पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. रामगिरी महाराज यांच्यावर त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये याविरोधात निषेध मोर्चा देखील काढण्यात आला.
रामगिरी महराजांना अटक करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाने केली. नाशिकच्या सिन्नरमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज एकाच मंचावर एकत्र उपस्थित राहिले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण करताना महंत रामगिरी महाराज यांचं कौतुक करत संतांच्या केसालाही धक्का लागणार असे सांगितले. ते म्हणाले, “राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. राज्यातील संत परंपरा मोठी आहे. संतांच्या आशीर्वादानं राज्य चालू आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही.”
नाशिकच्या सिन्नरमधील पंचालेन येथे एका मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत संतांचा सन्मान केला जाईल. संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भाजप नेते गिरीश महाजन, माजी खासदार सुजय विखे पाटील, शिवनेचे नेत हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते.
सोबतच पुढे सीएम शिंदे म्हणाले, “यावर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा जास्त दुप्पट लोकं होती. गेल्यावर्षी वारीला 15 लाख वारकरी होते. यावर्षी 25 लाख वारकरी होते. वारकरी संप्रदायाची ही ताकद, महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनासाठी वापरली जाते. समाजाला दिशा देण्याचे काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात. म्हणून या जागेवर देवाचा वास आणि आशीर्वाद आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे.”
दरम्यान रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनादरम्यान पैगंबरांविषयीही एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बांग्लादेशात कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत. आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहे. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केला. कोटी-दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. बांगलादेशमध्ये जे घडलं ते उद्या आपल्या देशात घडायला नको, हिंदूंनी सुद्ध मजबूत राहायला हवे. अन्यायाचा विरोध करता आला पाहिजे. असे ते म्हणाले.