तिर्थराज प्रयाग आता देश विदेशातील भाविकांच्या जयघोषांनी दुमदुमून गेले आहे. महाकुंभ 2025 चा प्रारंभ कधी होणार याची उत्सुकता भाविकांना होती आणि महाकुंभ सुरु झाल्यापासून दिवसाला करोडो भाविक येतात अमृत स्नान करीत आहेत. पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाच्या दिवशी, 1.65 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले. दुस-या अमृत स्नानाच्या दिवशी संगमामध्ये 3.5 कोटी लोकांनी स्नान केले. संगमात स्नान केल्याची नोंद झाली आहे. सर्व आखाड्यातील साधूंनीही संगम स्नान केल्यावर अन्य भाविकांची अधिक गर्दी झाली. त्यामुळे प्रयागराज येथील आठही रेल्वे स्थानकांवर भाविकांचा महापूर आल्यासारखी परिस्थिती होती. तसेच बस स्टॅंडकडे जाणा-या रस्त्यावरही पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती होती. अनेक भाविक स्नान करुन प्रयागराजमधून बाहेर पडत असले तरी करोडो भाविक याच नगरीमध्ये राहून येथील अन्य पवित्र स्थानांचे दर्शनही घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. (Prayagraj)
हर हर महादेवचा जयघोष प्रयागराजमधील पवित्र संगम स्थानावर करोडो भाविक स्नान करत आहेत. यानंतर प्रयागराजमधील अन्य स्थाने बघण्यासाठी गर्दी होत आहे. संगम स्थानावर भाविकांसाठी स्पीड बोट आणि मिनी क्रूझचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यातून त्रिवेणी संगमाचे विलोभनीय दृश्य बघता येते. यानंतर घाटालगत असलेल्या किल्ल्याला भेट द्यायला हवी. या किल्यामध्ये अक्षयवट वृक्ष आहे. या वृक्षाची मोठी मान्यता आहे. युगाच्या सुरुवातीपासून हा वृक्ष असल्याचीही मान्यता आहे. या वृक्षाचा घेराच हा दहा मीटर आहे. पाताळपुरी येथील मंदिरांमध्येही भाविकांना भेट देता येते. ऋषी भारद्वाज आश्रमला भेट देण्यासाठीही मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी होत आहे. या आश्रमाबद्दल असे म्हटले जाते की, वनवासाच्या काळात भगवान राम, माता सीता आणि बंधू लक्ष्मणानी येथे मुक्काम केला होता. येथे भरत आणि सीता कुंडही आहे. असे मानले जाते की त्रेता युगात भगवान रामाने भरत कुंडाजवळ येथे यज्ञ केला होता. (Social News)
या आश्रमात अतिशय पुरातन शिवमंदिर आहे. प्रत्यक्ष भारद्वाज ऋषींनी हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. भारद्वाज ऋषींनी याच आश्रमात पुष्पक विमानाची बांधणी केल्याचीही आख्यायिका आहे. या आश्रमाचे महाकुंभसाठी सुशोभिकरण करण्यात आले. कॉरिडोअरही करण्यात आला आहे. या आश्रमात भाविक यज्ञ, ध्यान आणि तपस्या करण्यासाठी भाविका गर्दी करतात. कल्याणी देवी मंदिर हे जुन्या प्रयागराज शहरात आहे. या मंदिराची ओळख शक्तीपीठ महणून आहे. येथे देवीची आरती ही वैशिष्टपूर्ण असते. तीन वेळ होणा-या देवीच्या आऱतीला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. प्रयागराजमधील सर्वच मंदिरे ही पौराणिक वारसा असलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे, शंकर विमान मंडपम मंदिर. संगम स्थळापासून अवघ्या काही अंतरावर असलेले हे मंदिर भाविकांच लक्ष खेचून घेते. तीन मजली भव्य अशा या मंदिरातील कलाकुसर ही बघण्यासारखी आहे. (Prayagraj)
हे तीन मजली मंदिर कांची कामकोटी 69 वे पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांनी त्यांच्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी बांधले होते. या मंदिराचा पहिला मजला कांची कामकोटी पीठात पूजा केल्या जाणाऱ्या कामाक्षी देवीला समर्पित आहे. दुसरा मजला भगवान विष्णूच्या बालाजी रूपावर आधारित मुर्ती आहे. तिसऱ्या मजल्यावर एकाच दगडात योग सहस्र लिंग आहे. एकाच दगडात एक हजार शिवलिंगे आणि रुद्राक्षांचा मंडप बनवला आहे. या मंदिरात येणारे भाविक येथील कलाकुसर बघून मोहित होतात. महाकुंभसाठी या मदिंरातही यात्रेकरुंसाठी भोजनाची व्यवस्था कऱण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये आलेले भाविक एका मंदिरात गेल्याशिवाय या नगरीमधून बाहेर पाय ठेवत नाही, असे मंदिर म्हणजे, लेटे हनुमान मंदिर. पवित्र स्नान केल्यावर या मंदिरात गेल्याशिवाय महाकुंभ पूर्ण होत नाही, अशी धारणा आहे. या मंदिरात भगवान हुनमान यांची भव्य प्रतिमा असून ती झोपल्यासारखी आहे. (Social News)
=====================
हे देखील वाचा : Maha Kumbh : महाकुंभ पाहून भारावले परदेशी भाविक !
Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !
=====================
लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असल्यामुळे दीड ते दोन तास हुनमानांच्या दर्शनासाठी रांगेत उभे रहात आहेत. यासोबत समंगाजवळ वेणी माधव मंदिरही प्रसिद्ध आहे. वेणी माधव मंदिर हे पंचकोशी परिक्रमेचे केंद्र मानले जाते. या मंदिरात भगवान विष्णूचे वेणीमाधव रूप आहे. अलोपशंकरी देवी ही माता दुर्गेचा अवतार मानली जाते. मात सतीचे हे शक्तीपीठ असून येथे देवीची पाळण्याच्या रुपात पुजा केली जाते. येथे येणारे भाविक कोणत्याही मूर्तीची पूजा करत नाहीत तर फक्त पाळण्याची पूजा करतात. याशिवाय संपूर्ण प्रयागराजचा आता कायापालट करण्यात आला आहे. महाकुंभसाठी येणा-या भाविकांसाठी संगमघाटांवर सायंकाळी लेझर शो होत आहे. तसेच अनेक मान्यवर कथावाचकांच्या कथा वाचन होत असून मान्यवार गायकांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रमही याच परिसरात होत आहे. (Prayagraj)
सई बने