प्रयागराज येथे नव्या वर्षात होणारा महाकुंभमेळा सर्वार्थानं परिपूर्ण व्हावा यासाठी उत्तरप्रदेश सरकार प्रयत्न करीत आहे. या मेळ्यामध्ये सहभागी होणा-या भाविकांना सर्व सुविधा, सोबत स्थानिकांना रोजगार संधी असा मेळाही या महाकुंभमेळ्यानिमित्त घालण्यात आला आहे. त्यातूनच उत्तरप्रदेशच्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची मोठी संधी प्राप्त होणार आहे. जवळपास पाच हजार महिलांना कुंभमेळ्यात बचतगटाचे स्टॉल उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. (Maha Kumbh Mela)
शिवाय महाकुंभमेळ्यात येणा-या भाविकांना 24 तास ओपीडी सुविधा मिळणार आहे. येथे उभारण्यात येणा-या तात्पुरत्या स्वरुपाच्या रुग्णालयांमध्ये क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड, ईसीजी याशिवाय रक्त तपासणी, साखर तपासणी आदी सुविधाही उपलब्ध असणार आहेत. यातील अनेक सुविधा या मोफत असणार आहेत. कुंभमेळ्याच्या काळात प्रयागराजमधील हॉटेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य भाविकांना कडाक्याची थंडीत खुल्या वातावणात रहावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन प्रशासन आता 100 सार्वजनिक निवारागृहांची बांधणी करत असून यातील प्रत्येक निवारामध्ये 250 बेडची तरतूद आहे. 13 जानेवारी 2025 पासून प्रयागराजच्या त्रिवेणीच्या काठावर आयोजित करण्यात येणारा महाकुंभ ग्रामीण महिलांसाठी रोजगाराचे एक महत्त्वाचे माध्यम होणार आहे. या कुंभमेळ्यात ग्रामीण भागातील महिलांच्या बचतगटातील स्टॉल असणार आहेत. यातून 5 हजारांहून अधिक ग्रामीण भागीतील महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. (Social News)
कुंभमेळ्यात देशभरातूनच नाही तर जगभरातून भाविक येणार आहेत. या भाविकांना महाकुंभमेळ्याची आठवण म्हणून ज्या वस्तू घेऊन जायच्या आहेत, असा वस्तू या महिलांच्या स्टॉलवर उपलब्ध राहणार आहेत. महाकुंभमेळ्याच्या प्रत्येक सेक्टरमधून 10 दुकाने असणार आहेत. त्यातून प्रयागराज महाकुंभाचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे. या सर्व स्टॉल्समध्ये बहुउद्देशीय वस्तू ठेवण्यात येणार आहेत. महाकुंभाचा लोगो आणि घोषवाक्य लिहिलेले मफलर्स, कॅप, टीशर्ट यात असणार आहेत. शिवाय स्थानिक खाद्यपदार्थ असणार आहेत. याशिवाय बार्ली, ज्वारी, बाजरी आणि देशी गुळापासून विविध उत्पादने तयार केली जात आहेत. या खाद्यपदार्थांचे महाकुंभमेळ्यात विशेष स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या सर्वात स्वच्छता आणि पॅकींग यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. महाकुंभमेळ्याचा लोगो या सर्व वस्तूंवर आवश्यक घालण्यात येणार आहे. (Maha Kumbh Mela)
महाकुंभमेळ्यात जगभरातून 45 कोटीहून अधिक भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. या सर्वांसाठी कमी दरातील चांगले खाद्यपदार्थांची जशी गरज आहे, तशीच आरोग्य सुविधांचीही गरज आहे. हे जाणून महाकुंभमेळ्यात भाविकांना 24 तास ओपीडीची सुविधा अत्यंत अल्प दरात देण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांची विशेष टीम आतापासून तैनात करण्यात आली आहे. महाकुंभाच्या परेड ग्राऊंडमध्ये 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. यात 24 तास डॉक्टर उपस्थित असून, सर्व चाचण्यांची सुविधाही उपलब्ध आहे. शिवाय रुग्णवाहिकाही चोवीस तास सेवा देत आहे. या रुग्णालयांमध्ये क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड, ईसीजी, रक्त तपासणी, साखर तपासणी आदी सुविधाही उपलब्ध आहेत. महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड असून प्रसूती कक्षाच्या इमर्जन्सी वॉर्डसाठी डॉक्टरांची स्वतंत्र टीम आहे. याशिवाय संतांसाठी 20 खाटांची आठ छोटी रुग्णालये तयार असून तिथेही सर्व सुविधा उपलब्ध आहेत. (Social News)
========
हे देखील वाचा : महाकुंभसाठी प्रयागराज तयार
========
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यानिमित्त या भागातील हॉटेलचे दर आभाळाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी सार्वजनिक निवारागृह उभारण्यात आली आहेत. प्रशासनानं एकूण 25,000 खाटांची क्षमता असलेले सार्वजनिक निवारागृह उभारले आहे. यात पलंगासह गाद्या, उशा आणि स्वच्छ चादर देण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांची व्यवस्था आहे. या निवारागृहांमध्ये चादरी बदलण्यासह नियमित साफसफाईची काळजीही घेण्यात येत आहे. याशिवाय येथे पिण्याचे शुद्ध पाणी आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आहे. यात भाविकांनी दोन दिवस मुक्काम केल्यास पहिल्या दिवशी 100 रुपये आणि आणि दुसऱ्या दिवशी 200 रुपये शुल्क आहे. मुख्य स्नान उत्सवात पहिल्या दिवशी 200 रुपये असेल आणि दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दुसऱ्या दिवशी 400 रुपये भाडे असणार आहे. या सर्वात भाविक रोख आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याचीही व्यवस्था आहे. (Maha Kumbh Mela)
सई बने