Home » कुंभमध्ये स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची कशी करतात मोजणी?

कुंभमध्ये स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची कशी करतात मोजणी?

मध्य प्रदेशातील प्रयागराज येथे यंदा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी देशविदेशातून कोट्यावधींच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली आहे.

by Team Gajawaja
0 comment
Share

Mahakumbh 2025 : मध्य प्रदेशातील प्रयागराज येथे यंदा महाकुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळा असणार आहे. या कुंभ मेळ्यात शाही स्नानाचे फार महत्व आहे. पहिल्याच दिवशी 3.5 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगामध्ये स्नान केले. गेल्या तीन दिवसांमध्ये 6 कोटींहून अधिक भाविकांनी कुंभामध्ये स्नान केले. या 45 दिवसांमध्ये 45 कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर भाविकांच्या आकडेवारीबद्दल माहिती दिली होती. अशातच प्रश्न असा उपस्थितीत होतो की, एवढ्या गर्दीमधील भाविकांच्या उपस्थितीची मोजणी कशी केली जाते? याबद्दलच पुढे जाणून घेऊया.

भाविकांच्या उपस्थितीची मोजणी
कुंभ मेळ्यामध्ये भाविकांच्या उपस्थितीची आकडेवारी करण्याची पद्धत 19 व्या शतकापासूनच सुरू झाली होती. वर्ष 1882 मध्ये कुंभात इंग्रजांनी प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट लावून भाविकांची मोजणी केली होती. रेल्वे तिकीट विक्रीच्या आकडेवारीवरुनही मेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या आकडेवारीचा अंदाज लावला गेला होता. त्यावेळी जवळजवळ 10 लाख भाविक त्रिवेणी संगमात पोहोचतील असा अंदाज होता. वर्ष 1906 मध्ये कुंभाममध्ये जवळजवळ 25 लाख भाविक सहभागी झाले होते. अशाप्रकारे वर्ष 1918 च्या महाकुंभात 30 लाख भाविकांनी संगमात स्नान केले होते.

AI आणि CCTV ची मदत
यंदाच्या कुंभ मेळ्यातील गर्दीचे आकलन करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मदत घेतली जात आहे. मेळ्यामध्ये 200 ठिकाणी अस्थायी रुपात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय संपूर्ण प्रयागराज येथे 268 जागांवर 1107 कॅमेरे लावण्यात आले आहेत. शंभरहून अधिक पार्किंग ठिकाणी 700 हून अधिक सीसीटीव्ही लावले असून भाविकांची मोजणी करण्यास मदत करतात.

नाव, वाहन आणि साधुंच्या कॅम्पचे योगदान
भाविकांच्या संख्येचा अंदाज नाव, ट्रेन, बस आणि खासगी वाहनांच्या माध्यमातून लावला जातो. साधु-संत आणि अखाड्यामध्ये येणाऱ्या भाविकांची आकडेवारी एकूण आकडेवारीमध्ये जोडली जाते. दरम्यान, एकाच व्यक्तीची गणना अनेकदा होऊ शकते. कारण काहीजण वेगवेगळ्या घटांवर स्नान करतात किंवा मेळ्यामध्ये ठिकठिकाणी फिरत राहतात. (Mahakumbh 2025)

यापूर्वी कशी व्हायची गणना?
वर्ष 2013 पूर्वी मेळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांची गणना डीएम आणि एसएसपीच्या रिपोर्टच्या आधारावर केली जात होती. यामध्ये बस, ट्रेन आणि खासगी वाहनांच्या आकडेवारीचा समावेश होता. अखाड्यामधील भक्तांचा आकडा देखील कळला जात होता. याआधी भाविकांची गणना करणे थोडे सोपे होते. पण आता वाढत्या गर्दीमुळे आणि शहरातील काही प्रबंधांमुळे आकडेवारी करणे कठीण झाले आहे.

वर्ष 2013 मध्ये आकडेवारीसाठीची पद्धत
DW च्या रिपोर्टनुसार, वर्ष 2013 मध्ये कुंभमध्ये पहिल्यांदा सांख्यिकी पद्धतीचा वापर करण्यात आला होता. यामध्ये स्नानासाठी महत्वाची ठिकाणे आणि वेळ ठरवली गेली होती. आकडेवारीनुसार, एका व्यक्तीला स्नानाला 0.25 मीटर जागा आणि 15 मिनिटांचा वेळ दिला जात होता. अशाप्रकारे, एका तासात एका घाटावर जवळजवळ 12,500 लोक स्नानसाठी येऊ शकत होते. यंदा प्रयागराजमध्ये 44 घाट स्नान करण्यासाठी तयार करण्यात आले होते. या सर्व घाटांवर 18 तास सातत्याने स्नान केले जात होते.


आणखी वाचा : 

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !

Prayagraj : महाकुंभमध्ये मिळाले हाताला काम !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.