प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. जगातील या सर्वात भव्यदिव्य अशा धार्मिक उत्सवासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करण्यात येत आहे. यासाठी जसे मान्यवर इंजिनिअर आणि आर्केटेक्ट या नगरीच्या उभारणीत योगदान देत असतांना या भागाची स्वच्छता करण्यासाठी हजारो स्वच्छता कर्माचारीही तैनात आहेत. यातील अनेक स्वच्छता कर्मचारी हे आपल्या कुटुंबासह या प्रयागराज नगरीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही आहेत. अन्य शहरातून प्रयागराजमध्ये आलेल्या या स्वच्छता कर्मचा-यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून प्रयागरजमध्ये कुंभशाळाही सुरु करण्यात आल्या आहेत. प्रशासनानं या शाळांना कुंभ शाळा, विद्या कुंभ अशी नावे दिली असून या प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचा-यांची मुले शिक्षण घेत आहेत. यातील अनेक स्वच्छता कर्मचारी हे आपल्या मुलांना शाळेत सोडून प्रयागराज नगरी स्वच्छ करण्याच्या कामात गुंतून गेले आहेत. (Mahakumbha)
अशावेळी या मुलांचा दिवसभर सांभाळ या शाळांमध्ये होत असून स्वच्छता कर्मचारीही या व्यवस्थेवर समाधानी आहेत. प्रयागरजमधील महाकुंभ हा फक्त श्रद्धेचा आणि धार्मिक नसून तर तो विद्याकुंभ असल्याचे सिद्ध झाले आहे. या महाकुंभला सर्वार्थांनं वेगळं आणि वैशिष्टपूर्ण करण्यासाठी तत्पर असणा-या उत्तरप्रदेश सरकारनं आणखी एक वेगळा उपक्रम चालू करुन वाहवा मिळवली आहे. हा उपक्रम म्हणजे, विद्या कुंभ शाळा. या भागात मोठ्या संख्येनं आलेल्या स्वच्छता कर्मचा-यांची मुले येथे शिक्षण घेत आहेत. महाकुंभात गुंतलेल्या कामगारांच्या मुलांसाठी संगम परिसरात तात्पुरत्या शाळा बांधण्यात आल्या आहेत. या पाच विद्या कुंभ प्राथमिक शाळा असून यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जात आहे. प्रयागराजच्या संगम शहरात 2025 च्या महाकुंभाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. हे महाकुंभ भव्य दिव्य बनवण्यासाठी फक्त प्रयागराज, उत्तरप्रदेशमधीलच कामगार नाही तर देशभरातील हजारो कामगार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. (Marathi News)
या कामगारांनी गेल्या वर्षापासून प्रयागराजमध्ये तळ ठोकला आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रयागराज महाकुंभ संपणार आहे. मात्र त्यानंतरही हे कामगार एखाद महिना प्रयागराजला राहणार आहेत. या सर्वांसोबत त्यांचे कुटुंबही आहे. अनेक कर्मचा-यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत महाकुंभच्या कामात गुंतल्या आहेत. अशावेळी आपल्या लहान मुलांची जबाबदारी कोणावर सोपवावी हा प्रश्न या कामगारांना पडला होता. मात्र आता या कुंभ शाळांमुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुलांचे शिक्षणही पूर्ण होत असून ही मुले दिवसभर त्यांच्यासाठी बांधलेल्या शाळांमध्येच ते मुक्काम करत आहेत. महाकुंभची तयारी सुरु झाली तेव्हा सुरुवातीला अशा पाच विद्या कुंभ प्राथमिक शाळा बांधण्यात आल्या. मात्र त्यानंतर त्यात टप्प्याटप्यानं वाढ करण्यात आली. (Mahakumbha)
या मुलांना शिक्षणासोबत अन्न आणि अन्य आवश्यक सुविधाही देण्यात येत आहेत. मूलभूत शिक्षण विभागाच्या या उपक्रमाला शिव नाडर संस्थेचेही सहकार्य मिळत आहे. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांना अभ्यासात रस निर्माण व्हावा यासाठी स्मार्ट क्लासेसचीही निर्मिती करण्यात आली आहे. या स्मार्ट क्लासेसमध्ये मुलांना दृकश्राव्य माध्यमातून शिकवले जात आहे. त्यामुळे या शाळांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशसोबत मध्य प्रदेश, बिहारसह इतर राज्यांतील मुलेही आपल्या मुळे शाळांसोबत जोडली गेलेली आहेत. या कुंभ शाळांमध्ये मुलांना मूलभूत शिक्षण विभागाकडून त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जात आहे. महाकुंभमेळा 13 जानेवारी रोजी सुरु होत असून 26 फेब्रुवारी पर्यंत महाकुंभ असणार आहे. मात्र या शाळा मार्च महिन्यापर्यंत असण्याची शक्यता आहे. (Marathi News)
====================
हे देखील वाचा :
Mahakumbha : शाही स्नानाचा पहिला मान कुठल्या आखाड्याला ?
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
कारण महाकुंभ संपल्यानंतर या नगरीची स्वच्छता करण्याचे आव्हान या कर्मचा-यांसमोर राहणार आहे. त्यामुळे या कुंभशाळा किमान मार्च महिन्यापर्यंत चालणार आहेत. त्यानंतर ही मुले आपापल्या शाळेत परत गेल्यावर त्यांना मूलभूत शिक्षण विभाग कुंभ परिसरातील विद्या कुंभमधून अभ्यासाचे प्रमाणपत्र देईल. ज्यामध्ये ही मुले त्यांच्या शाळेत दाखवून त्यांच्या संबंधित वर्गात परीक्षेसाठी पात्र होतील. या शाळा सुरु करण्याआधी संपूर्ण स्वच्छता कर्मचारी वसाहतीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर मुलांचे वय आणि मुले कोणत्या वर्गात शिकत आहेत, याचा अहवाला तयार करण्यात आला आणि शाळांतील वर्ग करण्यात आले. आता या वर्गांमध्ये 500 मुले असून त्यांना आवश्यक पुस्तके, वह्या आणि शाळेचा गणवेशही देण्यात आला आहे. (Mahakumbha)
सई बने