बॉलिवूड कलाकार टाइगर श्रॉफ, सनी लिओन, नेहा कक्कड, विशाल ददलानी, भारती सिंग, नुसरत भरूचा हे ऑनलाईन सट्टाबाजार अॅपच्या माध्यमातून फसवणूक केल्या प्रकरणी ईडीच्या रडावर आहेत. या अॅप संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्क प्रकरणी ईडीने मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ, मुंबई, कोलकातासह ३९ ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान सोन्याची नाणी, ज्वेलरीसह ४१७ कोटी रुपये जप्त केले आहेत. (Mahadev App Scam)
मात्र तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्र आणि अन्य काही पुरावे मिळाले आहेत. त्यात १४ बॉलिवूड कलाकारांची नावे सु्द्धा आहेत. आता ईडीचे अधिकारी याच बॉलिवूड कलाकारांवर नजर ठेवून आहे. ऑनलाईन सट्टा अॅपच्य माध्यमातून फसवणूक प्रकरणी कलाकारांकडून काही माहिती मिळवली जात आहे.
ईडीच्या सुत्रांनुसार महादेव बुक अॅपचे मालक सौरभ चंद्राकर यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात संयुक्त अरब अमीरातच्या दुबईत झाले होते. यावेळी बॉलिवूड कलाकार, गायक यांना परफॉर्मेन्ससाठी बोलावण्यात आले होते. ईडीला एक व्हिडिओ मिळाला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी म्हटले की, हवालाच्या आधारे जवळजवळ २०० कोटींचे पेमेंट केले आहे.
महादेव बेटिंग अॅपचे बॉलिवूड कनेक्शन
ईडीच्या हाती मोठी माहिती लागली आहे. महादेव बेटिंग अॅप कंपनीच्या मालकाचे नाव रवि उप्पल, सौरभ चंद्राकर आहे. ईडी त्यांचा शोध घेत आहे. जसे-जसे ऑनलाईन फसवणूकीच्या गँग बद्दल तपास पुढे जात आहे त्यानुसार बॉलिवूडशी त्यांचे असलेले कनेक्शन अधिक सखोल होत चालले आहे.
बॉलिवूड मधील काही टॉप कलाकार आणि गायकांचे नाव यामध्ये आले आहे. ईडीद्वारे देण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, या मध्ये टाइगर श्रॉफ,नेहा कक्कड़, सनी लियोन, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, भारती सिंह, नुसरत भरूचा, आतिफ असलम यांची नावे समोर आली आहेत. यावरुन ईडीने असे म्हटले आहे की, लवकरच आम्ही याचा तपास करून सत्य समोर आणू. ईडीच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे कंपनीने ऑनलाईन सट्टा अॅपच्या माध्यमातून बाजारातून पैसे काढले आहेत. याच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांना पैसा पोहचवला गेला आहे.
ऑनलाईन फसवणूक ते हवाला कनेक्शन
या प्रकरणी ईडीच्या अधिकारी याला हवालाशी कनेक्शन असल्याच्या दृष्टीकोनातून पाहत आहेत. या प्रकरणी योगेश पोपट नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले होते. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरातून १८ लाख रुपये रोख रक्कम, १४ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले होते. (Mahadev App Scam)
हेही वाचा- करिनाला ‘कहो ना प्यार है’ मधून केले होते आउट, अमिषाचा खुलासा
ऑनलाईन सट्टा अॅप हा अजिबात ऑनलाईन गेमिंग अॅप प्रमाणे नाही. मूळ रुपात मध्य उत्पन्न ते वयस्कर लोक अशा प्रकारच्या अॅपमधअये गुंवतणूक करत होत. त्यांना टार्गेट केले जायचे. काही महिन्यांपूर्वी कोलकाता मधील गार्डनरीच मधील एका व्यवसायिकाच्या घरी बेडखाली अरबो रुपये जप्त केले होते. या प्रकरणी व्यावसायिक आमिर खानयाला गाजियाबाद येथून अटक करण्यात आली होती. अशाचप्रकारे तो सुद्धआ गेमिंग अॅपच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे प्रलोभन द्यायचा. मात्र सेम वर्किंग पॅटर्न असल्याने तपासकर्ते हे पाहत आहेत की, दोन्ही कंपन्यांमध्ये काही संबंध आहे का. खरंतर सध्याचे जे प्रकरण तापले आहे त्या कंपनीचे मुख्यालय दुबईत आहे.