तीर्थराज प्रयागराज आपल्या नव्या रुपासह महाकुंभमेळ्यासाठी येणा-या लाखो साधू-संतांचे स्वागत करण्यासाठी तयार झाले आहे. 13 जानेवारी 2025 पासून सुरु होणा-या या महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज नगरीमध्ये अभूतपूर्व अशी तयारी सुरु आहे. आत्ताही या पवित्र तीर्थक्षेत्रात रोज लाखो भाविक येत असून त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत. भारतात ज्या चार ठिकाणी महाकुंभमेळा होतो, ते प्रयागराज हे एक पावन तीर्थ आहे. समुद्रमंथनाच्यावेळी प्रयागराज येथेही अमृताचा थेंब पडल्याची कथा आहे, तेव्हापासूनच ग्रहनक्षत्राचा आधार घेत महाकुंभमेळा (Maha Kumbh Mela) होतो. आता प्रयागराज येथे 12 वर्षांनी होत असलेला हा महाकुंभमेळा सर्वार्थांनं विक्रमी ठरणार आहे. या महाकुंभमेळ्यात 45 करोड भाविक येणार आहे. (Maha Kumbh Mela)

देशातील सर्वक्षेत्रातील मान्यवर महाकुंभमेळ्यात येणार आहेतच शिवाय परदेशातील अनेक राजदूर, राष्ट्रप्रमुख आणि अनेक मान्यवरांना या महाकुंभमेळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या सर्व भाविकांच्या स्वागतासाठी प्रयागराज नगरी सजली आहे. प्रयागराजमध्ये पावलापावलावर मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे ही पौराणिक असून त्यांचा उल्लेख पौराणिक ग्रंथातही आहे. यात काही आश्रमांचाही समावेश आहे. महाकुंभमेळ्यानिमित्तांनं या सर्व मंदिर आणि आश्रमांना सजवण्यात आले आहे. पौराणिक वारसा असलेल्या सर्वच ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. (Marathi News)
त्यामुळे येथे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून या सर्व पौराणिक वास्तुंची नव्यानं डागडुजी करण्यात आली आहे. या सर्वात एक स्थान भाविकांसाठी उत्सुकतेचे आणि श्रद्धेचे आहे. ते म्हणजे, ज्या समुद्रमंथनानंतर महाकुंभमेळा होऊ लागला, त्या समुद्रमंथनाचा साक्षीदार असलेला महर्षी दुर्वासांचा आश्रम. प्रयागराज झुंसी येथे असलेल्या या आश्रमाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. महर्षी दुर्वासांच्या आश्रमाला भेट दिल्याशिवाय महाकुंभ पूर्ण होत नाही, असे मानण्यात येते. त्यामुळे रोज लाखो भाविक या आश्रमात येणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं येणा-या भाविकांसाठी येथे नव्यानं अनेक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. (Maha Kumbh Mela)

महाकुंभ 2025 साठी प्रयागराजच्या मंदिरे आणि घाटांचे नूतनीकरण केले जात आहे. यासोबतच येथील प्रसिद्ध महर्षी दुर्वासा आश्रमाचेही नूतनीकरण होत आहे. या आश्रमाच्या प्रवेशद्वारावर लाल वाळूच्या दगडाचे तीन मोठे दरवाजे उभारले असून मंदिरात प्रकाशयोजना केली आहे. महाकुंभात येणारे भाविक त्रिवेणी संगमात स्नान केल्यावर थेट या आश्रमात येतात आणि येथील शिवलिंगाची पूजा करतात. भाविकांची गर्दी पाहता हा आश्रम पहाटेपासूनच खुला करण्यात येणार आहे. तसेच रात्री उशीरापर्यंत चालू राहणार आहे. म्हणूनच या आश्रम परिसररात नव्यानं प्रकाशयोजना करण्यात आली आहे. (Marathi News)
वैदिक आणि पौराणिक कथांनुसार, प्रयागराजमध्ये अनेक देव, देवी आणि ऋषींनी यज्ञ आणि तपश्चर्या केली आहे. त्यापैकी एक महर्षी दुर्वासा, ऋषी अत्री आणि माता अनसूया यांचा मुलगा. महर्षी दुर्वासा हे पौराणिक कथांमध्ये क्रोध आणि शापासाठी ओळखले जातात. एका पौराणिक कथेनुसार महर्षी दुर्वासाच्या शापामुळे देव शक्तीहीन झाले, देवांना आपली शक्ती पुन्हा परत मिळावी यासाठी भगवान विष्णूच्या आज्ञेने देवतांनी दानवांसह समुद्रमंथन केले. याच समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले आणि त्याच पवित्रस्थळी महाकुंभमेळा साजरा होतो. त्यापैकीच एक प्रयागराज आहे. येथेच महर्षी दुर्वासाचा आश्रम झुंसी भागातील काकरा दुबावल गावात आहे. महर्षी दुर्वासांच्या आश्रमात एक प्राचीन शिवमंदिर आहे. असे मानले जाते की मंदिरातील शिवलिंगाची स्थापना स्वतः ऋषी दुर्वासांनी केली आहे. (Maha Kumbh Mela)
=======
हे देखील वाचा : महाकुंभमध्ये हॉटेल नाही, होम स्टे मध्ये रहा
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
=======
मंदिराच्या गाभाऱ्यात महर्षी दुर्वासाची ध्यानावस्थेत असलेली मूर्तीही असून मंदिराच्या प्रांगणात अत्री ऋषी, माता अनसूया, भगवान दत्तात्रेय, चंद्र, हनुमानजी आणि माता शारदा यांच्या मूर्ती आहेत. महर्षी दुर्वास हे वैदिक ऋषी अत्री आणि सती अनसूया यांचे पुत्र आणि भगवान शिवाचे एक रूप मानले जातात. भगवान दत्तात्रेय आणि चंद्र हे त्यांचे भाऊ आहेत. येथे दरवर्षी श्रावण महिन्यात जत्रा भरते आणि मार्गशीर्ष महिन्याच्या चतुर्दशीला दुर्वासा जयंती साजरी केली जाते. प्रयागराज येथे येणारे भाविक आवर्जून या आश्रमाला भेट देतात. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान करुन ओल्यात्यानं दुर्वासा आश्रमातील शिवलिंगाची आऱाधना करणा-या भाविकांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळेच आता महाकुंभमेळ्यात या आश्रमातही रोज लाखो भाविक भेट देणार आहेत. (Marathi News)
सई बने
