शिवभक्त शंकराची दररोज पूजा, आराधना करतात. परंतु श्रावण महिन्यात, मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या वेळी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्री हा शब्द ३ शब्दांपासून तयार झाला आहे. महाचा अर्थ महान, शिव म्हणजे आपले देवता आणि रात्रीचा अर्थ रात्र. अशा तीन शब्दांचा अर्थ असा होतो की, शंकराची महान रात्र. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, जेव्हा आपण आपली प्रार्थना शंकराला अर्पित करतो आणि बहुमूल्य आयुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी आपण त्यांचे आभार मानतो. (Maha Shivratri 2023)
हिंदू धर्मात भगवान शंकराला फार मानले जाते. शंकराला गंगाजल, बेलाचे पान, भांग-धतूरेने प्रसन्न केले जाते. शिवलिंगावर जल आणि बेलाचे पान अर्पण केल्यानंतर त्याभोवती आपण कशी फेरी मारली पाहिजे ते शास्रात सांगण्यात आले आहे. अशातच तुम्हाला माहिती आहे का, शिवलिंगाभोवती अर्धवतुर्ळाकार फेरी का मारली जाते?
शिवलिंगाभोवती फेरी मारण्याचे नियम
हिंदू धर्मात कोणत्याही देवी-देवतांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराभोवती फेरी मारली जाते. मात्र शंकराच्या मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या शिवलिंगाभोवती पूर्ण वर्तुळाकार फेरी कधीच मारली जात नाही. शिवलिंगाची पूजा केल्यानंत नेहमीच अर्धवर्तुळाकार फेरी मारली जाते. तर शंकराच्या मुर्तीभोवती तुम्ही पूर्ण वर्तुळाकार फेरी मारु शकता. जेव्हा कधी शिवलिंगाभोवती फेरी मारतो तेव्हा अर्धवर्तुळाकार झाल्यानंतर मागे यावे. या व्यतिरिक्त शिवलिंगाभोवती जेव्हा आपण फेरी मारतो तेव्हा ती डाव्या बाजूने सुरु करावी.
का फेरी मारली जाते?
जेव्हा एखाद्या मंदिरात किंवा देवांच्या मुर्तीचे दर्शन केले जाते त्यानंतर त्याच्या भोवती फेरी मारली जाते. यामुळे तेथील सकारात्मक उर्जेचा आपल्यावर प्रभाव पडतो. तसेच मन शुद्ध राहते. सकारात्मक विचार येतात. त्याचसोबत देवी-देवी देवतांचे दर्शन केल्यानंतर फेरी जरुर मारली पाहिजे. मात्र नेहमीच लक्षात ठेवावे की, फेरी मारताना मध्येच थांबू नये. या व्यतिरिक्त मंत्रांचा जाप ही करावा. (Maha Shivratri 2023)
हे देखील वाचा- वृंदावनचे प्रेम मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध
शिवलिंगावर किती बेलाची पाने ठेवावीत?
महाशिवरात्रीच्या पूजेवेळी शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण केल्याने शंकराची विशेष कृपा आपल्याला मिळते. मान्यतेनुसार, शिवलिंगावर ३ ते ११ बेलाची पान अर्पण करणे शुभ मानले जाते. तुम्ही यापेक्षा अधिक ही ठेवू शकता. जर तुमचा विवाह लवकरात लवकर व्हावा असे वाटत असेल तर १०८ बेलाची पानं वाहवीत.