबेडकर हे विद्वान, समाजसुधारक आणि भारतातील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे नेते होते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेरडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी जाणून घेऊया त्यांचे उच्च, प्रेरणादायी आणि महान विचार.
– नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. आपण जे करतोय किंवा आपल्यात जी ताकद आहे ती ओळखायला शिका. नशिबावर निर्भर राहू नका.
– दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे. इतर लोकांना मदत करत राहा. त्यांच्या सुख दुखःत सहभागी व्हा. यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील.
– जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहास कधी विसारायचा नसतो. त्यातून अनेक गोष्टी शिकायच्या असतात. ज्या चुका इतिहासात झाल्या त्या पुन्हा होऊ द्यायच्या नसतात.
– हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.
– शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
– उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका.
– बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे. आपण नेहमी काहीतरी शिकत राहिले पाहिजे. आपले ज्ञान वाढविण्यावर भर दिला पाहिजे.
– माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा.
– स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा.
– मोठ्या गोष्टीचे बेत आखत वेळ दवडण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
– शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
– सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
– काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
– महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो.
– बोलण्यापूर्वी विचार करा, बोलून विचारात पडू नका.
– महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.
– मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.
– आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.
– बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.
– स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.
– माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.
– रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.
– अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.
– जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.
– सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.
– माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
– माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
– जेथे एकता तेथेच सुरक्षितता.
– जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.