Home » Maha Kumbha 2025 : कोणत्याही आखाड्याच्या महामंडलेश्वराचा खर्च कोण करतात?

Maha Kumbha 2025 : कोणत्याही आखाड्याच्या महामंडलेश्वराचा खर्च कोण करतात?

by Team Gajawaja
0 comment
Mahakumbha
Share

Maha Kumbha 2025 जेव्हापासून महाकुंभ आणि बॉलिवूडमधील एक्स अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर केले आहे. पण ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केल्यानंतर त्यांचे नाव बदलून श्री यमई ममता नंदगिरी झाले आहे. 24 जानेवारीला ममता यांच्यावर पट्टाभिषेक करण्यात आला होता. ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. अशातच महामंडलेश्वर कसे होतात आणि कोणत्याही अखाड्याच्या महामंडलेश्वराचा खर्च कोण उचलतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….

महामंडलेश्वराच्या पदाचे महत्व
संपूर्ण भारतात 13 आखाडे काम करतात, ज्यांचे हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. सर्व आखाड्यांमध्ये महामंडलेश्वराचे पद सर्वाधिक उच्च आणि प्रभावशाली मानले जाते. एका महामंडलेश्वराची यात्रा चांदीच्या सिंहासनावरुन होते. हे पद मिळवण्यापूर्वी एका व्यक्तीला पाच स्तरीय तपासणी, ज्ञान-वैराग्याच्या परीक्षेतून जावे लागते. या पदावर बसल्यानंतर त्यांना काही नियमांअंतर्गत आयुष्य जगावे लागते. एखाद्याने याचे पालन न केल्यास त्याला आखाड्यातून बेदखल केले जाऊ शकते.

maha kumbha 2025

maha kumbha 2025

महामंडलेश्वर कसे होतात?
एखाद्या व्यक्तीला कोणत्याही आखाड्यामध्ये सन्यास किंवा महामंडलेश्वराचे पद स्विकारण्याची इच्छा असल्यास त्यांना सर्व प्रकारची माहिती द्यावी लागते. यानंतरच अखाड्याचे थानापती त्या व्यक्तीची तपासणी करतात. थानापती ज्यावेळी रिपोर्ट सादर करतात त्यानंतरच अखाड्याचे सचिव आणि पंच मिळून पुन्हा एकदा वेगळी तपासणी करतात. या सर्व तपासणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला महामंडलेश्वराचे पद दिले जाते. (Maha Kumbha 2025)

=======================================================================================================

हेही वाचा : 

Kumbhmela : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी अनेकांचा मृत्यू नेमकं काय घडलं ?

kailash Mansarovar : चलो कैलास !

=======================================================================================================

महामंडलेश्वराचा खर्च कोण करतात?
हिंदू धर्मामध्ये शंकराचार्यचे पद सर्वाधिक मोठे मानले जाते. यानंतर महामंडलेश्वररचे पद हिंदू धर्मात अधिक महत्वाचे आहे. कोणत्याही आखाड्यामध्ये हे सर्वाधिक मोठे आणि जबाबदारीचे पद मानले आहे. अखाड्याच्या अर्थव्यस्थेबद्दल बोलायचे झाल्यास ही फार मोठी असते. ही अर्थव्यवस्था चालवण्यासाठी वेगवेगळी पद असतात. महामंडलेश्वराचा खर्च वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांवर चालतो. प्रत्येक आखाड्याकडे आपली जमीन, मंदिर, आश्रम आणि काही प्रकारची संपत्ती असते. यामधून त्यांची कमाई होते. येथून संपूर्ण आखाड्यासह महामंडलेश्वराचा खर्च केला जातो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.