Home » महाशिवरात्रीच्या दिवशी ‘या’ चुका करणे टाळा

महाशिवरात्रीच्या दिवशी ‘या’ चुका करणे टाळा

by Team Gajawaja
0 comment
Maha Shivratri 2023
Share

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा उत्सव फार मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी भक्त भगवान शंकरांची पूजा करतात. हिंदू धर्मातील सर्वाधिक महत्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. हा उत्सव फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीला साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान शंकराच्या मंदिरात भाविकांची ही गर्दी दिसते. महाशिवरात्री योग्य पद्धतीने साजरी करण्यासाठी काही लोक विविध उपाय करतात. अशातच तुम्हाला शंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून काही कामे न करण्याचे सांगितले जाते. तर जाणून घेऊयात महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे. (Maha Shivratri 2023)

महाशिवरात्रीच्या दिवशी काय करु नये?
ज्योतिषनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हा काही विशेष कामांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की. या दिवशी काही तुम्ही चुका केल्यास तर तुम्हाला पुजेचे फळ मिळत नाही.

-मांस, दारुचे सेवन करु नये
अशी मान्यता आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून ही कधीच मांस,दारुचे सेवन करु नये. असे केल्याने तुम्हाला शंकाराचा आशीर्वाद मिळत नाही. त्याचसोबत जरी उपवास केला नसेल तरीही तुम्ही तामसिक भोजन किंवा पेयाचे ही सेवन करु नये.

-गरिबांना त्रास देऊ नये
महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबांना सतवल्यास तुम्हाला पूजेचे फळ मिळ नाही. त्याचसोबत भगवान शंकर नाराज होऊ शकतात. असे करण्यापासून दूर राहावे. तर त्यांना अन्न दान करावे. जेणेकरुन शंकराचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.

-भांडण, वाद विवाद करु नका
जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी वाद-विवाद, भांडण केले तर शंकर तुमच्यावर नाराज होऊ शकतो. या दिवशी घरातील सर्व मोठ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांना वाईट शब्द ही वापरु नका. असे केल्याने तुमचेच नुकसान होईल.(Maha Shivratri 2023)

-अशाप्रकारच्या पात्राने जल अर्पण करु नका
लोक शंकराच्या पूजेदरम्यान, कोणत्याही भांड्याने शिवलिंगावर जल अर्पण करतात. मात्र ही चूक कधीच करु नका. यासाठी तु्म्ही तांब्याच्या भांड्याचा वापर करा.

हे देखील वाचा- ‘या’ कारणांमुळे शालिग्रामाचा वापर भगवान श्रीराम-सीतेची मूर्ती बनवण्यासाठी केला जाणार

महाशिवरात्रीच्या दिवशी काय कराल?
-जर तुम्हाला घरात सुख-शांति, समृद्धी हवी असेल तर या दिवशी जरुर उपवास करा. तसेच कोणत्याही प्रकारच्या मीठाचे सेवन करु नका
-कोणत्याही शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर दूध, पाणी अपर्ण करा
-शक्य असेल तर शंकराला कच्चे दुध अर्पण करा
-या दिवशी घरी तुम्ही रुद्राभिषेकाचे आयोजन करु शकता
-शिवपूजनावेळी बेलाचे पान, सफेद रंगाची फूल, गंगाजल, पवित्र भस्म, चंदन आणि दूध आवश्यक अर्पण करा
-या दिवशी शंकराच्या मंदिरात रात्रभर प्रार्थना-भजनाचे आयोजन केले जाते
-महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना प्रसाद, भोजन, वस्र किंवा अन्य सामान जरुर दान करा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.