Home » Maha Khumbh Mela : बापरे ! महाकुंभमधील बांबू जोडले तर थेट अमेरिकेला पोहचाल….

Maha Khumbh Mela : बापरे ! महाकुंभमधील बांबू जोडले तर थेट अमेरिकेला पोहचाल….

by Team Gajawaja
0 comment
Share

तिर्थराज प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव होत आहे. महाकुंभ 2025 म्हणजे एक अदभूत उत्सव ठरणार आहे. 40 करोड भाविक या महाकुंभमध्ये येऊन संगम स्थानावर स्नान करणार आहेत. महाकुंभमध्ये आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले 13 आखाडे आपल्या लाखो अनुयायांसह दाखल झाले आहेत. सोबत काही वर्षापूर्वी स्थापन झालेला किन्नर आखाड्याचाही येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या व्यतिरिक्तही हजारो साधू संतांनी आपापले मंडप उभारले आहेत. भारतातील मान्यवर कथावाचकांनीही या महाकुंभस्थळी आपले मंडप उभारले असून महाकुंभ होत असलेल्या 45 दिवसात कथावाचन होणार आहे. यासर्वात महाकुंभमध्ये हजारो यज्ञमंडप असून त्यामध्ये साधू संत यज्ञ करत आहेत. या महाकुंभमध्ये करोडो भाविक येणार आहेत. यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. सोबत भारतातील आणि परदेशातीलही मान्यवरांना उत्तरप्रदेश सरकारतर्फे आमंत्रण देण्यात आले आहे. (Maha Khumbh Mela)

या सर्वांसाठी प्रयागरजमध्ये निवासव्यवस्थाही करण्यात आली आहे. यापैकी अनेक घरंही बांबूपासून उभारली आहेत. या बांबूच्या घरामध्ये सर्व सुविधा असून परदेशी नागरिकांमध्ये ही बांबूची घरे लोकप्रिय ठरली आहेत. 40 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या महाकुंभमध्ये ही बांबूची घरे एवढी आहेत, की हे बांबू एकमेकांना जोडले तर थेट अमेरिकेत जाण्यासाठीचा रस्ता तयार होणार आहे. अदभूत, अतुलनीय असे वर्णन ज्या महाकुंभ 2025 चे वर्णन करण्यात येत आहे, तो अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं केलेल्या व्यवस्थेचे कौतुक होत असून यातील टेंट सिटी ही भाविकांच्या पसंतीस पडत आहे. या टेंट सिटीचे बुकींग फुल झाले असून त्यातील सुविधांमुळे परदेशी नागरिकांनीही टेंट सिटीमध्ये राहण्यास अधिक पसंद केले आहे. प्रयागराजमधील संगमच्या वाळूवर ही टेंट सिटी उभारण्यात आली आहे. (Marathi News)

Maha Khumbh Mela

साधारण ते आलिशान तंबूपर्यंत एक लाखाहून अधिक बांबू पासून तयार केलेले तंबू येथे उभारण्यात आले आहेत. दहा लाखाहून अधिक या तंबूंची संख्या असल्याची माहिती आहे. यासाठी तब्बल 67 लाख बांबूचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच हे बांबू एकमेकांना सरळ जोडले तर ते थेट प्रयागराज संगमापासून अमेरिकेत पोहचतील. या टेंट सिटीचे सर्व काम 104 वर्ष जुन्या असलेल्या लल्लूजी अँड सन्स कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ही कंपनी वाळूवर टेंट उभारण्यासाठी ओळखली जाते. गेल्या अनेक कुंभमेळ्यात यात कंपनीनं भाविकांसाठी तंबू उभारले आहेत. मात्र प्रयागराज महाकुंभमेळ्यात या कंपनीनं जवळपास 40 चौरस किलोमीटर परिसरात तंबू उभारत एक नवा विक्रमच केला आहे. यासाठी या कंपनीचे कर्मचारी गेल्या सहा महिन्यापासून मेहनत घेत आहेत. त्यांच्या या परिश्रमातूनच या टेंट सिटीमध्ये अगदी फाईव्हस्टर हॉटेलसारखी सुविधा असलेले टेंटही बघायला मिळणार आहे. यातील काही टेंटचे भाडे हे एक दिवसासाठी लाख रुपयेही आहे. विशेषतः शाही स्नानाच्या दिवसाच्या आसपास हे दर अधिक असणार आहेत. (Maha Khumbh Mela)

========

हे देखील वाचा : Uttar Pradesh : महाकुंभमधील अनोखे संत !

Kumbh Mela : गुरू नानक देव यांच्या पुत्राने उभारलाय कुंभ मेळ्यातला हा आखाडा !

======

या सर्व टेंट सिटीमध्ये अनेक सुविधा असून त्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी खास इन्सुलेटेड फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे. या टेंट सिटीला संगमासोबत जोडण्यासाठी उड्डानपूल बांधण्यात आले आहेत. महाकुंभमेळ्यात येणा-या व्हीआयपींची संख्या आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता, त्यांच्यासाठी वेगल्या भागात टेंटसिटी उभारण्यात आली आहे. या टेंटसिटीची क्षमता 250 तंबूंची असून त्यामध्ये त्यांच्या सुरक्षा रक्षकांसाठीही वेगळी व्यवस्था असणार आहे. या व्हीआयपी टेंट सिटीतून संगमस्थळी जाण्यासाठी खास बोटींची सोय आहे. या विशेष मान्यवरांचा प्रोटोकॉल लक्षात घेत त्यांच्यासाठी सहाय्यक कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पर्यटन विभागाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. याच टेंट सिटीमध्ये स्वतंत्र यज्ञकुंडही उभारण्यात आले असून संबंधित विभागतर्फे पुजारींचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.या सर्व टेंट सिटीमध्ये सुरक्षा आणि स्वच्छता या दोन गोष्टींची काळजी घेण्यात येत आहे. या भागात ड्रोण उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशा सूचना या भागात लिहिण्यात आल्या आहेत. (Marathi News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.